राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA National Disaster Management Authority in Marathi

NDMA National Disaster Management Authority in marathi NDMA चे पूर्ण नाव National Disaster Management Authority म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण होय. ही संघटना देशातील विविध आपत्तींच्या व्यवस्थापनाचे कार्य करते. ह्या संघटनेला हिंदी भाषेत राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण Rashtriya Aapda Prabandhan Pradhikaran असे संबोधले जाते.

भारत सरकार द्वारा डिसेंबर २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा National Disaster Management Act 2005 सहमत केला गेला. या कायद्याच्या अंतर्गत सप्टेंबर २००६ मध्ये याच NDMA ची स्थापना करण्यात आली.

कस्टम ड्यूटी म्हणजे काय?

देशाचे प्रधानमंत्री हे NDMA चे अध्यक्ष chairman of NDMA असतात. NDMA भारतातील आपत्ती व्यवस्थापनामधील सर्वोच्च घटक असतो. आपत्ती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेचे मुख्यालय देशाची राजधानी दिल्ली येथे आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA National Disaster Management Authority

NDMA National Disaster Management Authority logo
NDMA National Disaster Management Authority guidelines,aims, functions in marathi

NDMA च्या स्थापनेमागील उद्देश Aim of NDMA in marathi

• एक समग्र, कार्यक्षम, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चालवला जाणारा तसेच शाश्वत विकास धोरणाद्वारे येणाऱ्या आपत्तीशी लढा देण्यासाठी सुरक्षित आणि सक्षम असा भारत निर्माण करणे.

१० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत

• आलेल्या आपत्तीचे निवारण करणे, आपत्ती व्यवस्थापनाची पूर्व तयारी करणे तसेच आपत्तीनंतरचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व लाभार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या कार्याचा प्रसार करणे हे या संस्थेसमोरील प्रमुख उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA National Disaster Management Authority Aapda prabandhan
राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण : Aapda Prabandhan office NDMA National Disaster Management Authority Image By : Maps

NDMA ची कार्ये Functions of NDMA in marathi

• आपत्ती व्यवस्थापनासाठीचे धोरण आखणे.

• राष्ट्रीय योजनांनुसार केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाद्वारे तसेच विविध विभागांद्वारे बनविल्या जाणाऱ्या योजनांना मंजुरी देणे.

• अशी मार्गदर्शक तत्वे तयार करणे ज्यांचे अनुसरण करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राज्यासाठी विविध योजना तयार करू शकेल.

• अशी मार्गदर्शक तत्वे तयार करणे ज्यांचे अनुसरण भारत सरकारच्या विविध मंत्रालये तसेच विविध विभागांद्वारे आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणजेच येणाऱ्या आपत्तीला रोखण्यासाठीचे उपाय तसेच आपत्ती येऊन गेल्यानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी विकास योजना तसेच प्रकल्प यामध्ये केला जाऊ शकतो.

DRDO म्हणजे काय? DRDO काय कार्य करते?n

• आपत्ती व्यवस्थापन धोरणे तसेच योजना लागू करणे आणि त्यांच्या अंमलबजाणीमध्ये समन्वय प्रस्थापित करणे.

• आपत्तीनंतर लागणाऱ्या मदत कार्यांसाठी मदतनिधीच्या तरतुदींची शिफारस करणे.

• केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या इतर मोठ्या आपत्तींमुळे पीडित देशांना सहकार्य करणे. मदत करणे.

• राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या कामकाजासाठी धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे.

ही सगळी NDMA ची प्रमुख कार्ये आणि जबाबदाऱ्या आहेत.

NDMA India Logo png
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA National Disaster Management Authority

NDMA ची मार्गदर्शक तत्वे NDMA Guidelines in Marathi

• उष्णतेच्या लाटांचे प्रतिबंध आणि व्यवस्थापन करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे.

• भूस्खलन जोखीम व्यवस्थापन धोरणाची मार्गदर्शक तत्वे.

• सर्वसमावेशक आपत्ती जोखीम कमी करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे.

• आपत्तीग्रस्त कुटुंबांसाठी तात्पुरत्या आश्रयस्थानांच्या सोयीविषयीची मार्गदर्शक तत्त्वे.

• वीज पडणे, मेघगर्जनेसह आलेले वादळ, धूळ, गारपीट व जोरदार वारा यांचे प्रतिबंध व व्यवस्थापन संबंधी मार्गदर्शक सूचना.

• पाण्यातील बोटींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक सूचना.

• सांस्कृतिक वारसा स्थळे आणि प्रांत यांबद्दल मार्गदर्शक तत्त्वे.

• संग्रहालयांबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे.

• बचाव कार्याच्या किमान मानकांविषयी मार्गदर्शक तत्त्वे.

• भूकंपांच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक सूचना.

• रासायनिक आपत्तींसंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे.

• वैद्यकीय तत्परता आणि दुर्घटना व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक तत्त्वे.

पूर, जलप्रलय व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक सूचना.

चक्रीवादळाच्या व्यवस्थापनाविषयीची मार्गदर्शक सूचना.

• जैविक आपत्ती व्यवस्थापनाविषयीची मार्गदर्शक सूचना आणि मार्गदर्शक तत्वे.

• आण्विक आणि किरणोत्सारी आणीबाणीच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक तत्त्वे.

• भूस्खलन आणि हिम हिमस्खलन व्यवस्थापनावर मार्गदर्शक सूचना.

• आपत्तींमधील समाजाला मानसिक आधार आणि मानसिक आरोग्य सेवांसाठी मार्गदर्शक तत्त्वे.

• घटनेच्या प्रतिसाद प्रणालीवरील मार्गदर्शक तत्त्वे.

• त्सुनामीच्या व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शक सूचना.

• आपत्तीमधील मृतदेहांच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक तत्त्वे.

• नागरी पूर व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक सूचना.

• दुष्काळ व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक सूचना.

• राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन माहिती व संवाद यंत्रणेवरील मार्गदर्शक तत्त्वे.

• उपकरणांचे प्रकार आणि अग्निशमन या सेवांच्या मोजमापाचे प्रशिक्षण यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे.

• मोडकळीस आलेल्या इमारती आणि संरचनांना भुकंपासाठी सुसज्ज करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना.

• शाळा सुरक्षा धोरणासंबंधी मार्गदर्शक सूचना.

• रुग्णालयांच्या सुरक्षिततेविषयी मार्गदर्शक सूचना.

• हिमतलाव वितळून आलेल्या पुराच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक सूचना.

ही NDMA ची काही मार्गदर्शक तत्वे आणि सूचना आहेत. याच तत्वांच्या आधारावर ही NDMA संघटना कार्यरत असते.

माहिती आपणाला आवडली असेल तर फेसबुक किंवा व्हॉट्सॲप वर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.


Tags : NDMA,National Disaster Management Authority in Marathi,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण,Aapda Prabandhan,NDMA Guidelines in Marathi,Functions of NDMA in marathi,Aim of NDMA in marathi, disaster management act 2005, disaster management in marathi,ndma india,apada prabandhan, chairman of ndma india

2 thoughts on “राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA National Disaster Management Authority in Marathi”

  1. आपत्तीनंतर लागणाऱ्या मदत कार्यांसाठी मदतनिधीच्या तरतुदींची शिफारस करणे.

    Reply

Leave a Comment