10 कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत Legal Rights in Marathi That Everyone should know

Legal Rights in Marathi भारत एक पुरोगामी देश आहे. भारतात राहणाऱ्या बऱ्याच नागरिकांना आपले कायदेशीर अधिकार माहिती नसतात जेणेकरून ते भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे शिकार होत असतात. त्यामुळे आज आपण असे १० महत्त्वाचे कायदे जाणून घेऊया ज्याबद्दल फार कमी भारतीयांना माहिती आहे. चला तर पाहूया असे १० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत.

१० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत
10 Legal Rights In Marathi

१० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत 10 Legal Rights In Marathi

कायदेशीर अधिकार १

भारतात महिलांना अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याचा अधिकार फक्त महिला पोलिसांना असतो. पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना महिलांना अटक करून पोलीस चौकीत नेण्याचा अधिकार नसतो.

जर एखाद्या महिलेला सायंकाळचे ६ ते सकाळचे ६ या वेळेमध्ये पोलिस स्टेशनला हजर राहण्यासाठी सांगितले असेल तर त्या महिलेला अधिकार आहे की ती पोलिस स्टेशनला जाण्यास नकार देऊ शकते.

कायदेशीर अधिकार २

इन्कम टॅक्स अधिकारी किंवा कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे तुम्हाला अटक करण्याचा अधिकार असतो. जर तुम्ही टॅक्स नाही भरला तर TRO कडे म्हणजेच Tax Recovery Officer कडे तुम्हाला अटक करण्याचा पूर्ण अधिकार असतो. आणि त्यांच्या मर्जीनेच तुम्ही जेल मधून सुटू शकता.

या कायद्याचा १९६१ च्या इन्कम टॅक्स अॅक्ट मध्ये उल्लेख केला गेला आहे.

कायदेशीर अधिकार ३

सायकल चालवणाऱ्यांवर मोटर वाहन अॅक्ट लागू होत नाही. जर तुम्ही हायवे वर रोज सायकल चालवत असाल तर तुम्हाला मोटर व्हेइकल अॅक्ट ची काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये. कारण या मोटर व्हेइकल अॅक्ट मध्ये सायकल आणि रिक्षा नाही येत.

कायदेशीर अधिकार ४

भारतात राहणारे बरेचसे लोक अजूनही लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहण्याला कायदेशीर गुन्हा मानतात. परंतु भारतीय कायद्यानुसार हे लिव्ह-इन रिलेशनशिप अवैध नाही तर हे कायदेशीर आहे.

परंतु लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याला खूप साऱ्या गोष्टींचे पालन करावे लागते. जर या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याचे अपत्य जन्माला आले तर त्याचा त्याच्या आई-वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण अधिकार असतो.

कायदेशीर अधिकार ५

भारतात जर ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जर तुमच्याकडून एकदा दंड आकारला गेला असेल तर तो पूर्ण दिवस कोणताच वाहतूक पोलिस अधिकारी तुमच्यावर पुन्हा त्याच गुन्ह्यासाठी दंड आकारू शकत नाही.

१० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत | 10 Legal Rights Everyone Should Know In Marathi
१० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत
10 Legal Rights In Marathi

उदाहरणार्थ जर तुम्ही हेल्मेट न घातल्यामुळे जर तुमची दंडाची पावती फाडली असेल तर तुम्ही तो पूर्ण दिवस बिना हेल्मेटचे फिरू शकता. ट्रॅफिक पोलिस तुमच्यावर पुन्हा हेल्मेट न घालण्याच्या चुकीसाठी दंड नाही टाकू शकत.

कायदेशीर अधिकार ६

तुमच्याकडे एखाद्या प्रॉडक्ट च्या एमआरपी पेक्षा कमी किंमत देण्याचा अधिकार असतो. तुम्ही दुकानदारांकडून एखादी गोष्ट सौदेबाजी करून खरेदी करू शकता.

उदाहरणार्थ जर एखाद्या गोष्टीची किंमत १०० रुपये आहे तर तुम्ही त्या दुकानदारासोबत सौदा करून ती वस्तू ९० रुपयांत देखील खरेदी करू शकता. परंतु कोणताच दुकानदार एखाद्या ९० रुपयांच्या वस्तूला १०० रुपयांत नाही विकू शकत.


• आणखी वाचा : आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ?


कायदेशीर अधिकार ७

जर एखादी व्यक्ती तुमच्या कामाचे पैसे किंवा तुमच्याकडून घेतलेली उधारी देत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात कोर्टात तक्रार करू शकता. भारतीय कायद्यानुसार जर कोणी तुम्हाला तुमच्या हक्काची रक्कम देत नसेल तर तुम्ही त्या व्यक्ती विरोधात कोर्टात अर्ज लिहून खटला दाखल करू शकता. हा तुम्हाला मिळालेला कायदेशीर अधिकार असतो. तुमच्याकडे ज्या व्यक्तीकडून पैसे वसूल करायचे आहेत त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी ३ वर्षे एवढा कालावधी असतो.

उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या माणसाला पैसे उधार दिले आहेत आणि जर तो ठरलेल्या वेळेत तुमचे पैसे देत नसेल तर तुम्हाला त्या व्यक्तीवर खटला दाखल करण्यासाठी तब्बल ३ वर्षांचा वेळ मिळतो. पण जर तुम्ही ३ वर्षांपर्यंत केस नाही केली आणि जर त्या नंतर तुम्हाला केस करायची असेल तर तेव्हा तुम्हाला ठोस कारण द्यावे लागेल तेव्हाच तुमच्या केसला मान्यता दिली जाते नाहीतर ती नाकारली जाते.

कायदेशीर अधिकार ८

१८६१ मध्ये बनलेल्या पोलिस अॅक्टनुसार भारतातला प्रत्येक पोलीस अधिकारी कायम ड्युटीवर असतो. जर एखाद्या ठिकाणी मध्यरात्री किंवा कधीही एखादी घटना घडली असेल किंवा कोणता गुन्हा घडला असेल तर कोणत्याच पोलिस अधिकाऱ्याला हे बोलण्याचा अधिकार नाही की तो ड्युटीवर नाहीये.

१० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत | 10 Legal Rights Everyone Should Know In Marathi
१० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत
10 Legal Rights In Marathi : Trenfingmarathi.in

कारण पोलिस अॅक्टनुसार प्रत्येक पोलिस अधिकारी बिना वर्दीचे देखील ड्युटीवर असतात.

कायदेशीर अधिकार ९

१९५६ मध्ये बनलेल्या हिंदू अडोप्शन आणि मेंटेनन्स अॅक्ट अनुसार जर तुम्ही हिंदू आहात आणि तुम्हाला एक अपत्य आहे तर तुम्ही दुसरे मुल दत्तक नाही घेऊ शकत.

पण जर तुम्हाला पाहिले अपत्य नसेल तर तुम्ही मुल दत्तक घेऊ शकता परंतु त्यासाठी अशी अट आहे की ज्या मुलाला तुम्ही दत्तक घेणार आहात त्या मुलाच्या आणि तुमच्या वयात कमीतकमी २१ वर्षांचे अंतर असावे.

कायदेशीर अधिकार १०

जर तुमची बायको तुम्हाला सारखे सारखे टोमणे मारत असेल किंवा शिव्या देत असेल किंवा तुम्हाला तुमच्या आईवडिलांपासून वेगळे होण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर हे क्रूर कृत्याच्या श्रेणी मध्ये येतं. ही क्रूरता आहे याच्या आधारावर तुम्ही घटस्फोटाची मागणी करू शकता.

तर हे होते काही सर्वसामान्य परंतु बऱ्याच लोकांना माहिती नसलेले कायदेशीर अधिकार जे तुमच्या बऱ्याच कामी येऊ शकतात. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हॉटसअप वर आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

Tags : १० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत, 10 Legal Rights In Marathi, भारतातील काही मूलभूत हक्क , legal rights in marathi


Leave a Comment