ड्रॉप शिपिंग म्हणजे काय? What is Dropshipping Business in Marathi

What is Dropshipping Business in Marathi ड्रॉप शिपिंग म्हणजे काय? ड्रॉप शिपिंग कसे काम करते? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात येत असतात. हा ड्रॉप शिपिंग चा व्यवसाय dropshipping india नक्की कसा करतात तर आज हे आपण पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम आपणाला समजून घ्यावं लागेल की हे ड्रॉप शिपिंग dropshipping india म्हणजे काय नेमकं?

What is Dropshipping Business in Marathi
What is Dropshipping Business in Marathi

ड्रॉप शिपिंग म्हणजे काय? what is dropshipping business in Marathi?

ड्रॉप शिपिंग dropshipping हा एक कमी गुंतवणुक प्रकारातील ट्रेडिंग व्यवसाय आहे. ड्रॉप शिपिंग मध्ये आपणाला मिळणाऱ्या ऑर्डरची तसेच ग्राहकाची शिपमेंट डिटेल ही त्या प्रोडक्टच्या डीलर पर्यंत पोहचवावी लागते. ड्रॉप शिपिंग व्यवसायात उद्योजकाला एक ई-कॉमर्स वेबसाइट e-commerce website तयार करावी लागते.

अगदी कमी गुंतवणुकीत सुरू होणारे हे व्यवसाय तुम्ही करू शकता

उद्योजक हे विविध वस्तूंच्या विक्रेत्यांशी संपर्क करून त्यांचे विविध प्रोडक्ट्स हे आपल्या ई-कॉमर्स साईट वर दाखवत असतात. जिथे त्या वस्तूची किंमत आणि वस्तूसंबंधीची इतर माहिती दिलेली असते. त्या नंतर जेव्हा ग्राहक त्या साईट वरून एखादी ऑर्डर देतो तेव्हा त्या ऑर्डर ची माहिती आणि ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाची माहिती ही त्या वस्तूच्या मूळ विक्रेत्या पर्यंत पाठवली जाते. जेणेकरून तो विक्रेता त्या वस्तूला दिलेल्या माहितीच्या आधारावर त्या ग्राहकापर्यंत थेट पोहचवत असतो.

या प्रक्रियेत आपली जास्त काही भूमिका नसते. या ड्रॉप शिपिंग Drop shipping च्या व्यवसायात आपण आपल्या वेबसाईटवर लिस्ट करण्यासाठी अधिक नफा मिळवून देणारे प्रोडक्ट्सची निवड करू शकतो.

ड्रॉप शिपिंग व्यवसाय कसा सुरु करावा? how to start dropshipping business in marathi india?

ड्रॉप शिपिंग व्यवसायात dropshipping business in marathi उतरण्यासाठी आपल्याकडे सर्वप्रथम एक ई-कॉमर्स वेबसाईट असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्याकडे साधारण एक कॉम्प्युटर आणि बेसिक इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

त्यानंतर आपणाला त्या विक्रेत्यांशी संपर्क करावा लागेल ज्यांचे प्रोडक्ट्स आपण आपल्या वेबसाईटवर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देणार आहोत.

भारतामध्ये ड्रॉप शिपिंग drop shipping india करण्यासाठी आपण ते प्रोडक्ट्स निवडू शकतो ज्यांची ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

अफिलिएट मार्केटींग मधून हजारों रूपये कसे कमवावे?

ड्रॉप शिपिंग करण्यासाठी ह्या बेसिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यानंतर आपणाला ही गोष्ट माहिती असणे अधिक गरजेचे आहे की आपण ज्या विक्रेत्यांचे उत्पादन विकणार आहोत तो विक्रेता त्या वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करण्यासाठी सक्षम आहे का? कारण कधीकधी आपण आपल्या वेबसाइटवर दर्शवित असलेली वस्तू ही विक्रेता ग्राहकाला न देता त्यासारखी दुसरी वस्तू देखील देऊ शकतो. याचा परिणाम आपल्या वेबसाईटच्या विश्वासार्हतेवर आणि त्याचबरोबर आपल्या व्यवसायावर देखील पडत असतो.

ड्रॉप शिपिंग हा एक ऑनलाईन व्यवसाय online dropshipping business in marathi असल्यामुळे यामध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन करणे अधिक गरजेचे असते. जे की आपल्या व्यवसायावर सकारात्मक परिणाम घडवून आणत असते. जर ग्राहकाला त्याने ऑर्डर केलेली समान वस्तू न मिळाल्यास त्याच्या रिप्लेसमेंटची काय प्रक्रिया असते याची माहिती करून घेणे देखील महत्त्वाचे असते.

ड्रॉप शिपिंग मध्ये विक्रेता कसा निवडावा? How to Find and Work With Reliable Dropshipping Suppliers?

ड्रॉप शिपिंग व्यवसायात dropshipping business in marathi विक्रेत्याची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे उद्योजकाने हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्या वेबसाईट साठी विक्रेत्यांची निवड करताना त्यांच्याजवळ अधिकृत विक्रेता असल्याचे प्रमाणपत्र असावे. तसेच त्यांना अशा वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करण्याचा अधिक काळाचा अनुभव असावा म्हणजे ते विक्रेते हे खूप पूर्वीपासून अशा वस्तूच्या उत्पादनाशी आणि मार्केटिंग सोबत जोडले गेलेले असावेत.

आपण ज्या काही वस्तू आपल्या वेबसाईटवर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत त्या वस्तूंचा आपल्या विक्रेत्यांकडे उपलब्धता किती आहे तसेच प्रोडक्ट शिपमेंट आणि प्रोडक्ट रिप्लेसमेंट मध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची असेल याबाबत अधिक माहिती करून घेणे देखील महत्त्वाचे ठरते.

ड्रॉप शिपिंग मध्ये क्वालिटी कंट्रोल कसा ठेवावा? How to maintain quality control in drop shipping?

आपल्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट शो करण्याआधी त्या प्रोडक्टच्या विक्रेत्यांशी संपर्क करावा तसेच त्यांच्याकडून सहमती पत्र घ्यावे ज्यामध्ये असे ठरवून घ्यावे की जे प्रोडक्ट्स आपण आपल्या वेबसाईटवर दाखवले आहेत ते तिथेच राहतील त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही. जरी बदल करावा लागला तरी तो अधिकार फक्त उद्योजकाला dropshipper असेल.

आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रत्येक प्रोडक्ट्सची सविस्तर माहिती द्यावी. तसेच या गोष्टीची हमी द्यावी की चुकीचे प्रोडक्ट डिलिव्हर झाल्यास ते परत केले जाऊ शकते. या गोष्टींची आपण वेळोवेळी तपासणी करत राहणे आवश्यक असते.

ग्राहकांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी आपल्या वेबसाईटवर एक कॉन्टॅक्ट फॉर्म, ग्राहकांचा प्रतिसाद घेण्यासाठी फीडबॅक फॉर्म अवश्य उपलब्ध करून द्यावा जेणेकरून ग्राहकांच्या समस्या आपल्यापर्यंत त्वरीत येऊन आपणाला त्या समस्यांचे त्वरित निराकरण करता यावे.

dropshipping image
ड्रॉप शिपिंग – Dropshipping Business in Marathi Image via : Indianretailer.com

ड्रॉप शिपिंग व्यवसायात प्रोडक्ट्स कसे निवडावे? How to Find The Perfect Dropshipping Products in 2021

सर्वप्रथम आपण प्रोडक्ट्सची यादी बनवून घ्यावी आणि त्यातील असे प्रॉडक्ट्स निवडावे ज्यांना ऑनलाईन मोठ्या प्रमाणावर मागणी असते. जसे की मोबाइल, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, मोबाईल व कॉम्प्युटर ॲसेसरिज, कपडे, शूज, पुस्तकं, खेळणी, लहान आकाराचे घरगुती सामान इत्यादी.

ज्या प्रोडक्ट्सचे शिपिंग चार्जेस अधिक असते अशा उत्पादनांना आपल्या यादीमध्ये ठेवू नये कारण जास्त शिपिंग चार्जेस मुळे कमी नफा होण्याची शक्यता अधिक असते.

  • नवीनतम उत्पादनांच्या ट्रेंडवर लक्ष ठेवणे.
  • काही लोकप्रिय ड्रॉप शिपिंग टॉपिक वर संशोधन करणे.
  • आपले प्रतिस्पर्धी काय विक्री करीत आहेत ते शोधणे.
  • विविध प्रोडक्ट्सचे फेसबूकच्या माध्यमातून संशोधन करणे.
  • इतर शॉपिंग साईट्स बद्दल संशोधन करणे.
  • उत्पादनांवर चर्चा करणार्‍या ऑनलाइन समुदायांमध्ये सामील होणे.
  • Google द्वारे उत्पादनांच्या कल्पना मिळवणे.

ड्रॉप शिपिंग व्यवसायाचे फायदे advantages of dropshipping business in marathi

  • ड्रॉप शिपिंग व्यवसाय करण्यासाठी एक किंवा जास्तीत जास्त दोन व्यक्तींची आवश्यकता असते.
  • अगदी कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.
  • हा व्यवसाय घरबसल्या देखील करता येऊ शकतो. फक्त सुरुवातीला विक्रेत्यांशी संपर्क करण्यासाठी थोडी धावपळ करावी लागते.
  • ड्रॉप शिपिंग या व्यवसायात ॲवेंटरी मेनटेनन्स आणि स्टोअर टेक्निकलची कोणतीही भूमिका नसते.
  • जर व्यवसायाचे रेव्हेन्यू मॉडेल अनुकूल असेल तर आपला प्लॅटफॉर्म लवकर लोकप्रिय होण्याची शक्यता असते.
  • व्यवसायाचे मोजमाप योग्य प्रमाणात केले गेले तर कमी कालावधीतच अधिक कमाई सोबत व्यवसाय वाढवला जाऊ शकतो.

ड्रॉप शिपिंग व्यवसायात या गोष्टींचे भान ठेवावे before starting dropshipping business in marathi

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वेबसाईटवर उपलब्ध असणारे सगळे प्रोडक्ट्स हे वास्तविक असेल पाहिजे तसेच प्रोडक्ट्सच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष दिले गेले पाहिजे. कोणत्याही ग्राहकासोबत कोणत्याही प्रकारचा चुकीचा व्यवहार होता कामा नये याचे भान ठेवले पाहिजे. ड्रॉप शिपिंग मध्ये विक्रेत्यांची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते. ज्याच्या खात्रीसाठी आपण ग्राहकांशी संपर्क करून त्यांचं मत जाणून घेऊ शकतो.

ड्रॉप शिपिंगचा व्यवसाय dropshipping business in marathi करणारे अनेक जण हे सांगतात की, यामध्ये उत्पादनांची अधिकत्ता, डिलिव्हरी वेळ तसेच वस्तूंच्या रिप्लेसमेंट मध्ये खूप अडचणी येत असतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असते. त्याचबरोबर आपल्यासोबतच्या प्रतिस्पर्ध्यासोबत स्पर्धा करणे हे या व्यवसायात नवीन आलेल्या उद्योजकासाठी एक मोठे आव्हानच असते.

Leave a Comment