कस्टम ड्यूटी म्हणजे काय? | Custom duty meaning in marathi

custom duty meaning in marathi कस्टम ड्युटी हा एक प्रकारचा कर म्हणजेच टॅक्स असतो जो की वस्तूंवर लावला जातो ज्या एका देशातून दुसऱ्या देशात आयात-निर्यात केल्या जातात. हे कस्टम ड्युटी चार्जेस आयात आणि निर्यात अशा दोन्ही व्यापारावर लावले जातात.

कस्टम ड्यूटी म्हणजे काय? Custom duty meaning in marathi :

कस्टम ड्यूटी म्हणजे काय? | Custom duty meaning in marathi image
कस्टम ड्यूटी म्हणजे काय? Custom duty information in marathi

हे सर्वस्वी देशातील केंद्र सरकार ठरवत असते की बाहेरील देशांतून आयात होणाऱ्या मालावर किती आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्यूटी लावायची. तसेच एक्सपोर्ट म्हणजेच निर्यात होणाऱ्या मालावर किती निर्यात शुल्क लावले जावे.

देशांतर्गत वाहतूक विभागातील लोकांना तसेच व्यापाऱ्यांना या संकल्पना माहिती असतात कारण जेव्हा पण त्यांना एका देशातून वस्तू आयात किंवा आपल्याकडील वस्तू दुसऱ्या देशात निर्यात करायच्या असतात तेव्हा त्यासाठी त्यांच्याकडून जादाचे शुल्क आकारले जाते.

या १० टिप्स फॉलो करा आणि शेअर मार्केटमधून भरपूर पैसे कमवा

प्रत्येक देश हा वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे आयात निर्यात शुल्क आकारत असतात. हा एक प्रकारे अप्रत्यक्ष टॅक्स (indirect tax meaning in marathi) असतो. यामध्ये सेल्स टॅक्स (sales tax), पर युनिट टॅक्स (per unit tax), वॅल्यू ॲडेड टॅक्स (value added tax) तसेच वस्तू आणि सेवांवरील टॅक्स म्हणजेच GST इत्यादींचा समावेश होतो.

• इम्पोर्ट ड्यूटी म्हणजे काय? import duty meaning in marathi :

जे शुल्क इम्पोर्ट म्हणजेच आयात केलेल्या सामानावर लावला जातो त्याला इम्पोर्ट ड्युटी (import duty meaning in marathi) असे म्हटले जाते. उदाहरणार्थ समजा आपण दुबई वरून एक स्मार्टफोन मागवून घेतला तर आपणाला त्याचे पूर्ण शुल्क तर द्यावेच लागेल शिवाय ते सोडून त्यावर आणखी काही किंमत इम्पोर्ट ड्युटीच्या स्वरूपात द्यावी लागेल. यालाच कस्टम ड्युटी (custom duty meaning in marathi) म्हटले जाते.

परंतु अशाही अनेक कंपन्या असतात की ज्या सर्व प्रकारचे टॅक्स समाविष्ट करून ग्राहकांना मालाचा पुरवठा करत असतात. जेणेकरून ग्राहकांना एका वेळी एकच किंमत मोजावी लागते ज्यामध्ये सर्व टॅक्स समाविष्ट केले गेलेले असतात.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २६५ च्या अंतर्गत इंडियन कस्टम ॲक्ट १९६२ (Indian custom act 1962) मध्ये लागू केला गेला. कस्टम ड्युटी लावण्याचा मुख्य उद्देश हा असतो की कंपनीला त्यातून महसूल उभा करता यावा जेणेकरून त्यांना आपल्या देशातील उद्योगाचे जतन करता येईल. तसेच आपल्या देशात रोजगार निर्मिती व्हावी हा देखील या मागचा उद्देश असतो.

• एक्सपोर्ट ड्यूटी म्हणजे काय? export duty meaning in marathi :

जो टॅक्स एक्सपोर्ट म्हणजेच निर्यात होणाऱ्या मालावर लावला जातो त्याला एक्सपोर्ट ड्युटी (export duty meaning in marathi) म्हटले जाते. एक्सपोर्ट ड्युटी चार्जेस यासाठी लावले जातात कारण एक्सपोर्ट करणाऱ्या देशाला स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचे जतन करता यावे. अनेक वेळा बाहेरच्या देशांत मागणी जास्त असल्या कारणाने अनेक लोक आपल्या देशातील वस्तू आणि मालाची दुसऱ्या देशात निर्यात करतात. कालांतराने त्या वस्तू आणि मालाची कमी आपल्याच देशात भासते. अशी परिस्थिती होऊ नये म्हणून एक्सपोर्ट चार्जेस लावले जातात..

कमी पैशांत सुरू होणार हे काही व्यवसाय नक्की पहा

प्रामुख्याने कस्टम ड्यूटी चार्जेस लावून कोणताही देश आपल्या देशातील उद्योग, व्यवसाय तसेच रोजगार वाचवत असतो जेणेकरून प्रतिस्पर्धी येऊ नये. हे इम्पोर्ट टॅक्स हे कोणता देश कोणत्या देशाकडून किती प्रमाणत माल घेत आहे यावर अवलंबून असतो. हे प्रमाण वेळेनुसार सतत बदलत असते.

अर्थशास्त्रीय भाषेत पहायचं झालं तर आपण या ड्युटीला एक प्रकारचे उपभोग शुल्क म्हणू शकतो जो की वस्तू आणि सेवांवर लावला जातो. भारतातील कस्टम ड्यूटी (custom duty india) पहायची झाल्यास भारतात स्मार्टफोन्स वर २९.८%, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर २६.८५% तसेच सोने आणि चांदीवर ७.५% इतके इम्पोर्ट ड्युटी शुल्क आकारले जाते. हे प्रमाण वेळोवेळी बदलत असते.

Read also :

Custom Duty India

Tags : कस्टम ड्यूटी म्हणजे काय, custom duty meaning in marathi, import duty meaning in marathi, export duty meaning in marathi, custom duty india, indirect tax meaning in marathi, custom duty information in marathi

1 thought on “कस्टम ड्यूटी म्हणजे काय? | Custom duty meaning in marathi”

Leave a Comment