Marathi Ukhane For Female – 600+ मराठी उखाणे नवरी साठी – Funny, Romantic, Traditional 2023

Marathi Ukhane For Female – 600+ मराठी उखाणे नवरी साठी – मैत्रिणींनो तुमचं लग्न Marriage असो किंवा मकर संक्रांती Makar Sankranti किंवा डोहाळे जेवण Dohale Jevan आपल्याला मराठी उखाणे घेतल्याशिवाय समारंभ संपन्न होत नाही तर आज आम्ही आज आपणाला Marathi Ukhane For Female, Romantic Marathi Ukhane For Bride, Ukhane Marathi For Female, Funny Marathi Ukhane For Ladies, Ukhane For Unmarried Female तसेच Marathi Ukhane For Girl सांगणार आहोत.

Marathi Ukhane For Female

उखाणा घे उखाणा घे करू नका गलबला
पूर्वपुण्याईने रावांसारखे पती लाभले मला

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले
रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले

जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून नाव रावांचे घेते

वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा
रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा

चंद्राला रोहिणी भेटे आकाशी
रावां चे नाव घेते लग्नाच्या दिवशी

Marathi Ukhane For Female

विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष
रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष

ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात
राव आणि माझी जोडी ठेव सुखात

शंकरासारखा पिता अन गिरिजॆसारखी माता
रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता

मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस
रावांचा संसार हा सुखाचा कळस

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास
रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात

Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

काचेच्या बशीत आंबे ठेवले कापुन
रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन

मानसरोवरात राजहंस मोती भक्षी
राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी

निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे
रावांच्या संगतीने उजलेल् माझे जीवन सारे

मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून
राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून

आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल
रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल

Marathi Ukhane For Female

मंद मंद वाहे वारा संथ चाले होडी
परमेश्वर सुखी ठेवो रावां आणि ची जोडी

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण
रावांचे नाव घेऊन सोडले काकण

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
रावांचे नाव घेते आशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

इन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असतं पावसात ऊन
रावांचे नाव घेते ची मी सुन

Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

Ukhane Marathi For Female

साता जन्माच्या जुळल्या गाठी
रावांचे नाव घेते चालताना सप्तपदि

सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण
रावांचे नाव घेते ऐका सारेजण

जाईजुईचा वेल पसरला दाट
रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
रावांना भरविते जिलेबिचा घास

सासरचे निरांजण माहेरची फुलवात
रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात

Ukhane Marathi For Female

झाले सत्यनारायण पूजन कृपा असो लक्ष्मी नारायणाची
राव सुखी रावो हीच आस मनाची

काव्य आणि कविता सागर आणि सरिता
रावांचे नाव घेते खास तुमच्या करिता

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता
रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध
रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद

साँजवात लावताना येते माहेरची आठवण
रावांसाठी झाली माझी सासरी पाठवण

Ukhane Marathi For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

हरीश्रंद्र राजा रोहिदास पुत्र
रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र

सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान
रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान
रावांची राणी झाले आहे मी भाग्यवान

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण
रावांचे नाव घेते ची सून

तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद
माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात
रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात

Ukhane Marathi For Female

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा विष्णू महेश
रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश

काचेच्या बशीत बदामचा हलवा
रावांचे नाव घेते सासुबाईंना बोलवा

अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा
रावांच्या नावाने भरते लग्नाचा हिरवा चुडा

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना
रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
च्या घराण्यात रावांची झाले महाराणी

Ukhane Marathi For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane For Bride

काढ्यात काढा पाटणकर काढा
रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

तेलाच्या दिव्याला तुपाची वात
रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास
रावांना भरविते मी प्रेमाचा घास

एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली
रावांची सारी माणसे मी आपली मानली

संकेताच्या मिलनाकरीता नयन माझे आतुरले
रावां ची मी आज सौभाग्यवती झाले

Marathi Ukhane For Bride

लग्नासारख्या मंगलदिनी नका कोणी रुसू
रावां ना घास देताना येते मला गोड हसू

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी
रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी

काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून
रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ
रावां मुळेच आला माझ्या जीवनाला अर्थ

Marathi Ukhane For Bride

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

गळ्यातील मंगळसूत्र मंगल सुतात डोरले
रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे
रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले
रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा
रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

दारात अंगण अंगणात काढली रांगोळी
रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी

Marathi Ukhane For Bride

पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला
रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने
रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

मान्सूनचे आगमन पर्जन्याची चाहूल
रावांचे नाव घेते टाकते मी पहिले पाऊल

मंगलदेवी मंगलमाता वंदन करते तुला
रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

बारिक मणी घरभर पसरले
रावांसाठी माहेर विसरले

Marathi Ukhane For Bride

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane Navari

लग्नाच्या पंगतीत घेतला उखाणा खास
आणि रावांच्या घशात अडकला घास

एक दिवा दोन वाती एक शिंपला दोन मोती
अशीच राहु दे माझी व रावांची प्रेम ज्योती

चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा
रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

लग्नात लागतात हार आणि तुरे
रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती
रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती

Marathi Ukhane Navari

फुलले गुलाब गाली स्पर्शात धुंद झाली प्रीती
रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती

सासरचे निरंजन माहेरची फुलवात
रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

माहेर सोडताना पाऊल होतात कष्टी
रावांच्या संसारात करीन सुखाची वृष्टी

शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले
रावांच्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाला आले

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

Marathi Ukhane Navari

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी
रावांचे नाव घेते खास तुमच्या आग्रहासाठी

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा विष्णू आणि महेश
रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
च्या घराण्यात रावांची झाले महाराणी

भोळ्या शंकराला बेलाची आवड
रावांची पती म्हणून केली मी निवड

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
रावांचे नाव घेण्यास करत नाही विलंब

Marathi Ukhane Navari

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास
रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास

रुप्याची साडी तिला सोन्याचा गिलावा
रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

एक तीळ सातजण खाई
रावांना जन्म देणारी धन्य ती आई

सीते सारखे चारित्र्य रामा सारखे रूप
राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

Marathi Ukhane Navari

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

Romantic Ukhane in Marathi For Female

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी
रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी

जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा
रावांच्या सह संसार करीन मी सुखाचा

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती
रावांशी लग्न झाले झाली माझी इच्छापूर्ती

मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण
रावांचे नाव घेते ची मी सून

सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान
रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान

Romantic Ukhane in Marathi For Female

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल
रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

तिरंगी झेंड्याला वंदन करतात वाकून
रावांचं नाव घेते तुमचा मान राखून

दारातील तुळशीला पाणी घालते गार
रावांच्या नावाला रात्र झाली फार

दारातील तुळशीला पाणी घालते गार
रावांच्या नावाला आग्रह नको फार

आई-वडिल भाऊ-बहीण यांच्या सहवासात वाढले
रावांमुळे मला सौभाग्य चढले

Romantic Ukhane in Marathi For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध
रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद

आकाश आले भरुन चंद्र लपला ढगात
रावांना हार अर्पण करून धन्य झाले जगात

विहिरी भरल्या काठोकाठ नदीला आला पूर
रावांच्या साठी आई-वडिल केले दूर

शुभ मंगल प्रसंगी सर्वजण करतात आहेर
रावांच्या जीवनाकरिता सोडले मी माहेर

प्रेमरूपी संसार संसार रूपी सरिता
रावांचं नाव घेते खास तुमच्याकरिता

Romantic Ukhane in Marathi For Female

चांदीच्या तबकात निरंजन आरती
रावांच्या जीवनात …सारथी

सुख समाधान शांति हेच माझे माहेर
रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर

सौंदर्याच्या बागेत सूर्यनारायण माळी
रावांचे नाव घेते …वेळी

हिंदू संस्कृती हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्राचा धरीन अभिमान
रावांबरोबर झाले शुभमंगल सावधान

उत्तम नोकरी मध्यम व्यापार कनिष्ठ दर्जा शेतीचा
रावांनी संदेश दिला आदर्श गृहिणी होण्याचा

Romantic Ukhane in Marathi For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

Traditional Ukhane in Marathi For Female

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती
रावांशी लग्न झाले झाली इच्छापूर्ती

संसाररूपी सागरात पती असतो माळी
रावांचं नाव घेते …वेळी

उदार मनाने अहिंसेच्या जगाला करा आहेर
रावांच्या करिता सोडून आले माहेर

लतावेलींच्या सौंदर्याने नटला हिमगिरी
रावांचे नाव घेते …च्या घरी

संसाराच्या सुखस्वप्नाची स्त्रीच्या मनी आस
रावांचे नाव घेते तुमच्याकरिता खास

Traditional Ukhane in Marathi For Female

शरदाचे चांदणे मधुवनी फुले निशिगंध
रावांचे नाव घ्यायला मला वाटतो आनंद

श्रीरामाच्या पउली वाहते फूल आणि पान
रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान

उत्तर दिशेला चमकतो अढळ ध्रुवतारा
रावांचा उत्कर्ष हाच माझा अलंकार खरा

अरुण रुपी उषा येता सोन्याची प्रभा पसरली
रावांचं नाव घ्यायला मी नाही विसरली

गोपाळ कृष्ण आहे बासरीचा छंद
रावांचे नाव घेण्यात मला वाटतो आनंद

Traditional Ukhane in Marathi For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

पतिवृत्तेचा धर्म नम्रतेने वागते
राव सुखी राहोत हा आशिर्वाद मागते

मंगळसूत्र म्हणजे सासर माहेरची प्रीती
राव मिळाले पती म्हणून आभार मानू किती

प्रीतीच्या झुळकेनं कळीचे फूल झालं
रावांच्या संगतीनं जीवन सार्थक झालं

सुख समाधान शांति तेथे देवाची वस्ती
रावांना अयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती

अगं अगं मैत्रीणीबाई तुला सांगते सर्व काही
राव मिळाले तरी तुला विसरत नाही

Traditional Ukhane in Marathi For Female

निसर्गरम्य श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरते ओटी
रावांचं नाव घेते खास तुमच्यासठी

पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा
रावांचं नाव घेते वाट माझी सोडा

पौर्णिमेच्या रात्री आकाशात प्रकाशते पूर्ण चंद्रबिंब
रावांचे नाव घेण्यास लावत नाही विलंब

मंडपाला सोडल्या कमानी त्यावर विजेची रोषणाई
रावांचे नाव ऐकण्याची एवढी कसली घाई

असू नये अभिमानी असावे मात्र स्वाभिमानी नाव घेते
रावांची हृदयस्वामिनी

Traditional Ukhane in Marathi For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

Modern Marathi Ukhane For Female

ज्वेलरी च्या दुकानात जाते पायातील पैंजण पाहते
रावांच नाव …साठी घेते

गणेशाचे आगमन शुभकार्याची खूण
रावांचं नाव घेते तुमचा मान राखून

लोकमान्यांनी संदेश दिला स्वराज्याचा
रावांनी संदेश दिला आदर्श गृहिणी होण्याचा

सनईच्या मंगल सुरांनी लागते मंगल कार्याची चाहूल
रावांच्या जीवनात मी टाकले पाऊल

पाकळी पाकळी उमलून फूल होतं आकार
रावांसारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार

Modern Marathi Ukhane For Female

फुलता कमल पुष्प भ्रमराला लागते चाहूल
रावांच्या जीवनी मी टाकले पाऊल

संसाराच्या देवार्यात नंदादीप तेवतो समाधानाचा
रावांचे नाव घेऊन मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा

नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा
रावांच्या संसारी असाव्या सर्वांच्या शुभेच्छा

लक्ष्मी शोभते दाग-दागिन्याने विद्या शोभते विनयाने
रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहाने

आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे
रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहाने

Modern Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

कोरोनाचा धुमाकूळ आणि अवकाळी
पावसाचा कहर
रावांचे नाव घेते ऐका सारे जण

खमंग चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप
रावांचे नाव घेऊन ओलांडते मी माप

…ची लेक झाली …ची सून
रावांचं नाव घेते गृहप्रवेश करून

जमले आहेत सगळे रावांच्या दारात
रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात

आमचे दोघांचे स्वभाव
आहेत complimetnry
रावांच नाव घेऊन करते
घरात पटकन Entry

Modern Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane For Girls

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मी सुबक मेंदी
रावांचे नाव घेण्याची वारंवार संधी

गार गार माठामधले पाणी ताजे ताजे
राव माझ्या मनाचे झाले राजे

सासरचे निरंजन माहेरची फुलवतात
रावांचे नाव घेण्यास करते मी सुरुवात

सोन्याची घागर अमृताने भरावी
रावांची सेवा आयुष्यभर करावी

नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची
चांदणी तुमच्याच आशीर्वादाणे
बाग फुलवीत रावांच्या अंगणी

Marathi Ukhane For Girls

माझ्या गुणीला रावांला पहा सगळ्यांनी निरखुन
जणू कोहिनूर हिरा आणलाय आम्ही पारखून

केसात माळते मी रोज गुलाबाचे फुल
केसात माळते मी रोज गुलाबाचे फुल
राव माफ करतात माझी प्रत्येक भूल

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

आला आला तीळ संक्रातीचा सण हा मोठा
राव सोबत असतांना नाही आनंदाला तोटा

लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा
रावांमुळे पडला जीवनात प्रेमाचा सडा

काही शब्द येतात ओठातून
रावांचं नाव येतं मात्र हृदयातुन

Marathi Ukhane For Girls

कोल्हापूरला आहे लक्ष्मीचा वास
मी भरवते रावांना जिलेबीचा घास

नव्या नव्या संसाराचा
नाजूक गोड अनुभवही नवा
राव व माझ्या संसाराला तुमचा
अखंड आशिर्वाद हवा

रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्ण म्हणतो हास
रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास

काव्य आणि कविता सागर आणि सरिता
रावांचे नाव घेते तुमच्याकरिता

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,

Marathi Ukhane For Girls

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

मराठी उखाणे नवरी साठी

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने

राजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने
रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने

सुखी संसाराची करतोय,
आम्ही आता सुरुवात
वर ठेवा कायम
तुमचा प्रेमळ मायेचा हात

ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला,
रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला

मराठी उखाणे नवरी साठी

हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घन दाट
रावांचे नाव घेते सोडा माझी वाट

माहेरी साठवले मायेचे मोती
रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती

जीवनरुपी काव्य दोघांनी वाचावी
रावांची साथ जन्मोजन्मी हवी

ईन मिन साडेतीन ,ईन मिन साडेतीन
माझे राजा आणि मी त्यांची Queen

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
रावांचे नाव घेते
शालू नेसून भरजरी

मराठी उखाणे नवरी साठी

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

उखाणे मराठी नवरीचे

लावीत होते कुंकू त्यात पडले मोती
लावीत होते कुंकू त्यात पडले मोती
रावांसारखे मिळाले पती भाग्य
मानू किती

साडी नेसते फॅशन ची पदर घेते साधा
माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा

फेसबुक वर ओळख झाली
व्हाट्सअप्प वर प्रेम जुळले
राव आहेत खरंच बिनकामी
हे लग्नानंतरच कळले

चांदीचे जोडावे पतीची खुण
चांदीचे जोडावे पतीची खुण
रावांचे नाव घेते
ची सून

सोन्याचे मंगळसुत्र सोनाराने
घडविले,रावांचे नाव
घ्यायला सगळ्यांनी अडविले

उखाणे मराठी नवरीचे

नव्या नव्या आयुष्याची नवी
नवी गाणी
माझा राजा आणि
मी त्यांची राणी

पूर्णा नदीच्या काठावर कृष्णा
वाजवितो बासरी
पूर्णा नदीच्या काठावर कृष्णा
वाजवितो बासरी
रावांसोबत मी आले सासरी

english मध्ये चंद्राला म्हणतात moon
मी आहे पाटलाची सून
सांगते सासूबाईमुळे राहिले आमचे
हनिमून

उखाणे मराठी नवरीचे

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

कपाळाला कुंकू जसा चांदण्याचा ठसा
रावांचे नाव घेते आता खाली बसा

हे देखील वाचा : Happy Marriage Anniversary Wishes In Marathi

आम्हाला आशा आहे की आपणाला New Marathi Ukhane for Female, Best Marathi Ukhane For Bride आवडले असतीलच. जर खरच आवडले असतील तर मग हे नवरी साठीचे मराठी उखाणे आपल्या मैत्रिणीसोबत share करायला विसरु नका जेणेकरून तिला या Marathi Ukhane चा उपयोग होईल.

आपल्याजवळ देखील असेच Navriche Ukhane, New Marathi Ukhane For Female असतील तर कमेन्ट मधे जरुर लिहा जेणेकरून आम्ही त्यांना या लेखात Update करू. आणि आम्हाला Instagram वर Follow करायला विसरू नका.

Tags : Marathi Ukhane For Female,Ukhane Marathi For Female,Marathi Ukhane For Bride,Marathi Ukhane Navari,Romantic Ukhane in Marathi For Female,Traditional Ukhane in Marathi For Female,Modern Marathi Ukhane For Female,Marathi Ukhane For Girls,मराठी उखाणे नवरी साठी,उखाणे मराठी नवरीचे,लग्नातील उखाणे,नवरीचे उखाणे,जुने मराठी उखाणे,सोपे मराठी उखाणे,नवीन उखाणे,मराठी उखाणे,उखाणे मराठी,ukhane marathi,marathi ukhane,marathi ukhane for female,ukhane in marathi for female,modern marathi ukhane for female,ukhane marathi for female,marathi ukhane for female funny,marathi ukhane for marriage,marathi ukhane for bride,navriche ukhane marathi,marathi ukhane navari,romantic traditional ukhane in marathi for female,marathi ukhane navriche

Leave a Comment