रमजान ईदला का एवढे महत्त्व आहे? Ramzan Eid al fitr information in Marathi

Ramadan eid al fitr in marathi जर आपण मुस्लिम समुदायातील कोणत्याही व्यक्तीला विचारले तर ते आपणाला नक्कीच सांगू शकतात की रमजान महिना का साजरा केला जातो? परंतु कदाचित दुसर्‍या धर्मातील अनेक लोकांना याची माहिती नसते. भारतीय असल्याने आपल्याला रमजान म्हणजे काय? what is ramadan आणि रमजान का साजरा केला जातो? why ramadan celebrated हे माहित असले पाहिजे.

Ramadan Eid al fitr in Marathi
रमजान ईदला का एवढे महत्त्व आहे? Ramadan Eid al fitr in Marathi

रमजान ईदला का एवढे महत्त्व आहे? Ramadan Eid al fitr in Marathi

इस्लामिक पंचांगातील नववा रमजान महिना मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. इस्लामिक मान्यतेनुसार हा महिना म्हणजे “अल्लाह ची उपासना” करण्याचा महिना असतो. या महिन्यात मुस्लिम धर्माला मानणारे लोक रोज ठेवत असतात आणि अल्लाहची प्रार्थना करत असतात. हा महिना पवित्र असण्याचे एक मुख्य कारण हे देखील आहे की, कुराणानुसार अल्लाहने मुहम्मद पैगंबर यांना आपला दूत म्हणून निवडले होते.

का जैन धर्मीय लोक महावीर स्वामींना एवढे मानतात?

का डॉ.बाबासाहेब आंबेडकर एवढे पूजनीय आहेत?

इस्लाम धर्मात रमजानमध्ये उपवास ठेवण्याची प्रथा फार जुनी आहे, इस्लाम धर्मीयांच्या मान्यतेनुसार, जेव्हा मोहम्मद पैगंबर Mohammad Paigambar यांना इ.स. ६१० मध्ये इस्लामच्या पवित्र पुस्तक, कुराण शरीफबद्दल माहिती मिळाली तेव्हापासून रमजान हा पवित्र महिना म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. या महिन्यात जगभरातील सर्व मुस्लिम समुदायातील लोक रोजा ठेवत असतात. रोजा ठेवल्याने मनुष्याचे सर्व पाप धुवून जातात असे मानले जाते.

eid mubarak wishes image
रमजान ईदला का एवढे महत्त्व आहे? Ramadan Eid al fitr in Marathi

रमजानच्या महिन्याला शब-ए-कद्र shab e qadr असे देखील म्हणतात. असे मानले जाते की याच अल्लाहने आपल्या अनुयायांना कुराण शरीफ quran sharif ने नावाजले होते. या रमजानची सुरुवात ही चंद्र पाहून केली जाते तर याचा शेवटचा दिवस हा रमजान ईद किंवा ईद उल फितर eid al fitr या नावाने साजरा केला जातो.

इस्लाममध्ये चंद्राला खूप महत्त्व असते. रमजानची सुरुवात चंद्राला पाहूनच होत असते. सामान्य कॅलेंडर हे सूर्यावर आधारित असते मात्र रमजानची दिनदर्शिका चंद्राला पाहून ठरवली जाते. रमजान चा महिना इंग्रजी महिन्याच्या ११ ते १२ दिवसांआधी सुरू झालेला असतो. कारण चंद्र वर्ष हे सुर्य वर्षापेक्षा लहान असते.

ramadan eid wishes image
रमजान ईदला का एवढे महत्त्व आहे? Ramadan Eid al fitr in Marathi

रोजा पाळत असताना आपण सूर्य निघायच्या आधी आणि सूर्य अस्ताला गेल्यानंतर रोजा सोडू शकतो. दिवसभराचा उपवास खजूर खाऊन आणि पाणी पिऊन सोडला जातो.

रमजानचा महिना मुस्लिम धर्मातील पाचवा महत्वपूर्ण स्तंभ मानला जातो. रमजानच्या महिन्यात वेगवेगळ्या देशात नियम बदलेले जात असतात. इजिप्त देशात रमजान महिन्यात घड्याळे एक तास पुढे केली जातात कारण सायंकाळच्या वेळी रोजा लवकर सोडता यावा. त्याचबरोबर काही ठिकाणी ऑफिसमध्ये काम करण्याच्या वेळांमध्ये देखील कपात केली जाते कारण लोकांना अल्लाहची प्रार्थना करण्यासाठी जास्त वेळ भेटू शकेल. अनेक मुस्लिम देश जिथे दिवस मोठा असतो आणि चंद्र देखील उशिरा दिसत असतो त्या देशातील लोक मक्काच्या वेळेनुसार रोजा ठेवत असतात. या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून खरेदी जास्त होत असते यामुळे विविध वस्तूंच्या किंमती वाढत असतात.

सायंकाळी सुर्य मावळल्यानंतर रोजा सोडणे याला इफ्तार Iftar असे म्हणतात तर सकाळी सुर्य उगवण्याच्या आधी काही खाऊन रोज्याची सुरुवात करण्याला सहरी Sehri म्हटले जाते.

eid al fitr mubarak image
रमजान ईदला का एवढे महत्त्व आहे? Ramzan Eid information in Marathi

रोजाच्या कडक नियमांमध्ये काही सूट देखील दिली जाते. जर कोणी प्रवासात असेल किंवा स्वास्थ्य ठीक नसेल तर ते नंतर रोजा ठेवू शकतात. रोजा च्या दरम्यान जर कोणी चुकून काही खाल्ले किंवा कोणाकडून जबरदस्ती भरवले गेले तरीदेखील रोजा मोडत नसतो. गर्भवती महिला किंवा बुजुर्ग व्यक्तींना रोजा न ठेवण्याची सूट दिलेली असते. या महिन्यात जास्तीत जास्त अल्लाहच्या प्रार्थनेत वेळ घालवणे शुभ मानले जाते.

या महिन्यातील रोजा ठेवण्याचे नियम खूप कडक असतात. रोजा पाळत असताना काहीही खाण्या पिण्याची परवानगी नसते. रमजानच्या महिन्यात भांडणतंटे बघण्यास देखील मनाई असते. त्याचबरोबर नशा आणि शारीरिक संबंधांपासून दूर राहणे गरजेचे असते. यावेळी भांडणतंटे, मारामारी करणे किंवा हातापायाचा चुकीचा वापर करणे देखील चुकीचे मानले जाते.

रोजच्या दिवसांत रात्री ९ वाजता विशेष नमाज पठण केले जाते. रमजान च्या दरम्यान अल्लाहचे नाव घेणे, कुराण पठण करणे आणि दान करणे आवश्यक असते. रमजानच्या या काळात जन्नतची इच्छा करणाऱ्यांना जन्नत मिळते असे मानले जाते. या महिन्यात गरीब लोकांमध्ये जकात आणि फितरी दिली जाते जे एक प्रकारचे दान असते.

अशाप्रकारे रमजानचा पवित्र महिना मुस्लिमांमध्ये प्रेमाची आणि पावित्रतेची भावना निर्माण करत असतो.


ramadan eid mubarak images
रमजान ईदला का एवढे महत्त्व आहे? Ramzan Eid information in Marathi

रमजान ईद वर १० ओळी 10 lines on ramzan eid

१. रोजा ठेवणे हा इस्लाम धर्मातील पाच स्तंभांपैकी एक महत्वाचा स्तंभ आहे.

२. मुस्लिम धर्मियांसाठी रमजान ramadan हा वर्षातील सर्वात पवित्र महिना असतो.

३. या पवित्र महिन्यात मुस्लिम धर्मातील लोक दिवसभरातील सर्व सुखापासून दूर राहतात.

४. सूर्याच्या पहिल्या किरणापासून रोजा सुरू होतो आणि सुर्य मावळल्यानंतर रोजा सोडण्यात येतो.

५. या पूर्ण पवित्र महिन्यात मुस्लिम लोक जास्तीत जास्त वेळ अल्लाहच्या प्रार्थनेत घालवत असतात.

६. रोजा ठेवणारे लोक खोटे वागणे, फसवणूक करणे इत्यादी गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. तसेच अधिकाधिक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात.

७. रमजान महिन्याच्या २७ व्य दिवशी लैलत-अल-कद्र Laylat Al Qadr ही वर्षातील सर्वात पवित्र रात्र साजरी केली जाते.

८. रमजान महिन्याचा शेवटचा दिवस हा रमजान ईद किंवा ईद-अल-फीतर eid al fitr म्हणून साजरा केला जातो.

९. ईदच्या दिवशी लोक त्यांच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना भेटून त्यांना विविध भेटवस्तू देत असतात.

१०. ईदच्या दिवशी लोक एकमेकांना ईद मुबारक eid mubarak म्हणून शुभेच्छा देत असतात.


Tags : रमजान ईदला का एवढे महत्त्व आहे, Ramadan Eid al fitr in Marathi,ramzan eid,laylat al qadr,eid al fitr,eid mubarak,ramadan, इफ्तार,सहरी,sehri,iftar, रमजान ईद,शब-ए-कद्र shab e qadr,मोहम्मद पैगंबर, Mohammad Paigambar,why ramadan celebrated,what is ramadan

Leave a Comment