Facts about google in marathi मोबाईल फोन वापरणाऱ्यांपैकी असा कोणीच नसेल ज्याला इंटरनेट बद्दल माहिती नसेल. तसेच ज्याला इंटरनेट माहिती आहे त्याला गूगल माहिती नसेल हे देखील जवळजवळ अशक्यच. गूगल हे आजच्या काळात सर्वात अधिक प्रमाणात वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.
जी-मेल Gmail, यूट्यूब YouTube गूगल मॅप्स Google maps तसेच प्रत्येकाच्या फोन मध्ये असणारा क्रोम वेब ब्राउजर chrome web browser हे सर्व गूगल चे प्रॉडक्ट्स आहेत ज्यांचा आपण दैनंदिन जीवनात सर्रासपणे वापर करत असतो. गुगलचा वापर आणि गरज इतकी वाढली आहे की हल्ली इंटरनेट म्हणजेच गूगल झाले आहे.
म्युचुअल फंड हा नेमका विषय आहे तरी काय?
गूगल ही जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीबद्दल काही तथ्य आहेत जी आपणाला कदाचित माहिती नसतील किंवा फार कमी लोकांना माहिती असतील.
गूगलबद्दल काही रोचक तथ्य Facts about google in marathi
१. सुरुवातीला गूगलच्या संस्थापकांना HTML म्हणजे Hyper Text Markup Language येत नव्हती. याच कारणामुळे गूगलचे होम पेज सुरवातीला एकदम सर्वसाधारण होते. त्याचप्रमाणे गूगलवर सर्च नावाचे बटण देखील नव्हते त्यामुळे कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी कॉम्प्युटरच्या किबोर्डवरचे एंटर बटण दाबूनच सर्च करावे लागत होते.
२. सुरुवातीच्या काळात गूगल google चे नाव हे गुगोल googol हे ठेवण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव त्याच्या स्पेलिंग मध्ये चूक झाली आणि गुगोल चे नाव गूगल झाले.
३. गूगल सर्च पेज बनविणाऱ्या व्यक्तींची नावे Larry Page आणि Sergey Brin अशी आहेत. हे दोघे १९९६ मध्ये कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेत होते.
४. गूगलवर प्रत्येक सेकंदाला जवळजवळ ६० हजार इतके सर्च केले जातात. एका महिन्यात संपूर्ण जगभरात सरासरी सुमारे १०० अब्ज इतके सर्चेस गूगल वर केले जातात.
५. आपण वापरत असणाऱ्या मोबाईल मध्ये असणारे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम android operating system हे सुद्धा गूगलचेच एक प्रोडक्ट आहे. गूगलने २००५ मध्ये जवळजवळ ५० मिलियन डॉलर एवढ्या किंमतीत अँड्रॉइड खरेदी केले होते.
अफिलिएट मार्केटींग मधून हजारों रूपये कसे कमवावे?
६. गूगलवर सर्च करून हवी ती माहिती मिळविण्यासाठी वापरकर्त्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. तरीही गूगल एवढा पैसा कुठून कमावतो? तर गुगलची सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ ९०% कमाई ही गूगल ॲडसेंस google adsense म्हणजेच गूगल प्रॉडक्ट्स वर लावल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून होत असते. गूगल एका सेकंदाला अंदाजे १ लाख ७५ हजार एवढे रुपये कमावतो.
७. गूगलने यूट्यूबला २००६ मध्ये जवळजवळ १.६५ अब्ज डॉलर्स एवढ्या किंमतीत खरेदी केले होते. आज यूट्यूब youtube गूगलला सर्वाधिक पैसे मिळवून देणारं प्रोडक्ट बनलं आहे. यूट्यूबवर प्रत्येक मिनिटाला सरासरी ६० तासांचे व्हिडिओज अपलोड केले जात असतात.
८. गूगलला आपल्या जी-मेल gmail ची कल्पना कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आलेल्या राजन सेठ नावाच्या एका व्यक्तीकडून मिळाली होती.
९. १६ ऑगस्ट २०१३ या दिवशी गूगलचे सर्व्हर्स फक्त ५ मिनिटे बंद झाले होते तेवढ्या वेळात संपूर्ण जगभरातील इंटरनेटचा वापर हा ४०% ने घसरला होता. यावरून आपण अंदाज लावू शकतो की गूगल चा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात आहे.
१०. गूगलने आपले ट्विटरवरील सर्वात पाहिले ट्विट first google tweet हे फेब्रुवारी २००४ मध्ये केले होते. I’m Feeling Lucky म्हणजेच मी खूप नशीबवान आहे असे गूगलने ट्विट केले होते.
११. १९९७ मध्ये गूगल वेबसाईट पहिल्यांदा लाईव्ह केली गेली आणि त्यानंतर २००० मध्ये म्हणजेच अवघ्या ३ वर्षात गूगल जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन बनले होते आणि आजतागायत कायम आहे.
Tags : गूगलबद्दल काही रोचक तथ्य, Facts about google in marathi,google information in marathi, गूगल माहिती,गूगल तथ्य,गूगल ची माहिती