डूडल फॉर गूगल म्हणजे काय? Doodle For Google in Marathi

डूडल फॉर गूगल doodle for google in marathi गूगल हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. गूगल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन search engine आहे. सध्याच्या काळात इंटरनेट म्हणजेच गूगल एवढे हे गूगल लोकप्रिय झालेले आहे.

जगातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी जवळजवळ ९२% लोक हे गुगलचा वापर करत आहेत. मग त्यात कॉम्प्युटर्स असो, लॅपटॉप असो किंवा आपल्या हातातील स्मार्टफोन्स असो प्रत्त्येक प्रकारच्या डिव्हाइसमध्ये गुगलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो.

ज्याप्रमाणे गूगलच्या बाकीच्या सेवा आहेत, प्रॉडक्ट्स आहेत त्याच प्रमाणे गूगल ची डूडल फॉर गूगल Doodle For Google हा गुगलचा एक भाग आहे. पण गूगल डूडल google doodle म्हणजे नक्की आहे तरी काय? या गूगल डूडल ची सुरुवात कधी झाली? आणि या गूगल डूडलचा वापर कुठे आणि कधी केला जातो?

गूगल संबंधीची ही तथ्ये आपणाला माहिती नसतील

google doodle
डूडल फॉर गूगल म्हणजे काय? Doodle For Google in Marathi

गूगल डूडल म्हणजे काय? Doodle For Google in Marathi

डूडल doodle म्हणजे बाकी काही नसून एका विशिष्ट आणि कमी कालावधीसाठी तात्पुरता उपलब्ध केला जाणारा लोगो आहे जो की गूगल द्वारे आपल्या होम पेज वर लावला जातो.

शेअर मार्केटमध्ये सफल होण्यासाठी काही खास टिप्स

आपण बऱ्याच वेळा पाहतो की जेव्हा आपण गूगल सर्च इंजिन उघडतो आणि तेव्हा एखादा सण किंवा उत्सव असेल किंवा त्या दिवशी भूतकाळात एखादी घटना घडलेली असेल तर त्या घटनेच्या किंवा त्या सणाच्या संबंधीचा एक लोगो गूगलच्या मेन लोगो ऐवजी दाखवलेला असतो. त्यालाच गूगल डूडल google doodle म्हटले जाते.

गूगल डूडल doodle for google म्हणजे एखाद्या विशिष्ट देशातील खास प्रसंग, सार्वजनिक सुट्टी, कार्यक्रम, उल्लेखनीय कामगिरी करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व किंवा विविध सण साजरा करण्याच्या उद्देशाने गुगलच्या मुख्यपृष्ठांवर असणाऱ्या लोगोमध्ये केलेले एक विशेष पण तात्पुरते बदल.

Doodle For Google
डूडल फॉर गूगल म्हणजे काय? Doodle For Google in Marathi

उदाहरादाखल पहायचं झालं तर समजा जर आपण २५ डिसेंबर रोजी म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी गूगल ओपन केलं तर आपणाला गूगलच्या लोगो मध्ये ख्रिसमस संबंधी बदल केलेले आढळून येतात. सांताक्लोजची टोपी, ख्रिसमस ट्री, सांताक्लोज व त्याची हरणांची गाडी अशा अनेक गोष्टी त्या लोगो मध्ये अंतर्भूत करण्यात येत असतात.

गूगल डूडलची सुरुवात First Google Doodle

गूगल डूडल google doodle चा सर्वप्रथम वापर हा १९९८ मध्ये केला गेला आणि तेव्हापासून या गूगल डूडलची सुरुवात झाली. गूगलचे संस्थापक Larry Page आणि Sergey Brin हे दोघे एकदा अमेरिकेतील एका सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले असताना त्यांनी आपण काही कारणास्तव बाहेर आहोत हे आपल्या कार्यालयात सांगण्यासाठी एका विशिष्ट रेखाकृतीचा वापर केला. याच घटनेपासून म्हणजेच १९९८ पासून गूगलने हे विविध प्रकारचे गूगल डूडल्स वापरण्यास सुरुवात केली गेली.

The first Doodle, circa 1998. Google
The first Doodle, circa 1998. Google

गूगल कंपनीसाठी हे विविध प्रकारचे डूडल बनवणाऱ्या व्यक्तीला डूडलर doodler असे म्हंटले जाते. Dennis Hwang हे सध्याच्या घडीला गूगलचे मुख्य डूडलर chief doodler of Google असून त्यांच्या अंतर्गत एक चित्रकारांची टीम काम करते जे की वेगवेगळ्या प्रसंगाच्या हिशोबाने वेगवेगळे डूडल्स गूगलसाठी तयार करत असतात. या गूगल डूडल टीम doodle for google team ने आतापर्यंत गूगलच्या जगभरातील मुख्यपृष्ठांसाठी 4000 पेक्षा जास्त डूडल तयार केली आहेत.

गूगल डूडल doodle for google टीम ही गूगल वापरकर्त्यांकडून येणाऱ्या कल्पना ऐकण्यासाठी नेहमीच उत्साही असते. जर एखाद्या वापरकर्त्याच्या डोक्यात एखादी डूडलची कल्पना असेल तर ती कल्पना [email protected] वर ईमेल करता येते जेणेकरून ती गूगल टीमपर्यंत पोहचत असते.

डूडल टीमला दररोज शेकडो विनंत्या प्राप्त होतात जेणेकरुन ते सर्वांना प्रतिसाद देऊ शकत नाही परंतु ते सर्वांच्या डूडल कल्पना पाहत असतात आणि त्यातून चांगल्या कल्पनांची निवड करून त्यांचा वापर त्या त्या प्रसंगी करत असतात.

Leave a Comment