pfms information in marathi pfms म्हणजे काय? याबद्दल बर्याच लोकांना माहिती नसते, जर आपणाला देखील माहिती नसेल की पीएफएमएस म्हणजे काय आहे तर या पेजवर आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आम्ही आपणाला सांगू इच्छितो की PFMS ची सुरूवात भारत सरकारने २०१६ मध्ये केली होती. यामध्ये देशाचे अर्थ मंत्रालय आणि निती आयोग दोघेही एकत्र काम करत असतात.
याशिवाय पीएफएमएस PFMS पूर्वी २०१३ सालापासून सुरू झालेल्या Direct Benefit Transfer System द्वारे वापरकर्त्यांना थेट निधी देण्यात येत असत.
पीएफएमएस चा अर्थ PFMS Full Form in marathi
PFMS या शब्दाचा पूर्ण अर्थ फुल फॉर्म full form of PFMS हा Public Financial Management System असा आहे. पीएफएमएस PFMS ला हिंदीमध्ये सार्वजनिक वित्तीय प्रबंधन सेवा या नावाने तर मराठी मध्ये DRDO ला सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा (पीएफएमएस) या नावाने ओळखले जाते.
DRDO म्हणजे काय? आणि हे काय कार्य करते?
PFMS म्हणजे काय? PFMS Information In Marathi
वास्तविक पाहता, PFMS ही एक अशी प्रणाली आहे जिच्या मदतीने सरकारकडून दिले जाणारे अनुदान subsidy आणि त्याशी संबंधित इतर आर्थिक लाभ हे थेट वापरकर्त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
भारत सरकारने घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयांपैकी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते ज्याच्या मदतीने फसवणूक आणि भ्रष्टाचारासारख्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल आणि वापरकर्त्यांना अनुदानाचा आणि इतर विविध लाभांचा पुरेपूर आणि थेट फायदा मिळू शकेल.
PFMS ही एक प्रकारची स्वयंचलित प्रणाली आहे. ज्यामध्ये कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय लाखों रुपये फक्त एका क्लिकवर सर्व वापरकर्त्यांच्या bank accounts पाठविले जातात.
PFMS म्हणजे काय? PFMS Information In Marathi
पीएफएमएस ची सुरुवात When PFMS started in marathi?
PFMS ही योजना भारत सरकारने सन २०१६ मध्ये सुरू केली होती. ही योजना Finance Ministry आणि Planning Commission म्हणजेच वित्त मंत्रालय आणि निती आयोगाच्या सहकार्याने सुरू करण्यात आली. हे दोन्ही एकत्र आल्यामुळे या दोघांनाही काम करण्यास सुलभता मिळाली.
हि PFMS System पीएफएमएस प्रणाली सुरू होण्यापूर्वी, वापरकर्त्यांच्या खात्यात रक्कम किंवा अनुदान DBT (Direct Benefit Transfer) अंतर्गत पाठविली जात असत. DBT हे 1 जानेवारी २०१३ पासून सुरू करण्यात आले होते, अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करता यावी हा यामागचा सर्वात मोठा हेतू होता.
सुरुवातीला PFMS चे नाव CPSMS (Central Plan Scheme Monitoring System) असे होते. परंतु सन २०१६ पासून PFMS यंत्रणेमार्फत भारत सरकारद्वारे चालविल्या जाणार्या सर्व योजनांच्या पैशांचा लाभ थेट यूजर्स च्या (लाभार्थी) बँक खात्यात DBT अंतर्गत पाठविला जाऊ लागला.
पीएफएमएस प्रणाली कसे कार्य करते? How pfms system works in marathi
पीएफएमएस ही एक प्रकारची user generated प्रणाली आहे आहे, ज्या प्रणालीचे नियंत्रण हे भारत सरकार करत असते. सरकारशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तपशील यामध्ये असतो, ज्याला वेळोवेळी सरकार अद्ययावत update करत असते.
सरकारकडे असणाऱ्या वापरकर्त्यांच्या तपशीलाच्या मदतीने सरकार वापरकर्त्यांना अनुदान किंवा इतर विविध आर्थिक लाभ देण्यास सक्षम ठरते. त्याच वापरकर्त्यांचा डेटा सतत update करण्याचे काम हे नियोजन आयोग करत असते.
निती आयोग अशा वापरकर्त्यांची यादी तयार करतो ज्यांना सरकारला लाभ द्यायचा आहे. त्यानंतर सरकारला कोणत्याही योजनेंतर्गत वापरकर्त्यांना लाभ द्यावा लागत असतो, तेव्हा निती आयोग हे ज्यांना हा लाभ देण्यात येणार आहे अशा सर्व वापरकर्त्यांची यादी बनवते.
मग त्या सर्व वापरकर्त्यांच्या संपूर्ण माहितीची यादी तयार केली जाते, ज्यामध्ये त्यांच्या नावाची आणि Bank accounts च्या तपशीलांची यादी तयार केली जाते, त्यानंतर सर्व निधी हा एकाच वेळी सर्व बँक खात्यांमध्ये वितरीत केला जातो. अशाप्रकारे, पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात सहज आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय हस्तांतरित केले जातात.
PFMS म्हणजे काय? PFMS Information In Marathi
पीएफएमएस चे फायदे Services/advantages of PFMS in marathi
पीएफएमएस हे अनेक प्रकारच्या सुविधा देत असते :
१. पीएफएमएस PFMS च्या मदतीने, पैसे थेट वापरकर्त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असतात, ज्यामुळे कसलाही भ्रष्टाचार न होता वापरकर्त्यांना त्यांचे संपूर्ण पैसे मिळतात.
२. PFMS च्या येण्याने लाभार्थ्यांना आता कोणत्याही सरकारी कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत नाहीत. तसेच सरकार द्वारे मिळणारी आपली लाभाची रक्कम मिळावी म्हणून कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन विनवण्या करण्याची गरज उरलेली नाही.
३. पीएफएमएस मुळे, सरकारने चालवलेल्या कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत लवकर येऊ लागला आहे, अन्यथा पूर्वी या प्रक्रियेस बराच वेळ लागत असे.
४. PFMS प्रणालीमुळे वापरकर्त्यांचा बराच वेळ वाचत आहे आणि यामुळे या कामात पारदर्शकता आली आहे.
५. पूर्वीच्या तुलनेत आता सरकार जलद गतीने आणि सुलभरित्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठविण्यास सक्षम आहे, यामुळे PFMS मुळे सरकार लाखो वापरकर्त्यांच्या बँक खात्यात एकाच वेळी पैसे पाठवू शकते.
६. ही प्रणाली पूर्णपणे Electronic Payment System वर आधारित आहे, जी पूर्णपणे computer software आणि internet वर आधारित आहे. याचा अर्थ असा आहे की कोणीही तिसरी व्यक्ती यामध्ये छेडछाड करू शकत नाही.
७. यामध्ये, डीबीटी DBT अंतर्गत, वापरकर्त्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे थेट जमा होत असतात. त्यामुळे परिस्थितीत लाभाचे पैसे मिळवण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही.
PFMS म्हणजे काय? PFMS Information In Marathi
PFMS प्रणालीद्वारे मिळणारी Subsidy
भारत सरकारच्या अनेक योजनांतर्गत अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांना PFMS पीएफएमएसद्वारे दिला जातो जो त्यांच्या बँक खात्यात थेट पाठविला जातो.
- विद्याविद्यार्थ्यांना मिळणारी विविध प्रकारच्या Scholarship ची रक्कम.
- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणारा लाभ.
- वृद्धा पेन्शन योजनेंतर्गत मिळणारा लाभ.
- शेतकरी किंवा इतर वर्गातील कर्जमाफीचा लाभ.
- गॅस सिलिंडरवर देण्यात येणारे सरकारी अनुदान.
- MGNREGA मनरेगा अंतर्गत काम करणार्या मजुरांचे पैसे.
- हे आणि इतर अनेक प्रकारच्या सरकारी योजनांशी संबंधित पैशांचे लाभ, जे PFMS द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठविले जातात.
PFMS म्हणजे काय? PFMS Information In Marathi
PFMS चा वापर कसा करावा? How to use PFMS in marathi
आपण PFMS system वापरू इच्छित असल्यास प्रथम आपण त्यांच्या official website वर जावे.
मुख्यपृष्ठावरच आपणास ‘Know Your Payments’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
येथे आपल्याला आपल्या Bank account संबंधित माहिती भरावी लागेल.
ज्यामध्ये आपणाला आपले नाव आणि Bank account number भरावे लागेल.
यानंतर आपणाला खाली दिलेला captcha भरावा लागेल. ज्यावर काही शब्द लिहीले जातील ते बॉक्समध्ये भरावे लागतील.
captcha भरल्यानंतर आता आपल्याला search पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर आपली माहिती आपल्या PFMS वेबसाइटवर जाईल.
Tags : PFMS information in marathi, pfms meaning in marathi, pfms services in marathi, pfms official site, pfms long form in marathi