Best Life Quotes In Marathi – 600+ मराठी स्टेटस जीवन

माणसाला काहीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो.

हे जीवनावर मराठी स्टेटस तुम्हाला जीवनात पुढे जाण्याचा मार्ग दाखवण्यास मदत करतील. काही लोक आत्मविश्वास जागृत करून कामाला सुरुवात करतात, पण मार्गात येणाऱ्या छोट्या-छोट्या अडथळ्यांमुळे ते काम मध्येच सोडून देतात. वाटेत कितीही अडथळे आले तरी जीवनावरचे हे अनमोल विचार तुम्हाला जीवन जगायला शिकवतील.

जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर Best Life Quotes In Marathi तुम्हाला आतून मजबूत बनवतील. तुमचे जीवन आणि विचार दोन्ही बदलतील. Status on Life in Marathi तुम्हाला आतून मजबूत बनवतील, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हे life changing quotes in marathi तुम्हाला धैर्य देतील. तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल, तर Quotes On Life in Marathi तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर घेऊन जातील. हे लाइफ स्टेटस मराठी तुमच्या प्रत्येक अडचणीला दूर करतील.

Best Life Quotes In Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
विचार असे मांडा की
तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा
हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो.
आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.
लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही
तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्त्वाचं आहे.
फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा
तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील.
कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही
कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही.

Read More : Motivational Quotes in Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
तुला वाटतं का
मी निघून जावं तुझ्या आयुष्यातून
तसं असेल तर सांग कायमचा निघून जातो.
आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या
हास्या इतके सुंदर काहीच नसते.
नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा असतो
त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वत:चं साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगलेच.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात
ते म्हणजे
“लोक काय म्हणतील”.
Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
वेळे बरोबर मन आणि मनाबरोबर माणसं
कशी बदलतात कळतच नाही.
आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या
कारण इथं पुन्हा Once More नसतो.
सिंह बना सिंहासनाची चिंता करू नका
तुम्ही जिथे बसणार तेच सिंहासन बनेल.
परिस्थिती कशीही असू द्या
तुम्ही फक्त लढायला शिका यश नक्की मिळेल.
जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.
आयुष्यात समोर आलेली, आव्हाने जरूर स्वीकारा.
कारण त्यातुन तुम्हाला, एक तर विजय प्राप्ती मिळेल,
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.

Best Life Quotes In Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही,
सुविचार पण असावे लागतात.
आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे वागतो
याला अधिक महत्त्व आहे.
जीवनात Struggle केल्याशिवाय माणूस Google वर येत नाही.
राजा सारखा आयुष्य जगण्यासाठी
गुलामी सारखी मेहनत सुद्धा करावी लागते.
संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी
तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.
स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

Life Status In Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
माणसं बदलण्यात वेळ घालवू नका
आपली परिस्थिती बदला
बाकी सगळं आपोआप बदलेल.
Life मध्ये काही शिकलो नाही
पण life ने खूप काही शिकवले.
तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही
तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.
शेवटपर्यंत लढा द्या
कारण विजय फक्त त्याचाच होतो
जो शेवटपर्यंत लढा देतो.
ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला
त्या दिवशी फक्त एवढा आठवा की
आपण सुरुवात का केली होती.
इतके जिद्दी बना की
तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसणार नाही.

Life Status In Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
कधी कधी सगळी नाती
फक्त नावापुरतीच रहील्यासारखी वाटतात.
जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात
तेंव्हा समजून घ्यावं की
तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.
ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला असं समजा.
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे
जे तुम्हाला जमणार नाही
असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.
नशिबावर तुमचा भरोसा फक्त १% पाहिजे
आणि कष्टावर ९९% पाहिजे.
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

Best Quotes On Life in Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला.
ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे
त्यांनीच इतिहास रचलेलं आहे.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात.
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
इज्जत मागायची नसते काम चांगले असले
की ती आपोआपच मिळते.
सोबत कितीही लोक असु द्या
शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो,
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतःलाच भक्कम बनवा.

Life Quotes In Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात
ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो,
तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो,
संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवासी बनवा.
कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही
आणि यशस्वी होणारे लोकं “कारणं” सांगत नाही.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते
तोच खरा कर्तृत्ववान होय.

Quotes On Life in Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
आजकाल जवळच्यांनी धोका दिला
तरी काही फरक नाही पडत
कारण आज ते पलटतायत
आणि उद्या माझे दिवस पलटतील.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायचे असेल
तर चाली रचत राहाव्या लागतात.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल
तर नोटा मोजू नका.
कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि
हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील
तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

Quotes on Life in Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
कधी कधी कोणाला सरळ करण्यासाठी
आपल्याला वाकडं व्हावं लागतं.
ध्येयाचा ध्यास लागला
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते
कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवर असू द्या
म्हणजे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.
स्वतःवर विश्वास असेल
तर अंधारात देखील वाट सापडते.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही
पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

Quotes On Life in Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते.
आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग
म्हणजे तो तयार करणे.
सिंह बनुन जन्माला आले
तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते,
कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
कर्माला भिणार्‍या माणसांनी जगण्यात अर्थ नाही
कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं.
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

Status On Life in Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे
समुद्र गाठायचा असेल
तर खाचखळगे पात करावेच लागतील.
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो
आणि लोक हसत असतात,
मरताना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
क्षेत्र कोणतेही असो
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले की
यशालाही पर्याय नाही.
कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा
घेण्याची ज्याच्यात धमक असते
तो खरा स्वाभिमानी.

Best Life Status In Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
न डगमगता प्रयत्न केलेत
तर यश स्वतःहून तुमच्याकडे येईल.
यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा
अधिक प्रबळ असली पाहिजे.
तुमचे कितीही वय असेल
किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील
तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
स्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा
लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याचा पासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका.
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील !

आयुष्य स्टेटस मराठी

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
स्वप्नं छोटं असलं तरी चालेल
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.
शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल
तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
हरलात तरी चालेल
फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे,
हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल
हसा इतके की आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

Best Life Status in Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
कधी कोणाच्या शोधत नका निघू
कारण लोक हरवत नाही बदलून जातात.
पंख त्यांचेच मजबूत असतात
जे एकटे उडतात आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात.
अर्ध्यातच हार मानणारे
कधी यशाचं शिखर पार करू शकत नाही.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे
नाही तर लांबूनच सलाम आहे
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे.
ज्या पायांना पूर्वीपासून ऊन-वारा-पाऊस-पाणी
यांच्याशी संघर्ष करायची सवय असते
अशी पावले शेवट पर्यंत कधीही थकत नाही.
काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी,
विचारांवर विश्वास ठेवावा
आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.

Marathi Quotes on Life

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
ज्यांची वेळ खराब आहे
त्यांच्याबरोबर माणसाने जरूर राहावे
पण ज्याची नियतच खराब असते
त्याची सोबत सोडणेच चांगले असते.
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य
ध्येय उंच असले की
झेप देखील उंचच घ्यावी लागते.
संघर्ष वडिलांकडून आणि संस्कार आईकडून शिकावे
बाकी सगळं दुनिया शिकवते.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
अडचणीत असतांना अडचणींपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

आयुष्य स्टेटस मराठी

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
जे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात
त्या अतिशहाण्यांना समजावण्यात
कधीच वेळ वाया घालवू नये.
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
संकटं तुमच्यातली शक्ती
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे
समोरच्यावर टीका करणं.

Marathi Thoughts on Life

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा
स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा
आयुष्यात कधीच पश्र्चाताप होणार नाही.
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील
वादळे अधिक भयानक असतात
ती निर्माण होऊ देऊ नका.

Life Status in Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली
यावरून मोजता येते.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ
चांगली पाने मिळणे
 आपल्या हातात नसते
पण मिळालेल्या पानांवर
 चांगला डाव खेळणे
यावर आपले यश अवलंबून असते.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत
ते मिळवावे लागतात.
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते.
कुणाच्याही दुःखाचा
 अनादर करू नये
प्रत्येकजण आपापल्या
 संकटांशी झगडत असतो
काहींना आपल्या वेदना लपवता येतात
काहींना नाही.

Marathi Thoughts on Life

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
लोक बदलत नाहीत
बस त्यांच्या आयुष्यात
आपल्यापेक्षा चांगलं कोणीतरी येतं.
खोटं बोलणाऱ्या
, फसवणाऱ्या
व अपमान करणाऱ्या
लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं
राहिलेलं बरं.
स्वत:च्या स्वार्थासाठी
दुसऱ्याचा वापर कधी करु नका
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
आयुष्यातले काही क्षण
हे एकांतात
 घालवत जा
सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील
कारण, तिथेच आपला संवाद फक्त
आणि फक्त स्वतःशी होतो.
मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
यश न मिळणे याचा अर्थ
अपयशी होणे असा नाही.

Best Marathi Instagram Status on Life

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
आपली वाटणारी माणसंच जेव्हा
आपला message वाचूनही reply देत नाहीत
तर बकीच्यांकडून काय अपेक्षा करावी.
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून
त्याच्या भविष्याची टर उडवू नका
कारण, काळ इतका ताकदवान आहे कि
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो.
तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे.
उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.
पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात
आणि पायात काटे टोचतात म्हणून
खाली पाहत चालावे तर वाटच चुकते
प्रवासाची दिशाच बदलून जाते
कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.

Life Quotes In Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
या जगात सगळ्या गोष्टी सापडतील पण
आपण स्वतःकेलेल्या चुका कधीच नाय सापडणार.
जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर
तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते
दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते
कधीच उभे राहू शकत नाही.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त
एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

बेस्ट जीवन स्टेटस मराठी

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
बुद्धिबळ खेळताना सुद्धा
एखादी चाल मागे घ्यावी लागते
अगदी तसंच आहे आयुष्याचं
आयुष्यात वाटचाल करताना कधी कधी
काही पाऊले मागे वळवावी लागतात.
दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे.
दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता,
तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.
यशाजवळ पोहोचण्यासाठी
कधीही शॉर्टकट नसतो.
डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

Life Quotes In Marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi
वाईट वाटते जेव्हा आपण चुका करतो
पण सगळ्यात जास्त तेव्हा वाटते की
त्या चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.
माणसानं राजहंसासारखं असावं
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं
नाही ते सोडून द्यावं.
जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
जीवनातला अंध:कार नाहीसा
करणारी ज्योत म्हणजे हास्य
प्रवासावरुन केव्हा परतावे
हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.
जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला
माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो.
प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी
कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
किती दिवसाचे आयुष्य असते
आजचे अस्तित्व उद्या नसते
मग जगावं ते हासून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कुणालाच माहित नसते.

मराठी जीवन सुविचार

आपल्या आयुष्यात
एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका
कारण जेव्हा ते बदलतात
तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग
कमी पण स्वतःचा जास्त राग येतो
प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे
जे आपल्याशी वाईट वागतात
त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे
ते चांगले आहेत म्हणून नाही
तर आपण चांगले आहोत म्हणून.
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात
ते महत्वाचं नाही
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत
याला महत्व आहे.
झाडासारखे जगा खूप उंच उडा
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात
तो कधीही एकटा नसतो.
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात
तो कधीही एकटा नसतो.

Marathi Status on Life

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे
तो त्यालाच मिळतो
जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे
कौतुक प्रेरणा देते
तर टीका सुधरण्याची संधी देते.
विश्वास एखाद्यावर इतका करा की
तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी समजतील.
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे किंवा
उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप
जगाला काय आवडते ते करू नका
तुम्हाला जे वाटते ते करा
कदाचित उद्या तुमचे वाटणे
जगाची “आवड” बनेल.
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
पण शूर माणसे एकदाच जन्मतात
आणि एकदाच मरतात.
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला
तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
जीवनात काहीच
कायमस्वरूपी नसते.
नाही चांगले दिवस
नाही वाईट दिवस.
प्रेमळ माणसं ही
इंजेक्शन सारखी असतात
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही
पण उद्देश तुमची
काळजी घेणं हाच असतो.

मराठी जीवन विचार

अज्ञानाची फळे नश्वर असतात
ती सकाळी जन्माला येतात
आणि सायंकाळी नष्ट होतात.
अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना
काही किंमतच उरली नसती.
गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही
कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते
इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते.
योग्य निर्णय घ्यायचे
 तर हवा अनुभव
जो मिळतो
चुकीचे निर्णय घेऊनच
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
कर्तव्य, कर्ज, उपकार
या ती गोष्टींचं कधीच विस्मरण
होऊ देऊ नये.

Quotes on Life in Marathi

आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय.
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल
तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
कधी कधी संकटे आली की
२ पावले मागे सरकनेच हिताचे असते
वाघ २ पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे
तर पुढे झेप घेण्यासाठी.
जग नेहमी म्हणते
चांगले लोक शोधा आणि
वाईट लोकांना सोडा
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात
लोकांमध्ये चांगले शोधा व
वाईट दुर्लक्षित करा कारण
कोणीही सर्वगुण संपन्न
जन्माला येत नाही!
जेव्हा काही लोक आपली
फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा
कारण एका मेणबत्तीची आठवण
फक्त अंधार झाल्यावरच येते.
जीवनात सुख दुःख दोन्ही
आपण स्वीकारलेच पाहिजेत
कारण ती आपण
निर्माण केलेली आहेत
हे सूत्र लक्षात घेतले तर
मनुष्य सरळ वागू शकेल.

जीवन सुविचार मराठी

जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही
१) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली
२) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि
३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले.
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची
फक्त दोनच कारणे असतात
एकतर आपण
विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी
फक्त विचारच करीत बसतो.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
जीवन जगण्याची कला हीच
सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.

Life Quotes In Marathi

अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे
आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे
खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो
तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
विचार कराण्यासाठी वेळ द्या
पण एकदा का कृती करण्याची वेळ
आली की विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
आवड असली की
सवड आपोआप मिळते.
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.
लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
जो धोका पत्करण्यास कचरतो
तो लढाई काय जिंकणार !

Best Status on Life in Marathi

असं काम करा की
नाव होऊन जाईल
नाही तर, असं नाव करा की
लगेच काम होऊन जाईल.
सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
छोट्या या आयुष्यात
खूप काही हवं असतं
पण पाहिजे तेच मिळत नसतं
असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा
आपलं आभाळ मात्र रिकामं असतं
हव्या असलेल्या सगळ्याच गोष्ट
माणसाला मिळत नसतात
पण न मिळणाऱ्या गोष्टीच
माणसाला का हव्या असतात
ताकदीची गरज त्यांनाच लागते
ज्यांना काही वाईट करायचे असते
नाही तर जगात सर्व काही
मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते
कारण प्रेमानेच जग जिंकता येते.
भूतकाळाच्या आठवणीत रमून
भविष्याची चिंता करणे
याला मूर्खपणा म्हणतात.
झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात.

Marathi shayari on Life

चुकीच्या निर्णयामुळे
आपला अनुभव वाढतो
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास
म्हणून निर्णय बरोबर कि चूक
याचा विचार करायचा नाही
निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं.
फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते
पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते
आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा.
माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो
परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो.
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक
जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.
भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर
आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो
म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून
पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे.
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे
फुकट मिळालेला वेळ नव्हे
आयुष्य एक कोडे आहे
सोडवाल तितके थोडे आहे.

Life Quotes In Marathi

आयुष्यात कोणत्याही मुलीचा
हात धरायला
हिम्मत लागत नाही
हिम्मत लागते ती
तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला.
कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी
त्रास करून घ्यायचा की नाही
हे आपल्याच हातात असते.
हसण्याची इच्छा नसली तरी
हसावे लागते
कसे आहे विचारले तर
मजेत म्हणावे लागते
जीवन एक रंगमंच आहे
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.
इच्छा किती विचित्र गोष्ट आहे
पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो
आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो.
आयुष्यात एकदा तरी
“वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
“चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही
कोणीतरी बर्फाला विचारले
आपण एवढे थंड कसे
बर्फाने अगदी छान उत्तर दिले
माझा भूतकाळ पण पाणी
आणि भविष्यकाळ पण पाणीच
मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ
आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा
माणसाच्या मुखात गोडवा
मनात प्रेम, वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरिबीची जाण
असली की, बाकी गोष्टी
आपोआप घडत जातात.

Life Quotes In Marathi

प्रेमाने जोडलेली चार माणसे
आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द
हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत.
विश्वास ठेवा
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगलं घडत असतं
इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं.
आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा
कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते
आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे
कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका
नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.
जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो
तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो.

Life Status In Marathi

आयुष्यातील सर्वात सोपा नियम
जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते
ते इतरांसोबत करू नका.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा
आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की
हे तुला कधीच जमणार नाही.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
एवढेच करा
चुकलं तेव्हा माफी मागा
आणि कुणी चुकलं तर माफ करा.
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते
त्यांचा तिरस्कार कधीच करू नका
कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
सरकारी बसमध्ये बसायला – नको
(Government) सरकारी शाळेत शिक्षण – नको
सरकारी दवखाण्यात उपचार – नको
मुलीला मात्र नवरा फक्त
“सरकारी नोकरीवालाच पाहिजे”
किती दिवसाचे आयुष्य असते
आजचे अस्तित्व उद्या नसते
मग जगावं ते हासून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कुणालाच माहित नसते.
आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

आयुष्य स्टेटस मराठी

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते
तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता
तुमचा हात रिकामा करीत असते.
तुम्हाला मोठेपणी कोण
व्हायचंय ते आजच ठरवा आत्ताच
जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
या जगात कुणीही आपला मित्र किंवा
शत्रू म्हणून जन्माला येत नाही
आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती
यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
आवड आणि आत्मविश्वास
असेल तर कोणतीही
गोष्ट अवघड नाही.
जीवन चहा बनवण्यासारखे आहे
अहंकाराला उकळू द्या
चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या
दुखणं विरघळून जाऊ द्या
चुकांना गाळून घ्या आणि
सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.

Whatsapp Status on Life In Marathi

दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक
करायलाही मन मोठं लागतं.
स्वतःच्या हिमतीवर
मेहनत करून जगण्यात
जी मजा आहे ती इतर
कशातच नाही.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
रात्र नाही स्वप्नं बदलते
दिवा नाही वात बदलते
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.
किती त्रास द्यावा एखाद्याला
यालाही काही प्रमाण असते
आपल्यावरूनच विचार करावा
समोरच्यालाही मन असते.

Instagram Status on Life In Marathi

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न
पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर?
दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे
स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका
कारण उत्तम दिवस आठवणी देतात
चांगले दिवस आनंद देतात
वाईट दिवस अनुभव देतात
तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात.
असं काम करा की
नाव होऊन जाईल
नाही तर, असं नाव करा की
लगेच काम होऊन जाईल.
प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका
कारण, प्रेम प्रत्येकावर करता येत नाही
आणि, विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.
प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल
पण शत्रू निर्माण करू नका.

Life Quotes In Marathi For Instagram

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
केवळ ज्ञान असून उपयोग नाही
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
आवडतं तेच करू नका
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
परिस्थितिला शरण न जाता
परिस्थितीवर मात करा.
जग भित्र्याला घाबरवते
आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
आपला जन्म होतो तेव्हा आपण
रडत असतो आणि लोक हसत असतात
मरतांना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील!
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस

Instagram Caption On Life in Marathi

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य
तलवार असते तोवरच टिकतं.
ऐकणं महत्वाचं आहेच
पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते
आचरणात आणणं
किती ऐकलं यापेक्षा आचरणात
किती उतरवलं, यावरच माणसाचं
यशापयश अवलंबून असतं.
आयुष्यात प्रेम करा
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
स्वतःची चूक स्वतःला कळली की
बरेच अनर्थ टळतात.
एकमेकांविषयी
 बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोलण्याने
 वाद मिटतात.
एखाद्याला गुन्हेगार ठरवितांना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
जगू शकलात तर चंदनासारखे जगा
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
दु:ख कवटाळत बसू नका
ते विसरा आणि सदैव हसत रहा.
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.

Life Quotes In Marathi

तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.
पाप ही अशी गोष्ट आहे
जी लपवली की वाढत जाते.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
आपले सौख्य हे
आपल्या विचारांवर अवलंबून असते.
कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.

Life Quotes In Marathi

चिंता हा कुठल्याही दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
अशा माणसाला कधीच गमावू नका
ज्याच्या मनात तुमच्याविषयी
आदर, काळजी आणि प्रेम असेल.

हे देखील वाचा : Smile Quotes in Marathi

तर मित्रांनो Best Life Quotes In Marathi – 600+ मराठी स्टेटस जीवन हा संग्रह जर आपणाला आवडला असेल तुम्हाला हवे असणारे Best Life Status in Marathi लाइफ स्टेटस मराठी ह्या संग्रहातून मिळाले असेल तर खाली नक्की Comment करा आणि आपल्या Friends आणि Family सोबत नक्की शेअर करा सोबतच आम्हाला Instagram वर फॉलो करायला विसरू नका.

Leave a Comment