रिटेल किंग राधाकिशन दमानी यांचे शानदार १००० करोड रुपयांचे घर. Radhakishan Damani New House Worth Rs 1000 Crores

Radhakishan Damani New House Worth Rs 1000 Crores काही दिवसांपूर्वीचे मुकेश अंबानी यांच्या नंतरचे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती अब्जावधींची संपत्ती असणारे श्री. राधाकिशन दमानी हे भारतातील अब्जाधीश गुंतवणूदारांपैकी एक आहेत.

राधाकिशन दमानी हे मुंबई विद्यापीठातून आपले कॉमर्स मधले शिक्षण पूर्ण करत असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागले.त्यांचे वडील दलाल स्ट्रीट मध्ये काम करत होते. त्यामुळे साहजिकच शिक्षण सोडल्यानंतर राधाकिशनजी स्टॉक मार्केट ब्रोकर बनले.

रिटेल किंग राधाकिशन दमानी यांचे शानदार १००० करोड रुपयांचे घर. Radhakishan Damani New House Worth Rs 1000 Crores :

राधाकिशन दमानी घर
Radhakishan Damani New House Worth Rs 1000 Crores
Radhakishan Damani New House Worth Rs 1000 Crores

थोडे दिवस हे ब्रोकर चे काम केल्यानंतर त्यांनी गुंतवणूकदार होण्याचा निर्णय घेतला जो एकदम बरोबर ठरला. अब्जाधीश गुंतवणूकदार आणि शेअर मार्केट मधील बिग बुल अशी ख्याती असणारे राकेश झुनझुनवाला यांना शेअर ट्रेडिंग शिकवणारे राधाकिशन दमानी हेच आहेत.

कमी पैशांत कोणता व्यवसाय करावा?

राधाकिशन दमानी यांनी आपले सुमारे ८० हजार करोड रुपये हे आंध्रा पेपर, इंडिया सिमेंट्स सारख्या आणखी दहा कंपन्यांमध्ये गुंतवणुक करून ठेवले आहेत.

राधाकिशन दमानी हे एवेन्यू सुपरमार्ट चे मालक आहेत. त्यांनी २००२ मध्ये डी-मार्ट ही लोकप्रिय रिटेल स्टोअर ही साखळी सुरू केली आणि आज भारतभर त्यांचे जवळजवळ २०० हून अधिक शाखा आहेत.

रिटेल किंग राधाकिशन दमानी यांचे शानदार १००० करोड रुपयांचे घर

राधाकिशन दमानी हे भारतातील सध्याचे चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एक प्रॉपर्टी दक्षिण मुंबई च्या अल्टामाउंट रोड ला देखील आहे. तोच अल्टामाऊंट रोड जिथे मुकेश अंबानी ( Mukesh Ambani ) यांचे घर एंटीलिया आहे आणि अशा बऱ्याच अब्जाधीशांची घरे आहेत.

अशातच ३१ मार्च २०२१ मध्ये राधाकिशन दमानी ( Radhakishan Damani ) यांनी आपले बंधू गोपीकिशन दमानी ( Gopikishan Damani ) यांच्यासोबत मिळून दक्षिण मुंबईच्या मलबार हिल्स येथे चक्क १००१ करोड इतक्या किंमतीची रहिवासी प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

या प्रॉपर्टी खरेदी वेळी त्यांनी ३० करोड रुपये तर फक्त स्टॅम्प ड्युटी साठीच खर्च केले आहेत. यावरून आपण अंदाज लावू शकतो की त्यांच्याकडे किती संपत्ती आहे.

अफिलिएट मार्केटींग मधून पैसे कसे कमवावे?

राधाकिशन दमानी यांच्या या नवीन घराचे क्षेत्रफळ सुमारे ६८७९ चौरस यार्ड इतका आहे जे की ६१,९१६ चौरस फुटाच्या बरोबर असते. तर हे क्षेत्रफळ पाहता श्री.राधाकिशन दमानी यांनी प्रत्येक चौरस फुटासाठी सुमारे १,६१,६७० ( १ लाख ६१ हजार ६७० रुपये ) इतके रुपये खर्च केले आहेत.

राधाकिशन दमानी यांनी ही दोन मजली प्रॉपर्टी सौरभ मेहता, वर्षा मेहता आणि जयेश शाह यांच्याकडून खरेदी केली आहे. ही खरेदी भारतातील सर्वात महागड्या प्रॉपर्टी व्यवहारांपैकी एक आहे.


Leave a Comment