इस्रो या संस्थेची माहिती – ISRO Information in Marathi मराठी

ISRO information in marathi भारताला विकासाकडे नेण्यासाठी एका अशा संस्थेची आवश्यकता होती जी अंतराळाच्या संदर्भातील विविध माहिती गोळा करेल आणि त्या माहितीवर आधारित संशोधन करेल आणि भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याचा प्रयत्न करेल.

ज्याद्वारे भारताला इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या विविध देशांशी स्पर्धा करता येईल आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधांचे जाळे संपूर्ण भारतभर पसरवणे शक्य होईल जेणेकरुन त्या तंत्रज्ञानाद्वारे भारत विकसित देशाच्या शिखरावर पोहोचू शकेल. इस्रो या संस्थेने ही कमतरता पुर्णपणे भरून काढली.

आतापर्यंत भारतात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जेवढा विकास झाला आहे त्यामध्ये इस्रो या संस्थेचा मोठा वाटा आहे. तर मग पाहूया नक्की हे इस्रो म्हणजे काय? इस्रोे ची स्थापना कधी झाली? आणि इस्रो या संस्थेची माहिती ती ही आपल्या मराठी ISRO information in marathi भाषेत.

इस्रो या संस्थेची माहिती मराठी – ISRO Information in Marathi

ISRO Information in Marathi - ISRO logo
ISRO Information in Marathi – ISRO logo

इस्रो चा फुल फॉर्म Full form of ISRO in Marathi

ISRO या शब्दाचा पूर्ण अर्थ full form of ISRO हा Indian Space Research Organisation असा आहे. इस्रो ISRO ला हिंदीमध्ये “भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन” या नावाने तर मराठी मध्ये ISRO ला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या नावाने ओळखले जाते.

इस्रो म्हणजे काय ? ISRO Meaning in Marathi

ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था Indian Space Research Organisation. ही एक भारतीय संघटना आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील क्षमतेला अधिक मजबूत करण्यात तसेच अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि त्याच्या विकासात इस्रो ISRO चे मोठे योगदान असते.


कस्टम ड्यूटी म्हणजे काय?

NDMA म्हणजे नेमकं काय ?

DRDO हे नक्की आहे तरी काय?

अगदी कमी गुंतवणुकीत सुरू होणारे हे व्यवसाय तुम्ही करू शकता


इस्रो ISRO या अंतराळ संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी डॉ. विक्रम साराभाई यांनी केली. इस्रो ही भारत सरकारची अंतराळ विभागाच्या अंतर्गत असणारी एक संघटना आहे जी अवकाशा संबंधित संशोधन करत असते आणि उपग्रह आणि तंत्रज्ञानाची निर्मिती करत असते. इस्रो द्वारा संशोधन केल्या गेलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर विविध विकास कामांसाठी तसेच आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी केला जात असतो जेणेकरून भारताला अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते.

भारत देशात होणाऱ्या वेगवेगळ्या अंतराळ संशोधन आणि प्रक्षेपण कार्यक्रमांसाठी इस्रो जबाबदार असते. इस्रो या संस्थेची संपूर्ण भारतात अनेक केंद्रे आहेत जेथे संशोधन आणि अवकाश तंत्रज्ञान विकसित केले जात असते. इस्रोच्या यशस्वी वाटचालीमुळे भारत स्वतः सॅटलाइट्स आणि विविध अंतराळ उपकरणे बनवून त्यांना अंतराळ कक्षेत स्थापित करणारा जगातला सहाव्या क्रमांकाचा देश बनला आहे.

विविध देशांचे तसेच खाजगी कंपन्यांचे उपग्रह आणि उपकरणे अंतराळ कक्षेत स्थापित करून इस्रो उत्पन्न मिळवत असते.

इस्रो ची स्थापना When was ISRO established

१९६२ साली भारत देशाने अंतराळ संशोधनासाठी एका संस्थेची स्थापना केली गेली ज्या संस्थेला Indian National Committee for Space Research संक्षिप्त स्वरूपात INCOSPAR म्हणजेच भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समिती हे नाव देण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.विक्रम साराभाई यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर १९६९ मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांच्या पुढाकाराने या समितीचे नाव बदलून इस्रो ISRO ठेवण्यात आले.

यानंतर १९७२ मध्ये जेव्हा भारत सरकारने अंतरिक्ष आयोग म्हणजेच Space Commission तसेच अंतरीक्ष विभाग म्हणजेच Department of Space ची स्थापना केली तेव्हा इस्रो ISRO ला यांच्या अंतर्गत समाविष्ट केले गेले.

इस्रो चे मुख्यालय Headquarters of ISRO in India

इस्रो म्हणजेच Indian Space Research Organization चे मुख्य कार्यालय हे देशाची सिलिकॉन व्हॅली silicon valley of India म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाटक राज्यातील बँगलोर बँगलोर bangalore या ठिकाणी आहे.

इस्रो चे अध्यक्ष Chairman of ISRO 2021

वर्तमानकाळात इस्रो चे प्रमुख अध्यक्ष डॉ. के. शिवन Dr. K. Sivan हे आहेत. त्यांचे पूर्ण नाव हे Kailasavadivoo Sivan असून त्यांना Rocket Man of India असे देखील म्हटले जाते. इस्रो ISRO मध्ये एकूण १७ हजारांहून अधिक कामगार कार्यरत आहेत.

Chairman of isro - ISRO Information in Marathi
Chairman of isro – ISRO Information in Marathi

इस्रो ची प्रमुख केंद्रे Main ISRO Centers in India

देशातील एक प्रमुख अंतराळ संशोधन संस्था होण्याच्या नात्याने इस्रो ने संपूर्ण देशभरात आपली वेगवेगळी केंद्रे सुरू केली आहेत. ज्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात अंतराळ क्षेत्रातील संशोधन हे सुरू असते. याशिवाय इस्रो ने अनेक ठिकाणी आपल्या प्रयोगशाळा तसेच संशोधन विभाग स्थापित केले आहेत.

50th launch of #PSLV By ISRO
50th launch of #PSLV By ISRO – ISRO Information in Marathi : Img By ISRO
  • Vikram Sarabhai Space Centre – VSSC
  • Liquid Propulsion Systems Centre – LPSC
  • Satish Dhawan Space Centre – SDSC SHAR
  • U R Rao Satellite Centre – URSC
  • ISRO Propulsion Complex – IPRC
  • Space Applications Centre – SAC
  • National Remote Sensing Centre – NRSC
  • ISRO Telemetry, Tracking and Command Network ISTRAC
  • ISRO Inertial Systems Unit – IISU
  • Laboratory for Electro-Optics Systems – LEOS
  • Development and Educational Communication Unit – DECU
  • Indian Institute of Remote Sensing – IIRS
  • Master Control Facility – MCF
  • Department of Space and ISRO HQ
  • Antrix Corporation Limited
  • NewSpace India Limited – NSIL

ही इस्रो च्या काही प्रमुख केंद्रांची नावे ISRO centers in India आहेत जी भारताच्या वेगवेगळ्या भागांत स्थापित आहेत.

इस्रो ची कार्ये Functions of ISRO in Marathi

Chandrayaan 2 images ISRO Information in Marathi
Chandrayaan 2 images ISRO Information in Marathi – By ISRO

इस्रो ची काही प्रमुख कार्ये खालीलप्रमाणे आहेत :

• साउंडिंग रॉकेट आणि स्पेस लाँच व्हेईकल्स साठी डिझाईन, विकास आणि त्यांची परिपूर्ती करून त्यांना लाँच करणे.

• दूरसंचार, टेलिव्हिजन प्रसारण, सुरक्षा आवश्यकता आणि सामाजिक अनुप्रयोगांच्या दिशेने राष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यासाठी संप्रेषण उपग्रहाचे डिझाइन, विकास आणि परिपूर्ती करणे.

• नेव्हीगेशनल ॲप्लिकेशन्ससाठी उपग्रह किंवा स्पेस बेस्ड सिस्टमचे डिझाइन, विकास आणि परिपूर्ती करणे.

• अंतराळ विज्ञान आणि ग्रहांच्या निर्मिती संबंधित संशोधन करण्यासाठी अंतराळ यंत्रणेचे डिझाइन, विकास आणि त्यांची पूर्तता करणे.

• नैसर्गिक संसाधनांच्या मॅपिंग आणि देखरेखीसाठी, डिझॅस्टर मॅनेजमेंट सपोर्ट तसेच हवामानशास्त्रीय सेवांसाठी पृथ्वी निरीक्षण उपग्रहांचे डिझाइन, विकास आणि पूर्तता करणे.

• अंतराळ मोहिमेसाठी प्रगत प्रक्षेपण वाहने, स्पेसक्राफ्ट्स आणि ग्राउंड सिस्टमच्या दिशेने संशोधन आणि विकास उपक्रम राबविणे.

• अंतराळातील मालमत्ता आणि पायाभूत सुविधांचे संचालन आणि देखभाल करणे.

• अंतराळाच्या शांततापूर्ण वापरासाठी आंतरराष्ट्रीय सहकार आणि करारांचे पालन करणे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्यास प्रोत्साहित करणे.

• अंतराळ संशोधन उपक्रम राबविण्यासाठी मानव संसाधन आणि क्षमता वाढवणे.

• VSSC, तिरुअनंतपुरम येथे रॉकेट लाँचर तयार केले जाते.

• URSC, बंगळुरू येथे उपग्रह डिझाइन आणि विकसित केले जातात.

• उपग्रह आणि क्षेपणास्त्र SDSC, श्रीहरीकोटा येथे एकत्रित आणि प्रक्षेपित केले जातात.

• LPSC, येथे कमी-तापमानात द्रवपदार्थ विकसित केले जातात.

• SAC, अहमदाबाद येथे संप्रेषण आणि रिमोट सेन्सिंग उपग्रहांसाठी सेन्सर आणि अवकाश तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

• NRSC, हैद्राबाद येथे रिमोट सेन्सिंग डेटा अधिग्रहण, प्रक्रिया आणि वितरणाचे कार्य केले जाते.

इस्रोची प्रमुख कामगिरी ISRO Achievements in Marathi

ISRO च्या 50 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मोठे यश संपादन केले, त्यातील मुख्य म्हणजे पुढीलप्रमाणे :

  • 19 एप्रिल 1975 रोजी प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांनी उपग्रह प्रक्षेपित केला. त्याला ‘आर्यभट्ट’ असे नाव देण्यात आले आणि ते रशियन शास्त्रज्ञांच्या मदतीने प्रक्षेपित केले गेले. या प्रक्षेपणाच्या यशाबद्दल अनेक देशांनी भारत देशाचे अभिनंदनही केले होते.
  • सन 2019 पर्यंत, ISRO द्वारे 105 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक उपग्रह भारताने अमेरिका आणि रशिया सारख्या मोठ्या देशांसाठी तयार केले आणि प्रक्षेपित केले. या उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या बदल्यात इस्रोला ७०० कोटींचा नफा झाला.
  • ISRO ची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे चांद्रयान, ज्यातून त्यांनी 22 ऑक्टोबर 2008 रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान-1 मोहीम प्रक्षेपित केली. हे यान पृथ्वीवरून सोडण्यात आले आणि चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे 5 दिवस लागले आणि ते चंद्राच्या कक्षेत आणले गेले, ज्यामध्ये चंद्राच्या कक्षेत पूर्णपणे स्थापित होण्यासाठी किमान 15 दिवस लागले.
  • चांद्रयान-1 ने 10 महिने यशस्वीरित्या काम केल्यानंतर, अवकाश शास्त्रज्ञांचा चांद्रयान-1 शी संपर्क पूर्णपणे तुटला. त्याला सुमारे 2 वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला होता, परंतु आधीच त्याच्याशी संपर्क तुटला होता. मात्र या अपयशानंतरही चांद्रयान-१ ने त्याचे ९५ ​​टक्के काम आधीच पूर्ण केले होते.
  • चांद्रयान 1 हे भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे यश होते, कारण या यानाने चंद्रावर पाण्याचा शोध लावला आणि तिथे भारताचा ध्वज उंचावला आणि चंद्रावर शोध घेणारा पहिला देश बनून आपले नाव इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवले. चंद्रावर पाणी असल्याचे भक्कम पुरावे गोळा करून भारतीय शास्त्रज्ञांनी अनेक अवकाश संस्थांना पाठवले.
  • 10 वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी पुन्हा चांद्रयान-2 ची निर्मिती केली. ज्याबद्दल आपणाला आजच्या काळात प्रत्येक माध्यमाद्वारे संपूर्ण संक्षिप्त माहिती मिळू शकते.
  • चंद्रावर गेल्यानंतर इस्रोने २०१३ मध्ये मंगळावर प्रवास केला, ज्याला मिशन मंगल असे नाव देण्यात आले. मिशन मंगलचा प्रवास सुमारे 298 दिवस चालला आणि 24 सप्टेंबर 2014 ही तारीख होती जेव्हा ISRO ने मंगळयान पूर्णपणे कक्षेत स्थापित करून मोठा विजय मिळवला.
  • 2013 पर्यंत, मंगळयानच्या या मोहिमेत कोणत्याही देशाला यश मिळू शकले नव्हते, म्हणून भारताचे नाव ऐतिहासिक पानांमध्ये प्रथम क्रमांकावर नोंदवले गेले.
  • याशिवाय 2008 मध्ये PSLV च्या मदतीने एकाच वेळी 10 रॉकेट अवकाशात सोडण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा उपग्रह सोडण्यासाठी PSLV चा वापर केला जातो आणि आतापर्यंत त्याच्या मदतीने 70 हून अधिक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. त्याचे एकंदर यश पाहता, 22 जून 2016 रोजी भारतीय शास्त्रज्ञांनी त्यांच्या अथक परिश्रमाने एकाच वेळी 20 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवले आणि ते तेथे यशस्वीरित्या स्थापित केले.
  • जेव्हा भारतात पहिले रॉकेट लॉन्च-इन स्टेशन तयार केले गेले, तेव्हा तिरुवनंतपुरममधील भारतीय शास्त्रज्ञांनी पहिले रॉकेट यशस्वीरित्या अंतराळात सोडले. भारतीय शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळेच त्यांना या प्रक्षेपणात यश मिळाले.

अशाप्रकारे आपण इस्रो या संस्थेची संपूर्ण माहिती मराठी ISRO information in marathi जसे की इस्रो चा फुल फॉर्म full form of ISRO, इस्रो म्हणजे काय what is ISRO in marathi, इस्रो ची स्थापना When was ISRO established, इस्रो चे मुख्यालय Headquarters of isro in India, इस्रो चे अध्यक्ष Chairman of isro, इस्रो ची प्रमुख केंद्रे Main ISRO centers in india तसेच इस्रो ची कार्ये Functions of ISRO in marathi पाहिली. याव्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा.

Tags : ISRO information in marathi, isro meaning in marathi, isro chi marathi mahiti, isro full form, avkash information in marathi,

1 thought on “इस्रो या संस्थेची माहिती – ISRO Information in Marathi मराठी”

  1. येथे इस्त्रो चे असे कार्य ज्याचा ठसा जागतिक पटलावर उमटला ते कोणते आहे ?

    Reply

Leave a Comment