अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? | Affiliate Marketing Meaning In Marathi 2021

एका रुपयाची देखिल गुंतवणूक न करता भरपुर पैसे मिळवून देणाऱ्या एखाद्या बिझनेसच्या शोधात आपण आहात का ? आज आपण अश्याच एका बिझनेसबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे अफिलिएट मार्केटिंग. अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय? ( Affiliate Marketing Meaning In Marathi ) हे पाहूया.

हो, या अफिलिएट मार्केटींग मध्ये आपण खिशातला एक रुपयाही खर्ची ना घालता लाखो रूपयांचे समान ऑनलाईन विकू शकतो आणि त्यातून महिन्याला हजारो रूपये कमावू शकतो.

सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स

बऱ्याच लोकांना हे अफिलिएट मार्केटींग चैन मार्केटींग सारखं वाटते किंवा काही लोक तर याला फसवणूक किंवा फ्रॉड देखील ठरवत असतात परंतु तसे नाहीये. जर हे अफिलिएट मार्केटींग पुरेसा अभ्यास करून आणि थोड्या हुशारीने केले तर खरंच यातून ऑनलाईन पैसे आपण कमावू शकतो. फक्त त्यासाठी याबद्दलची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

तर हे अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय? हे कसे काम करते? कशाप्रकारे आपण यातून पैसे कमावू शकतो? आणि खरंच लोक यातून लाखो रुपये कमवत आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.

अगदी कमी गुंतवणुकीत सुरू होणारे काही व्यवसाय

अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय? Affiliate Marketing Meaning In Marathi :

अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? | Affiliate Marketing Meaning In Marathi 
affiliate marketing cycle image
अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ?
Affiliate Marketing Meaning In Marathi : Trendingmarathi.in

आजकाल आपण कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दलची संपूर्ण माहिती ऑनलाईन पाहत असतो त्याबद्दल पूर्ण शहानिशा करूनच आपण ती गोष्ट खरेदी करण्याचा विचार करतो. त्यासाठी आपण आपल्या विश्वासातील युट्यूब चॅनल्स, वेबसाइट्स किंवा सोशल मीडिया अकाउंट्स वर जाऊन त्या गोष्टींबद्दलचे रिव्ह्यूज जाणून घेत असतो. Affiliate Marketing Meaning In Marathi.

कंपनीच्या नजरेतून पाहायला गेलं तर प्रत्येक कंपनी आपले उत्पादन विकू इच्छित असते आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या ठराविक ग्राहकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपर तसेच ऑनलाईन जाहिराती इत्यादी माध्यमांचा प्रभावी वापर करताना दिसून येतात.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक म्हणजे १ बिटकॉईन = लाखो रुपये

अश्यातच जर काही ग्राहक असतील जे काही ठराविक युट्यूब चॅनल्स, वेबसाइट्स किंवा सोशल मीडिया अकाउंट्स वर विश्र्वास करत असतील तर या कंपन्या अशा ग्राहकांना टार्गेट करण्यासाठी अफिलिएट प्रोग्राम सुरु करून त्या प्रोग्रामला जॉईन होणाऱ्या लोकांच्या माध्यमातून वस्तूंची विक्री करवून त्या बदल्यात त्यांना टक्केवारीच्या स्वरूपात कमिशन देत असतात. अफिलिएट कमिशन म्हटले जाते.

अफिलिएट मार्केटिंग काम कसे करते ? How affiliate marketing works :

बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या आपापले अफिलिएट प्रोग्रॅम्स चालवत असतात. जर एखादा युट्यूबर, ब्लॉगर किंवा एखादा सोशल मिडिया वर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती एखाद्या कंपनीच्या अफिलिएट प्रोग्राम मध्ये सामील होतो तेव्हा त्याला तिकडे एक अफिलिएट अकाउंट उघडावे लागते.

त्यानंतर त्यांना जी वस्तू किंवा उत्पादन विकायचे असेल त्या प्रोडक्ट ची अफिलिएट लिंक मिळते. पुढे ते त्या लिंक ला आपल्या यूट्यूब चॅनेलवर, आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंट्स वर शेअर करतात.

PayPal म्हणजे काय?

त्यांनी शेअर केलेल्या लिंकवरून त्यांचे दर्शक आणि वाचक कोणतीही गोष्ट खरेदी करतात तेव्हा त्याच्या बदल्यात त्या अफिलिएट्सला ठराविक कमिशन दिले जाते. अफिलिएट मार्केटिंग करणाऱ्यांना अफिलिएट्स म्हटले जाते.

समजा आपण अमेझॉन.इन वर आपले अफिलिएट अकाउंट उघडले. आता आपणाला एका १०० रुपयांच्या वस्तूची विक्री करायची आहे आणि त्या वस्तूवर देण्यात येणारे अफिलिएट कमिशन हे १०% इतके आहे. तर आपण त्या वस्तूची लिंक आपल्या युट्यूब चॅनेलवर किंवा आपल्या ब्लॉगवर किंवा सोशल मीडियावर टाकली आणि त्यातून आपण एक विक्री घडवून आणली. तर आपणाला त्या १०० रुपयांच्या वस्तूवर १०% म्हणजे १० रुपये कमिशन मिळेल.

अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? | Affiliate Marketing Meaning In Marathi
amazon affiliate products commission chart
अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ?
Affiliate Marketing Meaning In Marathi

यामध्ये वर दाखविल्याप्रमाणे प्रत्येक प्रकारच्या वस्तूवर किंवा उत्पादनावर देण्यात येणारे कमिशन निश्चित केलेले असते.

अशा प्रकारे आपण महिन्याभरात आपल्या अफिलिएट अकाउंट वरून किती वस्तूंची विक्री करतो त्यानुसार महिन्याला आपल्या अकाउंट मध्ये पैसे जमा होत जातील. ही रक्कम आपण गिफ्ट कार्ड च्या माध्यमातून किंवा थेट आपल्या बँक अकाउंट मध्ये सुधा पाठवू शकतो.

अफिलिएट मार्केटिंगमधून किती रुपये कमवले जाऊ शकतात ? Affiliate marketing for beginners :

यामध्ये कोण किती पैसे कमावू शकतो याला कोणतेही बंधन नाही. हे सगळे आपल्या अफिलिएट लिंक वर किती लोक भेट देतील म्हणजेच त्यावर किती ट्रॅफिक येईल यावर अवलंबून असते. शिवाय आपण त्या प्रॉडक्ट ची मार्केटींग कशी करतो त्यावर देखील हे अवलंबून असते. त्यामुळे यातून नेमका किती पैसा कमावला जाऊ शकतो हे निश्चित सांगणे कठीण आहे.

तरी देखील मेहनत करून आणि थोड डोकं लावून काम केलं की यातून आपण भरपूर ऑनलाईन पैसे कमावू शकतो. बरेच लोक यातून महिन्याला लाखो रुपये देखील कमावत आहेत.

जर आपल्याकडे चांगले मार्केटींग कौशल्य असेल तर आपण यातून भरघोस पैसे कमवू शकतो. कारण यामध्ये कसलीही मर्यादा नसते. आपण जेवढी मार्केटींग करू तेवढी आपण निवडलेल्या उत्पादनांची विक्री वाढेल आणि जेवढी विक्री वाढेल तेवढे कमिशन आपल्या अकाउंट मध्ये जमा होत जाईल.

आणखी वाचा : आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ?

अफिलिएट मार्केटिंग शिकण्यासाठी काय करावे? How to start Affiliate Marketing in marathi :

अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी आपणाला काही गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं ठरतं. त्यामध्ये आपणाला इंटरनेट बद्दल माहिती असायला हवी, एखाद्या प्रॉडक्टची लिंक कशी बनवायची ती कशी व कुठे शेअर करायची याबद्दल माहिती करून घेणे गरजेचे ठरते. त्याचप्रमाणे सोशल मीडिया अकाउंट्स वर लिंक कशाप्रकारे शेअर करावी ह्या सगळ्यांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

त्यासाठी यूट्यूब वर विविध चॅनल्स उपलब्ध असतात जे अफिलिएट मार्केटिंगबद्दल माहिती आणि शिक्षण देत असतात. त्यापैकी एखादा चांगला चॅनल निवडून आपण अफिलिएट मार्केटिंगचे बेसिक ज्ञान मिळवू शकतो.

जर आपण अफिलिएट मार्केटिंगबद्दल गंभीर असाल किंवा आपणाला यामध्ये करीयर होऊ शकते असे वाटत असेल तर आपण एखादा फ्री किंवा थोडीफार किंमत देऊन मिळणारा कोर्स पाहून त्यामधून सुद्धा या अफिलिएट मार्केटिंग संबंधीचे ज्ञान मिळवू शकता.

काही लोकप्रिय अफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम्स Affiliate programs for beginners :

जसजसा इंटरनेटचा वापर वाढत आहे तसतशा बऱ्याच कंपन्या आपल्या ऑनलाईन जाहिरातींकडे लक्ष देत आहेत. ज्यामध्ये ते आपापले अफिलिएट प्रोग्रॅम्स सुरू करत आहेत. ज्यामुळे त्यांच्या विक्रीत वाढ होत आहे आणि ते करून देणाऱ्या लोकांना देखील फायदा पोहचत आहे.

जर आपणाला एखाद्या कंपनीच्या अफिलिएट प्रोग्राम विषयी माहिती हवी असेल तर आपण त्या कंपनीचे नाव गूगल मध्ये सर्च करून त्यापुढे अफिलिएट प्रोग्राम असे लीहले तर त्यांचा जर प्रोग्राम असेल तर आपणाला माहिती मिळून जाईल.

खाली भारतातील काही लोकप्रिय अफिलिएट प्रोग्रॅम्स चालविणाऱ्या कंपन्यांची नावे दिली आहेत. आपण आपल्या आवडीनुसार त्यापैकी एखाद्या कंपनीची निवड करू शकता किंवा आणखीही दुसऱ्या कोण्या एखाद्या कंपनीचा अफिलिएट प्रोग्राम जॉईन करू शकता.

  • १. अमेझॉन अफिलिएट प्रोग्राम ( Amazon Associates Program ) :
  • २. फ्लिपकार्ट अफिलिएट प्रोग्राम ( Flipkart Affiliate Program ) :
  • ३. क्लिकबँक अफिलिएट प्रोग्राम ( Clickbank Affiliate Progtam ) :
  • ४. सीजे अफिलिएट प्रोग्राम ( Cj Affiliates ) :
  • ५. जेव्ही झू अफिलिएट प्रोग्राम ( JvZoo Affiliates ) :

यामध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट अफिलिएट प्रोग्रामद्वारे आपण वस्तूंची विक्री करून कमिशन मिळवू शकतो तर इतर ज्या साईट्स आहेत त्यावर आपणाला डिजिटल उत्पादने विक्रीसाठी मिळतात जसे की सॉफ्टवेअर्स, ई-बुक्स, विविध प्रकारचे कोर्सेस इत्यादी डिजिटल प्रकारची उत्पादने विक्रीसाठी मिळतात. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर मिळणाऱ्या कमिशनच्या तुलनेत डिजिटल वस्तूंच्या विक्रीमागे मिळणारे कमिशन हे जास्त असते.

जर आपण या अफिलिएट मार्केटींगच्या क्षेत्रात नवीन असाल तर आम्ही तुम्हाला सुरुवातीला अमेझॉन अफिलिएट प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन देऊ. कारण यामध्ये अकाउंट उघडणे एकदम सोपे आहे. या अमेझॉन असोसिएट्स प्रोग्राम मध्ये अकाउंट उघडण्यासाठी आपणाला पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागते :

अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? | Amazon Affiliate Marketing Meaning In Marathi
अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? : अमेझॉन अफिलिएट प्रोग्राम साईन अप
Affiliate Marketing Meaning In Marathi : Amazon Affiliate Program Signup
  • • नाव
  • • पत्ता
  • • ईमेल आयडी
  • • फोन नंबर
  • • पॅन कार्ड तपशील
  • • ब्लॉग किंवा वेबसाइटची लिंक ज्याद्वारे आपण लिंक्स प्रमोट करणार आहात ( यामध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक किंवा सोशल मीडिया अकाउंटची लिंक देखील देऊ शकतो. )
  • • बँक अकाउंट डिटेल्स ( ज्यामध्ये आपले पेमेंट जमा होऊ शकेल.)

तर आपण पाहिले की अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? (Affiliate Marketing Meaning In Marathi), हे कसे काम करते, आणि यातून आपण पैसे कसे कमावू शकतो. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या झीरो इन्वेस्टमेंट बिझिनेस आयडिया बद्दल माहिती मिळू शकेल.


Tags : अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ?, Affiliate Marketing Meaning In Marathi 2021, Low investment business in marathi, कमी गुंतवणुकीचा बिझनेस

6 thoughts on “अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? | Affiliate Marketing Meaning In Marathi 2021”

Leave a Comment