स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक Stock Trading and Investment in Marathi

Stock trading and investment in marathi अनेक लोकांना वाटतं की शेअर मार्केटशी संबंध असणाऱ्या स्टॉक ट्रेडिंग आणि इन्वेस्टिंग stock trading and investing या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. परंतु असे नाहीये. आज आपण पाहूया ट्रेडिंग आणि इन्वेस्टिंग म्हणजे काय? आणि ट्रेडिंग आणि इन्वेस्टिंग मध्ये काय फरक असतो?

स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक Stock Trading and Investment in Marathi

Stock Trading and Investment img
स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक Stock Trading and Investment in Marathi

डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट म्हणजे काय?

१. ट्रेडिंग Stock Trading:

जे लोक ट्रेडिंग करतात त्यांना ट्रेडर्स म्हटले जाते. ट्रेडर्स हे शेअर्सच्या विश्लेषणासाठी टेक्निकल एनालिसिस Technical Analysis चा वापर करत असतात.

टेक्निकल ॲनालिसिस म्हणजेच तांत्रिक विश्लेषणामध्ये चार्ट च्या साहाय्याने किंमत आणि वॉल्यूम price and volumes च्या नमुन्यांचे विश्लेषण केले जाते. आणि त्यानंतर स्टॉकचा मागणी आणि पुरवठा तसेच ट्रेडर्सच्या मानसिकतेला समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

ट्रेडिंग चे प्रकार Types of trading

ट्रेडिंग मध्ये कमी कालावधी साठी म्हणजेच काही सेकंदापासून ते काही महिन्यांपर्यंत शेअर्स खरेदी करून ठेवले जातात. ट्रेडिंग मध्ये पण वेगवेगळे प्रकार Types of trading आहेत. जसे की स्काल्प ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग तसेच पोझिशन ट्रेडिंग इत्यादी.

स्काल्प ट्रेडिंग Scalping trading

यामध्ये शेअर्स हे काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपर्यंत घेऊन ठेवले जातात. स्कॅलपिंग Scalping trading या ट्रेडिंग शैलीमध्ये किंमतीत अगदी कमी प्रमाणत बदल घडून आल्यावर नफा मिळवला जातो. त्याचप्रमाणे पुनर्विक्रीतून नफा कमावला जातो.

इंट्राडे ट्रेडिंग Intraday trading

इंट्राडे ट्रेडिंग चा अर्थ याच्या नावातच समाविष्ट आहे. ज्या दिवशी आपण शेअर्स खरेदी करतो आणि त्याच दिवशी त्यांची विक्री करतो तेव्हा त्याला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हटले जाते. इंट्राडे ट्रेडिंग Intraday trading हा शेअर मार्केट ट्रेडिंग मधला सर्वात लोकप्रिय ट्रेडिंग प्रकार आहे.

स्विंग ट्रेडिंग Swing trading

स्विंग ट्रेडिंग मध्ये शेअर्स हे काही दिवसांपासून ते काही हप्त्यांपर्यंत राखून ठेवले जातात म्हणजेच होल्ड केले जातात आणि शेअरच्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलानुसार नफा स्विंग ट्रेडिंग Swing trading मध्ये काढला जातो.

पोझिशन ट्रेडिंग Position trading

पोझिशन ट्रेडिंगमध्ये शेअर्स खरेदी करून ते काही महिन्यांसाठी राखून ठेवले जातात. त्यांनतर नफा झाल्यावर त्या शेअर्सची विक्री केली जाते.

उदा. समजा एखाद्या कंपनीच्या शेअर ची किंमत १०० रुपये इतकी आहे जर आपण त्या कंपनीच्या मूलभूत गोष्टींचा अभ्यास केला आणि आपल्याला असे वाटले की हा शेअर येत्या ५-६ महिन्यांत १५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो तेव्हा आपण तो शेअर घेऊन ५-६ महिन्यांत नफा मिळालेला पाहून विक्री करून टाकायचा यालाच पोझिशन ट्रेडिंग Position trading म्हणतात.

बी.टी.एस.टी. ट्रेडिंग btst trading

BTST हा देखील शेअर मार्केट ट्रेडिंगचा एक लोकप्रिय प्रकार आहे. BTST म्हणजे Buy Today Sell Tomorrow म्हणजेच आज खरेदी करणे आणि उद्या विकणे. यामध्ये व्यापारी स्टॉकच्या किमतींमध्ये होणाऱ्या दैनंदीन बडलातून नफा कमवण्याचा प्रयत्न करत असतात.

२.इन्वेस्टिंग Investing

इन्वेस्टिंगमध्ये लाँग टर्म long term साठी म्हणजेच एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी स्टॉक्स मध्ये गुंतवणूक केली जाते. जे लोक अशी दीर्घकालीन गुंतवणूक करतात त्यांना इन्वेस्टर्स investors म्हणजेच गुंतवणुकदार असे म्हटले जाते.

investing vs Trading image
स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक Stock Trading and Investment in Marathi img – Educba

गुंतवणुकदार हे शेअर्स खरेदी करून ते शेअर अधिक काळापर्यंत होल्ड करण्याच्या दृष्टीकोनातून विचार करत असतात. गुंतवणुकदार हे एखाद्या कंपनीत गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीला त्या कंपनीत मिळणाऱ्या भागीदारीप्रमाणे पाहत असतात आणि त्या गुंतवणुकीत वर्षानुवर्षे टिकून राहतात.

इन्वेस्टर्स हे नेहमी उद्योजकांप्रमाणे विचार करत असतात. ज्याप्रमाणे उद्योजक एखाद्या उद्योगाला समजून घेऊन त्याचा नीट अभ्यास करून त्यात गुंतवणूक करतो त्याच प्रमाणे गुंतवणुकदार देखील तितक्याच बारकाईने अभ्यास करून त्यात गुंतवणूक करत असतात.

इन्वेस्टिंग चे प्रकार Types of Investing

इन्वेस्टिंग मध्ये कंपनीच्या शेअर ऐवजी त्या कंपनीचा अभ्यास अधिक केला जातो. त्यासाठी कंपनीच्या मूलभूत गोष्टींचे विश्लेषण करून त्याचा अभ्यास केला जातो. या इन्वेस्टिंग मध्ये देखील दोन प्रकार येतात.

व्हॅल्यू इन्वेस्टिंग Value Investing

व्हॅल्यू गुंतवणूक हा गुंतवणूकीचे एक प्रकार आहे ज्यामध्ये शेअर्स खरेदी केले जातात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या मूलभूत गोष्टींचा fundamental analysis अभ्यास करून ज्या चांगल्या कंपनीचे शेअर्स हे कमी किंमतीत मिळत असतील अशा शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे म्हणजेच व्हॅल्यू इन्वेस्टिंग value investing होय.

ग्रोथ इन्वेस्टिंग Growth Investing

ग्रोथ इन्व्हेस्टमेंट growth investing ही गुंतवणूक करण्याची एक अशी पद्धत आणि कार्यनीती आहे ज्यामध्ये गुंतवणूकदाराचे भांडवल वाढविण्यावर भर देण्यात येतो. अशी गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार हे सामान्यतः ज्या कंपन्यांची वाढ होणार आहे मग ती कंपनी लहान असो किंवा मोठी अशा कंपनीत गुंतवणूक करत असतात.

Stock Trading and Investment analysis in marathi
स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक Stock Trading and Investment in Marathi

ट्रेडिंग रणनीती Trading strategies

ट्रेडर्सचे लक्ष हे शेअरच्या किमतीवर आणि वॉल्यूम वर असते. शॉर्ट टर्म मध्ये शेअर्स च्या किंमतीत अधिक चढउतार असतात त्यामुळे ट्रेडर्स हे फंडामेंटल ॲनालिसिस ऐवजी टेक्निकल ॲनालिसिस technical analysis करत असतात. ज्यामध्ये कँडल्स आणि चार्टच्या candles and chart साहाय्याने किंमत आणि वॉल्यूम price and volume चे विश्लेषण केले जाते.

गुंतवणुक रणनीती Investment strategies

गुंतवणूकदारांचे लक्ष हे कंपनीच्या मूलभूत गोष्टींवर असते. दीर्घ काळामध्ये शेअरची किंमत ही कंपनीच्या विस्तारावर अवलंबून असते त्यामुळे गुंतवणुकदार कंपनीच्या मूलभूत गोष्टींचे विश्लेषण fundamental analysis करतात. विश्लेषणाचा हा प्रकार बाह्य घटना आणि प्रभाव, तसेच फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि उद्योगाच्या ट्रेंडवर आधारित असते.

नफ्यावरील कर tax on stock gains

ट्रेडिंग मध्ये शेअर्स हे कमी कालावधीसाठी होल्ड केले जातात त्यामुळे जर आपण शेअर्स एका वर्षापेक्षा कमी काळासाठी राखून ठेवल्यास आपणाला होणाऱ्या नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स short term capital gain tax द्यावा लागतो. भारतातील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स short term capital gain tax हा जवळपास १५% इतका आहे. परंतु हा टॅक्स इंट्राडे ट्रेडिंगसाठी लागू होत नाही.

गुंतवणुकदार हे शेअर्सला अनेक वर्षांसाठी होल्ड करत असतात. जर आपण शेअर्स हे एका पेक्षा अधिक वर्षांसाठी राखून ठेवल्यास आपणाला कॅपिटल गेन टॅक्स capital gain tax पासून सूट मिळत असते. दीर्घकालीन गुंतवणुकदार म्हणजेच इन्वेस्टर investor होण्याचा हा एक फायदा आहे.

स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक Stock trading and investment in marathi ही माहिती आपणाला आवडली असल्यास खाली कमेेंट करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.


Tags : स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक,Stock Trading and Investment in Marathi,types of trading, Scalping trading, Intraday trading,swing trading, position trading,btst trading,types of investing, value investing, growth investing,day trading strategies, Investment strategies,tax on stock gains,short term capital gain tax

3 thoughts on “स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक Stock Trading and Investment in Marathi”

  1. फार छान माहिती दिली . इंट्रा डे ट्रेडिंग किंवा आॕप्शन ट्रेडिंग केल्यास इनकम टॕक्सच्या बाबतीत माहीती मिळालीत तर फार बरे होईल.

    Reply

Leave a Comment