कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? Low Investment Business Ideas in Marathi :

आज आपण पाहूया कमी पैशात कोणता व्यवसाय करावा? (Low Investment Business Ideas in Marathi) काही छोट्या व्यवसाय आयडिया ज्या आपण अगदी कमी गुंतवणुकीत देखील करू शकतो.

खरे पहायला गेलं तर कोणताही व्यवसाय लहान नसतो परंतु व्यवसायात एक मोठा टप्पा गाठण्यासाठी काही ना काही कुठून ना कुठून छोटीशी सुरुवात करणे गरजेचे असते.

नोकरी करणे हा पर्याय व्यवसायापेक्षा सुरक्षित जरी मानला जात असेल तरी आजच्या युगात कोणाला आपल्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळेल की नाही आणि मिळालीच तर ती नोकरी किती काळ टिकेल याची शाश्वती राहिलेली नाही.

कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? Low Investment Business Ideas in Marathi
कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? Low Investment Business Ideas in Marathi

शिवाय स्वतःच्या गुणांचा, कौशल्यांचा वापर दुसऱ्याच्या फायद्यासाठी आयुष्यभर करत राहायचं, वरून बॉस लोकांची हुकूमत आलीच.

खूप कमी नोकऱ्या आहेत ज्या करताना लोकांना समाधान किंवा आनंद मिळतो. बाकी इतर लोक फक्त जगण्यासाठी साधन म्हणून नोकरी करत असतात.

अशातच आपला एखादा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय असावा उद्योगधंदा असावा असे प्रत्येकाला मनातून वाटत असते. परंतू त्यासाठी लागणारे भांडवल, गुणकौशल्यांची कमी तसेच व्यवसायात असफल होण्याची भीती या सगळ्या गोष्टींमुळे बरीच माणसे धंदा करायला घाबरतात.

काही लोकांकडे व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या शिक्षण, गुण, भांडवल, जिद्द अशा सर्व काही गोष्टी असतात पण ते नक्की व्यवसाय कोणता करावा याच गोंधळात अडकून जातात. नक्की व्यवसाय कोणता करावा हे सुचत नाही.

business-quotes-in-marathi
Trendingmarathi.Com

अशा जिद्दी आणि स्वतःचे नवीन अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या लोकांसाठी आज आपण काही कमी गुंतवणुकीमध्ये सुरू होणाऱ्या व्यवसायांबद्दल माहिती पाहूया. जे अगदी कमी भांडवलामध्ये सुरू होतील आणि हळू हळू त्यांचा विस्तार करणेदेखील शक्य होईल.

कमी पैशात कोणता व्यवसाय करावा? (Low Investment Business Ideas in Marathi)

चला तर पाहूया काही कमी भांडवलात सुरू होणारे उद्योगधंदे तसेच कमी पैशात कोणता व्यवसाय करावा? (Low Investment Business Ideas in Marathi) याबद्दलची थोडी माहिती.

१.चायनीज फूड कॉर्नर (Chinese Food Business in Marathi):

भलेही आपल्या देशातील लोक चायनीज वस्तूंचा तिरस्कार करतील त्यांवर बंदी आणतील परंतु काहीही झाले तरी भारतीय लोकांच्या जिभेला लागलेली चायनीज पदार्थांच्या चवीची सवय कधीही मोडू शकत नाही. चायनीज पदार्थ हे आपल्याकडे अत्यंत चवीने खाल्ले जातात.

या गोष्टीचा फायदा आपण घेऊ शकतो आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जिथे दूरदूरवर चायनीज पदार्थांची सोय नाही तिथे आपण आपला चायनीज फूड व्यवसाय (chinese food business in marathi ) चालू करू शकतो.

चायनीज फूड कॉर्नर chinese Food Business in Marathi कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? Low Investment Business Ideas in Marathi
कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? (Low Investment Business Ideas in Marathi)
Chinese Food Corner Business | Image By Google Maps

जर आपण पण कमी पैशात कोणता व्यवसाय करावा या दुविधेत अडकला असाल तर हा चायनिज फूड चा व्यवसाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये आपण आपल्याला हव्या तेवढ्या बजेट मध्ये हवे तेवढे शॉप किंवा जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी आपले हे फूड कॉर्नर चालवू शकतो.

अगदी कमी किंमतीत म्हणजे जवळजवळ ४०-५० हजारांमध्ये हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. एखादा चांगला चायनीज फूड बनविणारा आचारी बघून आपण हा व्यवसाय चालू करून यामधून आपण भरपूर नफा कमावू शकतो.

२. पानाचा स्टॉल (paan shop business in marathi) :

दिसायला लहान दिसत असला तरी या व्यवसायात पैसे कमविण्याची संधी खूप मोठी आहे. हल्ली लोकांच्या खाण्यापिण्या विषयीच्या आवडीनिवडी बदलत आहे. त्याच प्रमाणे पान खणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्याचे मुख्य कारण आहे पानामध्ये येत चाललेली विविधता आणि त्यामध्ये येणारे वेगवेगळे फ्लेवर्स.

या व्यवसायतील संधी ओळखून अगदी शहरी भागांमध्येही चांगल्या दर्जाची पानांची दुकाने सुरू केली जात आहेत. त्यामुळे आपण ही या धंद्यात उतरायला हरकत नाही.

२. पानाचा स्टॉल paan shop business in marathi
कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? Low Investment Business Ideas in Marathi
कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? (Low Investment Business Ideas in Marathi)
Paan shop Business | Image By Google Maps

या व्यवसायात गुंतवणूक तशी थोडीच आहे परंतु यामध्ये आपल्या पानाला चव आणि त्यामध्ये विविधता असावी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.

आजकाल अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये पानांची मोठ्या प्रमाणावर ऑर्डर दिली जाते. आपण त्या ऑर्डर्स घेऊन आपला व्यवसाय करू शकतो.

---- हे वाचलंत का ? ----
अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ?
आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ?

एखाद्या मोठ्या हॉटेल च्या बाहेर देखील आपण आपला पानांचा स्टॉल लावू घेऊ शकतो. किंवा चालता फिरता स्टॉल म्हणजेच एखाद्या छोट्या टेम्पो मध्ये देखील आपण हा पान स्टॉल ( paan shop business in marathi ) सुरू करू शकतो.

३. पूजेच्या साहित्याचा स्टॉल :

भारतात कोणता व्यवसाय कधी कोणत्या कारणामुळे बंद पडेल हे सांगता येत नाही. परंतू हा व्यवसाय कधीही बंद न पडणारा आहे. कारण सर्वांच्याच घरी धार्मिक कार्यक्रम होत असतात जरी मोठे धार्मिक कार्यक्रम नसले तरी देव मात्र सर्वांच्याच घरात असतात. त्यांची वेळोवेळी पूजा करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य लोकांना वेळोवेळी लागत असते.

कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? (Low Investment Business Ideas in Marathi)
Pooja Bhandar Shop | Image By Google Maps

त्यामुळे आपण याच सगळ्या पूजेच्या साहित्याचा पुरवठा करणारे छोटे दुकान किंवा स्टॉल टाकला तर आपला व्यवसाय चांगला चालू शकतो. यामध्ये आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी एक छोटा स्टॉल लावू शकतो.

ज्यामध्ये आपण पूजेचे वेगवेगळे साहित्य जसे की अगरबत्ती, लाह्या, कपूर, धूप, विविध प्रकारच्या फुलांचे खरे व नकली हार, देवांचे फोटोज्, लहान मुर्त्या, हातातील व गळ्यातील माळा, प्रसादाचे पॅकींग मधले पदार्थ अश्या अनेक गोष्टी ठेवू शकतो.

हा पूजेच्या साहित्याचा व्यवसाय करण्यासाठी अगदी कमी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. यामध्ये नफा पण भरपूर मिळू शकतो आणि हळू हळू आपण आपल्या व्यवसायाला वाढवू देखील शकतो.

४.टिफिन सर्विस बिजनेस (Tiffin Service Business In Marathi) :

सगळ्यात कमी गुंतवणूक करून त्यातून जास्त नफा मिळवून देणारा बिझिनेस कोणता असेल तर तो टिफिन सर्विस (Tiffin Service Business In Marathi) बिजनेस. यामध्ये जवळपास नाही च्या बरोबर गुंतवणूक करावी लागते.

कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? (Low Investment Business Ideas in Marathi)
Tiffin Service Business

असे बरेच लोक असतात जे कामाच्या किंवा शिक्षणाच्या संदर्भात आपल्या घरापासून दूर राहत असतात. अशा लोकांना आपल्या घरातल्या सारखे जेवण मिळणे कठीण होते. तर अशा लोकांसाठी आपण टिफीन सप्लाय च्या माध्यमातून घरच्या जेवणाची सोय करू शकतो.

या व्यवसायाची सुरुवात आपण अगदी आपल्या घरातून देखील करू शकतो. सुरुवातीला आपल्याकडे कमी ग्राहक असतील तर आपण आपल्या घरातच थोडं जास्तीचे जेवण बनवून टिफीन सेवा देऊ शकतो.

परंतु जसजसे ग्राहक वाढत जातील तसतसे आपणाला जास्त टिफीन ची गरज लागेल तेव्हा आपण एखादी उत्तम जेवण बनवणारी स्वयंपाकीण कामाला ठेवू शकतो.

ग्राहकांची एक निश्चित संख्या झाल्यावर आपण एक छोटे हॉटेल भाड्याने घेऊन त्यात ही टिफीन सर्विस देऊ शकतो. या व्यवसायात जेवढी कमी गुंतवणूक आहे तेवढीच जास्त कमविण्याची संधी आहे आणि जेवढी कमविण्याची संधी आहे तेवढे कष्ट देखील आहेत.

५.सँडविच किंवा फास्ट फूड स्टॉल (Fast Food Business In Marathi) :

हा व्यवसाय देखील एकदम कमी गुंतवणुकीत आपण सुरू शकतो. ज्यामध्ये आपण स्वतः किंवा एखादा उत्तम सँडविच बनवणारा आचारी ठेवू शकतो.या व्यवसायात आपल्या सँडविचची चव, आपल्या स्टॉल वरील स्वच्छता आणि आपल्या व्यवसायाची जागा या तीन गोष्टी खूप फरक पाडतात.

कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? (Low Investment Business Ideas in Marathi)
सँडविच किंवा फास्ट फूड स्टॉल

यामध्ये जर आपल्या सँडविच ला चव असेल तर आपले निश्चित स्वरुपाचे ग्राहक बनायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपला धंदा वाढेल.

आपण जिथे खायला बसणार आहोत ती जागा स्वच्छ असावी असे आपणाला देखील वाटतेच. त्यामुळे आपल्या स्टॉल वर देखील आपण स्वच्छता ठेवल्यास ग्राहक हमखास आपल्या स्टॉल ला पसंती दर्शवतील.

आपला व्यवसाय एखाद्या शांत किंवा खेड्याच्या ठिकाणी असून चालणार नाही त्यासाठी आपणाला एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी आपला सँडविच स्टॉल सुरू करावा लागेल आणि त्यासाठी सर्वात उत्तम जागा म्हणजे कॉलेज किंवा एखाद्या मोठ्या ऑफिस बाहेरील जागा जिथे आपला स्टॉल चांगला चालू शकेल.

अगदी कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ही अडचण असेल तर हा व्यवसाय आपल्याला मदत करू शकतो. कारण या व्यवसायात आपणाला जास्त गुंतवणूक करायची गरज नाही. ५० ते ६० हजारांमध्ये हा सँडविच किंवा फास्ट फूड स्टॉल ( sandwich fast food stall buisness in marathi ) चा व्यवसाय सुरू होऊ शकतो.

व्यवसाय मार्गदर्शन (Business Guide in Marathi) :

तर हे होते काही कमी गुंतवणुकीमध्ये सुरू होणारे व्यवसाय. यामध्ये आपण आपल्याला सोयीस्कररीत्या एखादा व्यवसाय निवडून त्या संबंधीचे पूर्ण ज्ञान घेऊनच चालू करावा.

वरील व्यवसायांसाठी कसल्याही शैक्षणिक पात्रतेची किंवा कसल्याही गुण कौशल्यांची आवश्यकता नाही. हे व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहे ते फक्त आणि फक्त जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी.

कोणतेही ध्येय गाठण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती मेहनत आणि आपला व्यवसाय मोठ्या स्तरावर नेण्यासाठी आपल्यालाही खूप मेहनत करावी लागेल आणि मेहनत करायला कधीही लाजू नये.


3 thoughts on “कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ? Low Investment Business Ideas in Marathi :”

Leave a Comment