आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ? | How IPL Team Owners Make Money in Marathi ?

How IPL Team Owners Make Money in Marathi? आयपीएल व्यवसायाचे मॉडेल ipl business model कसे कार्य करते किंवा आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात याचा आपण कधी विचार केला आहे का?

आपणाला माहित आहे की आयपीएल संघ बर्‍याच खेळाडूंना मोठमोठ्या किंमतीवर विकत घेतात. उदाहरणार्थ केकेआरने २०२० मध्ये पॅट कमिन्सला तब्बल १५.५ कोटी रुपयांच्या किमतीत विकत घेतले. राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्सला १४.५ कोटी मध्ये खरेदी केले. त्याचप्रमाणे २०१७ मध्ये ग्लेन मॅक्सवेल साठी १०.७५ कोटी, ख्रिस मॉरिस १० करोड.

Vivo IPL 2021 Trailer on Star Sports

परंतु खेळाडूंसाठी एवढ्या जास्त किमती मोजणाऱ्या विजेत्या संघाला केवळ २० कोटी रुपये बक्षिसांची रक्कम आणि उपविजेत्याला १२.५ कोटी रुपये मिळतात. उर्वरित संघांना काहीही मिळत नाही.

गुंतवणूकीच्या तुलनेत तुम्हाला जवळजवळ काहीही न मिळाल्यास इतक्या मोठ्या किंमतीवर आयपीएल संघ विकत घेण्यात काय अर्थ आहे असे आपणाला वाटू शकते. परंतु तसे नसते उलट सर्व आयपीएल संघ मालक भरपूर नफा कमावतात. कसे ते आता आपण पाहू.

कमी पैशांत कोणता व्यवसाय करावा?

आयपीएल ही एक उन्हाळी कालावधीत खेळली जाणारी २० ओव्हर्सची क्रिकेट लीग आहे. ज्यामध्ये भारतातील वेगवेगळी शहरे किंवा वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे आठ वेगवेगळे संघ असतात.

भारतातील क्रिकेटची लोकप्रियता पाहता या लीगची स्थापना बीसीसीआय BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००८ मध्ये केली होती जी आजतागायत चालू आहे. चला तर मग पाहूया ह्या आयपीएल चे व्यवसाय मॉडेल नेमके कसे आहे.

या सर्वाची सुरुवात आयपीएलच्या लिलावापासून होते. आठही संघांना 25 खेळाडूंचे पथक भरण्यासाठी 85 कोटी रुपयांचे बजेट देण्यात येते. त्या 25 खेळाडूंपैकी एक संघ केवळ 8 परदेशी खेळाडूंना खरेदी करण्यास प्रतिबंधित आहे. त्यानंतर सर्व खेळाडूंचे वर्गीकरण त्यांच्या वैशिष्ट्यानुसार केले जाते, जसे की फलंदाज, वेगवान गोलंदाज, फिरकीपटू, अष्टपैलू आणि विकेट कीपर.

अंबानी नंतरचे भारतातील सर्वात महागडे घर

प्रत्येक खेळाडू स्वत:साठी मूलभूत किंमत ठरवितो त्या किंमतीच्या वर त्याच्यासाठी बिडिंग उघडते. एकदा लिलाव झाल्यावर आणि संघ तयार झाल्यावर प्रश्न उरतो की संघ कसे उत्पन्न मिळवतात आणि त्यांच्या गुंतवणूकीच्या बदल्यात आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात?

आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात? How IPL Team Owners Make Money in Marathi?

मीडिया प्रसारण हक्क Broadcasting Rights

असे अनेक स्रोत आहेत ज्यातून आयपीएल संघ महसूल उत्पन्न करत असतात. त्यापैकी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे प्रसारण हक्क Broadcasting Rights. संघाच्या एकूण उत्पन्नाच्या 60 टक्के उत्पन्न फक्त या एका मध्यामातून येते.

भरपूर पैशाच्या मोबदल्यात बीसीसीआय हे टीव्ही वाहिन्यांकडे प्रसारणाचे हक्क विकते. मिळवलेल्या रकमेतील बीसीसीआय काही प्रमाणात स्वतःचा वाटा म्हणून ठेवते आणि उर्वरित रक्कम संघांना वाटत असते.

भविष्यात हमखास श्रीमंत होण्याचा मार्ग – एसआयपी गुंतवणूक

उदाहरणार्थ, २००८ ते २०१७ या काळात सोनी एंटरटेन्मेंटने ८२०० कोटी रुपयांत आयपीएल प्रसारण हक्क विकत घेतले ज्यामध्ये त्यांना प्रत्येक सीझन साठी तब्बल ८२० कोटी इतकी रक्कम मोजावी लागली. तसेच सन २०१८ पासून २०२२ पर्यंत स्टार इंडियाने १६,३४७ कोटी रुपयांच्या आयपीएल मीडिया अधिकारांचा हक्क संपादन केला जो प्रति सीझन ३२७९ कोटी रुपये इतका आहे.

महसुलात झालेल्या या मोठ्या वाढीचा परिणाम प्रत्येक संघाला चांगला नफा मिळण्यासाठी होत असतो.

ब्रँड प्रायोजकत्व Brand Sponsorships

दुसरा मुख्य स्त्रोत म्हणजे ब्रँड प्रायोजकत्व म्हणजेच ब्रँड स्पॉन्सरशिप Brand sponsorship. आपण क्रिकेट मध्ये पाहतो की खेळाडूंनी घातलेल्या जर्सी वर अनेक प्रकारच्या ब्रँड्सचे लोगो आणि नावे असतात.

आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ? | How IPL Team Owners Make Money in marathi ?
आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ? | How IPL Team Owners Make Money in Marathi?

हे प्रायोजक खेळाडूंच्या जर्सीवर आपल्या ब्रँडचे लोगो आणि नाव देण्यासाठी संघात पैसे गुंतवतात जेणेकरून या संघाच्या संपूर्ण कमाई पैकी सुमारे २० ते ३० टक्के कमाई होते.

शीर्षक प्रायोजकत्व Title Sponsorship

आणखी एक महत्त्वाचा स्त्रोत शीर्षक प्रायोजकत्व म्हणजेच टायटल स्पॉन्सरशिप title sponsorship आहे. आयपीएलच्या प्रारंभापासून विविध शीर्षक आणि नावे उपसर्ग म्हणून वापरलेली आपण पाहिली आहेत.

आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ? | How IPL Team Owners Make Money in marathi ?
आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ?
How IPL Team Owners Make Money in Marathi? trendingmarathi.in

My Favourite Sportsman Essay For Students

जसे की डीएलएफ आयपीएल, व्हिवो आयपीएल, पेप्सी आयपीएल आणि आता ड्रीम11 आयपीएल. या लीगच्या आतापर्यंतच्या शीर्षक प्रायोजक असलेल्या काही कंपन्या आहेत. या टायटल स्पॉन्सरशिप साठी त्यांना बीसीसीआय ला चांगली रक्कम द्यावी लागते.

तिकिट विक्री

तिकीट विक्री हा देखील त्या त्या शहरातील किंवा राज्यातील स्थानिक संघांच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत असतो.

समजा मुंबई इंडियन्स ची मॅच वानखेडे स्टेडियम वर असेल तर त्या स्टेडियमला मुंबईचे होम ग्राउंड म्हटले जाते. आणि त्या सामन्यासाठी होणाऱ्या तिकिट विक्रीतून मिळालेली रक्कम मुंबई इंडियन्स आणि वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड मॅनेजमेंटमध्ये वितरित केली जाते. हे प्रत्येक संघासाठी आणि त्यांच्या होम ग्राउंड साठी लागू होते.

मालाची विक्री Merchandise Sale

संघाशी निगडित उत्पादने Merchandise विकणे हा देखील संघाच्या उत्पन्नाचा एक स्रोत असतो. प्रत्येक संघ त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी ते आपले टी-शर्ट्स, कॅप्स, मनगटी घड्याळे इत्यादी उत्पादने विकण्याचा प्रयत्न करतो. आयपीएल संघ यामधून देखील काही पैसे कमवतात.

स्टॉल भाडे

संघ मालक आणि होम ग्राउंडसाठी पैसे कमविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे स्टॉल भाडे. आयपीएल सामन्यादरम्यान विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्याचे अधिकार कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर दिले जातात. या कराराद्वारे मिळवलेल्या उत्पन्नाचा एक भाग होम टीममध्ये जातो.

पारितोषिकाची रक्कम

सर्व संघ हे विजेतेपदासाठी खेळत असतात तरी देखील त्यातून मिळणारी पारितोषिकाची रक्कम हा संघ मालकासाठी सर्वात कमी महत्त्वाचा इन्कम असतो. ज्यामध्ये विजेत्यासाठी २० कोटी रुपये आणि उपविजेत्यासाठी १२.५ कोटी रुपये बक्षिसाच्या रुपात मिळत असतात.

आता आपण माहिती करून घेतले की कसे हे आयपीएल संघ विविध मार्गांनी उत्पन्न मिळवत असतात. परंतु हे संघ जेवढी जास्त कमाई करत असतात तेवढेच त्यांचे खर्च देखील असतात. त्यांचा सर्वात मोठा खर्च म्हणजे प्रत्त्येक संघाला त्याच्या संपूर्ण नफ्यामधील २०% रक्कम ही बीसीसीआय ला द्यावी लागते. जो की बीसीसीआय च्या उत्पन्नाचा स्त्रोत असतो.

त्याशिवाय संघाला खेळाडूंची फीस, प्रशिक्षकांचे शुल्क, सहाय्यक कर्मचार्‍यांचे वेतन आणि पेमेंट, प्रवासाचा खर्च, हॉटेलचे दर आणि परिचालन खर्च द्यावे लागतात. तसेच विविध ब्रँड्स कडून प्रायोजकत्व मिळवण्यासाठी आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी संघांकडून ज्या जाहिराती आयोजित केल्या जातात त्यांचा देखील खर्च करावा लागतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करून देखील हे संघ मालक आयपीएल च्या प्रत्येक हंगामात भरपूर पैसे कमावतात.

या उपक्रमाचे काही चांगले परिणाम देखील आपणांस पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बीसीसीआयने काही वर्षांपूर्वी असा दावा केला होता की २०१५ च्या आयपीएलच्या हंगामाने भारतीय जीडीपीला जवळजवळ ११.५ अब्ज रुपयांचे योगदान दिले आहे.

त्याशिवाय यामुळे विविध सहाय्यक रोजगार निर्माण होतात, शहरांमध्ये पायाभूत सुविधा विकसित केल्या जातात. हंगाम संपेपर्यंत आयपीएल चे सामने हे लोकांसाठी एक मनोरंजनाचे नवीन साधन बनत असते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे नवीन उदयास आलेल्या क्रिकेटपटूंना सर्वोत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देते जेणेकरून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सकडून नवीन तंत्र शिकण्याची संधी मिळते.

Tags : आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ? | How IPL Team Owners Make Money in Marathi? Vivo IPl 2021 Business Model


Leave a Comment