सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स मराठी – Share Market Tips in Marathi

शेअर मार्केट टिप्स मराठी – Share Market Tips in Marathi देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेअर मार्केट मध्ये अनेक लोक भरपूर पैसे कमावण्याच्या उद्देशानेच येत असतात. अगदी काहीच महिन्यात आपले पैसे दुप्पट, तिप्पट होतील असा गोड गैरसमज घेऊन ते बाजारात येतात आणि आपल्याकडील आहे नाही तेवढे सगळे पैसे स्टॉक मार्केट मध्ये गुंतवतात.

काही जण तर आपल्या मित्रांकडून किंवा आपल्या घरातील सदस्यांकडून उधार पैसे घेऊन शेअर मार्केट मध्ये लावतात. याचा परिणाम असा होतो की त्यांच्या ह्या लोभामुळे त्यांचे सगळे पैसे ते मार्केट मध्ये गमावून बसतात आणि मग ते निराश होऊन जातात. शेअर मार्केटमधून पैसा कमावणे दिसते तेवढेही सोपे नसते.

शेअर बाजारात अनेक चढ-उतार येत असतात त्यामुळे अनेक लोकांना हेच समजत नाही की कोणता शेअर कधी खरेदी करायचा कधी विकायचा किंवा एखादा शेअर आपल्याकडे ठेवावा म्हणजेच होल्ड करावा की नाही?

सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स मराठी Share Market Tips in Marathi

share market success quotes in marathi
सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स मराठी Share Market Tips in Marathi

शेअर मार्केट मध्ये सफल होण्यासाठी कोणताच शॉर्टकट किंवा कोणतेही निश्चित सूत्र नाहीये. परंतु शेअर मार्केटमध्ये व्यापार करत असताना काही ठराविक नियमांचे पालन केले असता आपले सफल होण्याची शक्यता वाढत असते.

शेअर मार्केट म्हणजे जोखीम Stock Market is Risk

शेअर मार्केट म्हणजे जोखीम हे मनावर कोरूनच आपण शेअर बाजारात पाऊल ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपण जेवढं नुकसान सहन करू शकतो किंवा जेवढं नुकसान सहन करण्याची आपली क्षमता असेल तेवढीच रक्कम घेऊन आपण शेअर मार्केट मध्ये पाऊल ठेवले पाहिजे.

शेअर मार्केट म्हणजे जोखीम Stock market is riskShare Market Tips in Marathi image
Stock market is risk | Share Market Tips in Marathi

शेअर मार्केट मधील जोखीम लक्षात घेता आपण कोणाकडूनही उधार उसने पैसे घेऊन यात एन्ट्री घेऊ नये. कारण शेअर मार्केट जेवढा परतावा मिळवून देऊ शकते त्यापेक्षा खूप जास्त नुकसान देखील करू शकते.

आपल्याकडचे अतिरिक्त पैसेच गुंतवणे Just Investing Extra Money

शेअर मार्केट मध्ये आपल्याकडील सर्व पैसा गुंतवण्यापेक्षा आपल्याकडे जो जादाचा एक्स्ट्रा पैसा आहे फक्त तेवढ्याचीच आपण गुंतवणूक करावी. आपल्याकडे जास्तीचा पैसा जरी असेल परंतु त्या पैशाची जर आपल्याला पुढील काळात म्हणजेच भविष्यात गरज भासणार असेल तर तो पैसा देखील शेअर बाजारात गुंतवणे कठीण ठरू शकते.

Just investing extra money Share Market Tips in Marathi
Just investing extra money | Share Market Tips in Marathi

समजा आपल्याकडे बँकेत एक लाख रुपये असतील आणि आपण ते पैसे काढून शेअर मार्केट मध्ये गुंतवले. परंतु जर पुढील काही दिवसात आपल्याला एखाद्या आवश्यक कामासाठी उदा. दवाखान्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च किंवा इतर अचानक उद्भवणारे खर्च इत्यादी. साठी लागणार असतील. पण आपण पैसे मार्केट मधून काढायला गेल्यावर तेव्हा त्याचे मूल्य हे एक लाखाहून थोडे कमी ९० हजार झाले असेल तर आपणाला आपली पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी आहे त्या किंमतीत नुकसान सहन करून आपले शेअर्स विकावे लागतात.

भारतातील शेअर बाजाराची ओळख

शेअर बाजारात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक

त्यामुळे शेअर मार्केटमध्ये फक्त अतिरिक्त आणि भविष्यात कामी न येणारा पैसा घेऊनच एन्ट्री करावी.

इतरांचे ऐकुन गुंतवणूक न करणे Never listen to others when investing

आपल्या एखाद्या मित्राने, नातेवाईकाने किंवा टीव्ही आणि इतर माध्यमातील लोकांनी किंवा तज्ज्ञांनी सांगितले म्हणून कधीच गुंतवणूक करू नये. सगळे लोक सांगायला सांगतात की या या शेअर मध्ये गुंतवणूक करा यामध्ये खूप परतावा मिळेल परंतु पैसे आपले आहेत कोणत्या शेअर मध्ये गुंतवणूक करायची याचा सर्वस्वी निर्णय आपलाच असला पाहिजे.

Share Market Tips in Marathi images share market quotes in marathi
Never listen to others when investing | Share Market Tips in Marathi

गुंतवणूक आपणच करायची याचा अर्थ असा नाही की कोणत्याही वाटेल त्या शेअर मध्ये पैसे लावायचे. तर त्या शेअर चा योग्य तो अभ्यास करून त्याबद्दल योग्य ती माहिती मिळवून त्यात गुंतवणूक करावी. त्यासाठी आपण टीव्ही किंवा इतर माध्यमातील तज्ञांचा फक्त सल्ला ऐकावा. फक्त ते सांगतात म्हणून कधीच कोणत्या शेअर मध्ये गुंतवणूक करू नये.

पूर्ण अभ्यास करूनच गुंतवणूक करणे Invest Only by Doing Research

डोळे झाकून कोणत्याही शेअर मध्ये पैसे लावले तर तो जुगार ठरतो आणि त्यामध्ये अपयश येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना त्या शेअरचा पूर्ण अभ्यास करावा. त्या शेअरच्या तांत्रिक आणि मूलभूत ( technical and fundamental analysis ) बाबींचा अभ्यास करूनच त्यात गुंतवणूक करावी.

share market marathi quotes images Share Market Tips in marathi
Invest only by doing research | Share Market Tips in Marathi

जेव्हा आपण एखाद्या शेअरचा परिपूर्ण अभ्यास करू आणि आपणाला त्या शेअरमधून नफा होण्याची पूर्ण खात्री होईल तेव्हाच आपण त्यात गुंतवणूक करावी. शेअर मार्केट मध्ये सफल होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे अभ्यास आणि फक्त अभ्यास.

शेअर म्हणून नाही तर व्यवसाय म्हणून गुंतवणूक करणे Investing not as a Stock but as a Business

शेअर स्वस्त मिळतोय किंवा वरती जात आहे हे पाहून कधीच कोणत्या शेअर मध्ये गुंतवणूक करू नये. हो, यामुळे कदाचित तात्पुरता फायदा होऊ शकतो परंतु जर दीर्घकालीन गुंतवणूक करून भरपूर फायदा करून घ्यायचा असेल तर आपण ज्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करणार आहोत त्या कंपनीच्या व्यवसायाबद्दल माहिती करून घेणे महत्त्वाचे ठरते.

share market success quotes status image
Investing not as a stock but as a business | Share Market Tips in Marathi

आपण कंपनीच्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती करून घेऊन, कंपनी काय उत्पादन बनवते किंवा कंपनी ग्राहकांना काय सेवा पुरवते, कंपनीच्या उत्पादन किंवा सेवांबद्दल लोकांचे काय मत आहे, त्यांना बाजारात किती मागणी आहे, भविष्यात त्यांची मागणी वाढेल की कमी होईल या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण एखाद्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास फायद्यात राहता येते.

भावनिक न होणे Not Being Emotional When Investing

शेअर मार्केटमध्ये कार्यरत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे स्वतःवर विश्वास आणि संयम ठेवणे. जर आपण गुंतवणूक केलेले शेअर्स काही कारणास्तव चांगली कामगिरी नाही करू शकले तर खचून न जाता संयम बाळगणे फायद्याचे ठरते. उगीच घाबरून जाऊन चुकीचा निर्णय घेतल्याने स्वतःचे नुकसान होऊ शकते.

share market success quotes status image marathi
Not being emotional when investing | Share Market Tips in Marathi

जगविख्यात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे Warren Buffett यांचे एक वाक्य आहे. शेअर मार्केट ही एक अशी यंत्रणा आहे जी पैशाला असंयमी व्यक्तींकडून संयम पाळणाऱ्या व्यक्तींकडे हस्तांतरण करण्याचे काम करत असते.

“The stock market is a device to transfer money from the impatient to the patient.”

-Warren Buffett

म्युचुअल फंड हा नेमका विषय आहे तरी काय?

अफिलिएट मार्केटींग मधून हजारों रूपये कसे कमवावे?

कमी पैशांत कोणता व्यवसाय करावा?

शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना घाबरून जाऊ नये तसेच अधिक लालची देखील होऊ नये याउलट अती भावनिक न होता संयम पाळून, भीती आणि लोभ बाजूला ठेवून शांतपणे गुंतवणूक केली तर सफल होण्याचे प्रमाण आपोआप वाढत असते.

गुंतवणुकीत भिन्नता आणणे Variation in Investment

आपल्याकडे आहे नाही तेवढे सगळे पैसे एकाच शेअर मध्ये गुंतवणे अधिक जोखमीचे असते. भलेही आपण त्या शेअरचा कितीही अभ्यास केलेला असला तरीही जर शेअरने आपल्या अपेक्षे प्रमाणे काम नाही केले तर आपले सगळे पैसे त्यात बुडू शकतात. त्यामुळे सगळे पैसे एकाच शेअर मध्ये लावण्यापेक्षा थोडे थोडे करून अनेक शेअर मध्ये गुंतवलेले फायद्याचे ठरते.

उदाहरणार्थ, जर आपल्याकडे एक लाख रुपये आहेत आणि आपण ते एका विशिष्ट कंपनीचा अभ्यास करून त्यात गुंतवले. परंतु तरीही काही कारणास्तव त्या कंपनीचा शेअर ची किंमत पडली तर आपले मोठे नुकसान होऊ शकते. परंतु तेच पैसे आपण ५ वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून प्रत्येक कंपनीत २० हजार अशा प्रकारे गुंतवणूक केली तर त्यापैकी २ कंपन्यांमध्ये जरी नुकसान झाले तरी इतर ३ कंपन्या आपल्याला फायदा नक्कीच करून देतील.

त्यामुळे गुंतवणूक करताना एकरकमी गुंतवणूक करणे टाळून आपल्या गुंतवणुकीत विविधता आणणे गरजेचे असते. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ Diversified Portfolio बनविल्याने जोखीम ही विभागली जाते जेणेकरून होणारे नुकसानीचे प्रमाण देखील कमी होत असते.

वास्तववादी अपेक्षा ठेवणे Having Realistic Expectations

जगविख्यात आणि सफल गुंतवणूकदार मिस्टर.वॉरेन बफे Warren Buffett यांनी आपल्या एका लेखात म्हटले आहे की जर शेअर मार्केटमधून जर आपणाला किमान १२% परतावा मिळत असेल तर याला खरंच आपलं चांगलं नशीब समजावं. त्यामुळे शेअर मार्केट मध्ये एन्ट्री घेताना अतिप्रमाणात अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

आपले ध्येय आणि आपल्या अपेक्षा पारदर्शी आणि वास्तववादी असाव्यात. ज्या आपणाला थोडे कष्ट आणि अभ्यास केल्यावर सहज पूर्ण करता येतील अशा अपेक्षा असतील तर मार्केट मध्ये सफल होणे सोपे होऊन जाते.

मार्केटचे सतत बारकाईने निरीक्षण करणे Constantly Monitoring the Market

अनेक लोक एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करून मग निश्चिंत होऊन भरपूर परतावा मिळण्याची वाट पाहत बसतात. परंतु हा सगळ्यात मोठा धोका असतो. कंपनी कितीही चांगली असली तरी एकदा गुंतवणूक केल्यानंतरही त्या कंपनीचा अभ्यास करत राहणे, कंपनीच्या नवीन धोरणांबाबत माहिती मिळवणे, कंपनीच्या व्यवस्थापनातील बदल इत्यादी गोष्टींबाबत जागरूक राहणे एका सफल गुंतवणूकदाराचे लक्षण असते.

share market success quotes status images
Constantly monitoring the market | Share market tips in marathi

एकदा आपण गुंतवणूक केल्यानंतर अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक गोष्टींचा, बातम्यांचा किंवा सरकारी घोषणांचा बारकाईने अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. आपण गुंतवणूक केलेल्या कंपनीच्या व्यवसायाशी निगडित सर्व गोष्टींबद्दल अपडेट राहणे आवश्यक असते. जेणेकरून येणाऱ्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आपणाला मिळत राहील.

दिर्घकालीन गुंतवणूक करणे Long Term Investment in Shares

जे नवीन लोक शेअर मार्केट मध्ये येत असतात ते इंट्राडे च्या २० पट मिळणाऱ्या मार्जिन ला भुलले जातात आणि झटपट पैसा कमावण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेतात. इंट्राडे ट्रेडिंग Intraday Trading १०० पैकी फक्त १% लोक सफल होत असतात त्यामुळे जर कमी जोखीम घेऊन भरपूर पैसा कमवायचा असेल तर दिर्घकालीन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

success status for share market in Marathi
Long term investment in shares | Share market tips in marathi

जगभरातील जेवढे पण मोठे आणि यशस्वी गुंतवणूकदार आहेत ते सगळे दिर्घकालीन गुंतवणूक Long-term Investment करूनच मोठे झालेले आहेत. पैसे कमावण्यासाठी कधीही ट्रेडिंग करण्याचा सल्ला ते देत नाहीत. दिर्घकालीन गुंतवणुकीसाठी संयम खूप महत्त्वाचा असतो आणि जो संयम पाळून दिर्घ काळासाठी एखाद्या कंपनीत गुंतवणूक करतो तोच त्यातून आपली मालमत्ता तयार करतो.

“शेअर मार्केट म्हणजे जुगार” किंवा “शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात” हे गैरसमज भारतातील अजुनही बऱ्याच लोकांचे असतात. परंतु तसे नाहीये शेअर मार्केटचा जर नीट अभ्यास केला आणि वर दिलेली सगळी सूत्रे व्यवस्थित पाळली तर त्यातून नक्कीच मोठा पैसा उभा केला जाऊ शकतो.

Read More: Best Cloud CRM Solutions For Small Business


Tags : share market tips in marathi, share market quotes in marathi, शेअर मार्केट टिप्स मराठी, share market for beginners in marathi, Share Market Books in Marathi, इंट्रा डे ट्रेडिंग मराठी, शेअर बाजार पुस्तक pdf download Free, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf, शेअर मार्केट अभ्यास

2 thoughts on “सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स मराठी – Share Market Tips in Marathi”

  1. खुप छान सरल भाषेत सांगले आहात एकदम छान पॉइंट सांगले 👍

    Reply

Leave a Comment