जीडीपी म्हणजे काय? what is GDP meaning in marathi आपण सर्वांनी जीडीपी GDP हा शब्द कुठे ना कुठे कधी ना कधी नक्कीच ऐकलेला आहे. आपणाला प्रसारमाध्यमांमध्ये कायम ऐकायला मिळत असतं की पाकिस्तानचा GDP भारताच्या तुलनेत ४ टक्क्यांनी घसरला, बांगलादेशचा GDP भारताच्या GDP पेक्षा अधिक आहे, किंवा कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सतत होणाऱ्या लॉकडाऊन मुळे भारताचा GDP -७ टक्क्यांवर आला. या आणि अशा अनेक बातम्यांतून आपणाला GDP बद्दल ऐकायला मिळत असते.
अशा वेळी ज्यांना या GDP चा अर्थ माहिती नसतो त्यांच्या मनात एक प्रश्न येतो तो म्हणजे की हे जीडीपी GDP म्हणजे काय? what is GDP meaning in marathi किंवा एखाद्या देशाचा GDP कसा ठरवला जातो? how gdp is calculated in india चला पाहूया नक्की GDP म्हणजे आहे तरी काय? आणि GDP कसा ठरवला जातो?
अफिलीएट मार्केटिंग मधून घरबसल्या पैसे कसे कमवावे?
देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या GDP बद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
जीडीपी चा फुल फॉर्म GDP full form in marathi
GDP या शब्दाचा पूर्ण अर्थ full form of GDP हा Gross Domestic Product असा आहे. जीडीपी GDP ला हिंदीमध्ये सकल घरेलू उत्पाद या नावाने तर मराठी मध्ये GDP ला सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) या नावाने ओळखले जाते.
भविष्यात श्रीमंत होण्याचा खरा मार्ग = एसआयपी गुंतवणूक
जीडीपी म्हणजे काय? What is GDP Meaning In Marathi
एखाद्या देशाचा जीडीपी GDP म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन Gross Domestic Product हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती प्रदर्शित करत असतो. देशाचा जीडीपी अंक पाहून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वृध्दी आली किंवा घसरण हे ठरवता येते. कोणकोणत्या क्षेत्रातून sectors देशाला आर्थिक लाभ झाला आहे हे देशाच्या GDP वरून ठरवता येते.
जीडीपी ची व्याख्या Definition of GDP in marathi
जीडीपी म्हणजे देशाच्या अंतर्गत एखाद्या विशिष्ट कालावधीत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य.
कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल देशांतर्गत उत्पादन हे द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. हे आपण एका उदाहरणावरून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू.
समजा, मागील वर्षी देशातील उत्पादित वस्तूंचे मूल्य १ लाख होते आणि सेवांचे मूल्य देखील १ लाख असेल. तर अशा परिस्थितीत त्या वर्षाचे मूल्य २ लाख होते. पुढच्या वर्षी त्याच समान उत्पादन आणि सेवांचे एकूण मूल्य २ लाख २० हजार होत असेल. जर याची गणना केली गेली तर मागील वर्षाच्या तुलनेत देशाला २० हजारांचा नफा झाला आहे. अशा परिस्थितीत त्यास ५% जीडीपी ग्रोथ gdp growth असे म्हटले जाईल.
काय आहे डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटचा अर्थ ?
काही तज्ञांचं असं म्हणणं असतं की, GDP हा परीक्षेच्या गुणपत्रिके सारखा असतो. ज्याप्रमाणे गुणपत्रिकेतून विद्यार्थ्याच्या वर्षभरातील अभ्यासातील प्रगती किंवा अधोगती दिसून येते अगदी त्याच प्रमाणे जीडीपी GDP द्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेचा क्रियाकलाप समजत असतो.
कोणत्या क्षेत्राने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे किंवा कोणत्या क्षेत्राला अधिक चालना देण्याची गरज आहे हे सर्व GDP च्या आकडेवारी वरून समजत असते.
जीडीपी कसा ठरवला जातो? how gdp is measured in india
जीडीपी ची गणना 2 कालावधी मध्ये केली जात असते.
वार्षिक जी डी पी Annual GDP
यामध्ये चालू वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाची मागील वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादन याच्याशी तुलना केली जाते. उदा. २०२० या वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना ही २०२१ सोबत केली जाते.
तिमाही जी डी पी Quarterly GDP
यामध्ये मागील वर्षाचे तीन महिन्यांतील सकल देशांतर्गत उत्पादनाची चालू वर्षातील तीन महिन्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी तुलना केली जाते. उदा. २०२० मधल्या एप्रिल, मे, जून ची तुलना ही २०२१ मधल्या एप्रिल, मे, जून सोबत केली जाते.
सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) मोजण्यासाठी एक सूत्र तयार केले गेले आहे, ज्याचा वापर करून आपण देशाचा आर्थिक विकास खालीलप्रमाणे शोधू शकतो.
GDP = C + I + G+ (X – M)
जीडीपी = उपभोग + गुंतवणूक + सरकारी खर्च (निर्यात – आयात)
उपभोग Consumption
येथे C म्हणजे Consumption ज्याला मराठीमध्ये उपभोग म्हणतात. अर्थात देशातील लोकांचा वैयक्तिक खर्च, भाडे, वैद्यकीय खर्च आणि अशा प्रकारचे घरगुती खर्च यात समाविष्ट आहेत परंतु नवीन घराचा खर्च त्यात समाविष्ट नाही.
गुंतवणुक Investment
येथे I म्हणजे Investment, ज्याला मराठीमध्ये एकूण गुंतवणूक म्हणतात, देशाच्या सीमांतर्गत वस्तू आणि सेवांवर सर्व संस्थांनी केलेला एकूण खर्च म्हणजे एकूण गुंतवणूक होय.
शासकीय खर्च Governmen Expenses
येथे G म्हणजे Government Expenses याला मराठीमध्ये शासकीय खर्च म्हटले जाते, ज्यामध्ये सरकारद्वारे करण्यात alelel सर्व प्रकारचे खर्च जसे की सरकारने केलेली गुंतवणूक, सर्व प्रकारच्या सरकारी कर्मचार्यांचे पगार, शस्त्रे खरेदी इत्यादींचा समावेश आहे.
निर्यात Export
X म्हणजे Export, याला मराठीमध्ये निर्यात म्हटले जाते, ज्यामध्ये देशातील वस्तू आणि सेवांचे उत्पादन हे जीडीपीमध्ये समाविष्ट असलेल्या दुसर्या देशाच्या वापरासाठी तयार केले जाते.
आयात Import
M म्हणजे Import, ज्याला मराठीमध्ये आयात म्हटले जाते, आयात करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवांमध्ये त्या उत्पादनांचा समावेश केला जातो ज्यांचे उत्पादन आपल्या देशाच्या सीमांतर्गत होत नसते. आणि जीडीपीची गणना करताना आयात ही निर्यातीतून वजा केली जात असते.
जीडीपी चे प्रकार Types of GDP India in marathi
जीडीपी GDP ची गणना दोन प्रकारे केली जाते. एक आहे Nominal GDP आणि दुसरा प्रकार म्हणजे Real GDP.
१.नॉमिनल जीडीपी Nominal GDP
जेव्हा एका वर्षात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही बाजार मूल्य किंवा चालू किंमतीशी केल्यावर ज्या जीडीपी चे मूल्य प्राप्त होते त्या जीडीपी ला नॉमिनल जीडीपी Nominal GDP म्हटले जाते.
Real GDP च्या तुलनेत Nominal GDP मध्ये देशाचा GDP नेहमी अधिक असतो कारण यामध्ये महागाईचे मूल्य inflation value समाविष्ट असते.
नॉमिनल जीडीपी चे सूत्र = उत्पादनांची संख्या × स्थिर मूल्य
नॉमिनल जीडीपी चे आकडे कमी विश्वसनीय मानले जातात कारण ते अर्थव्यवस्थेची वास्तविक स्थिती दर्शवित नाहीत.
२.रिअल जीडीपी Real GDP
जेव्हा एका वर्षात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही आधार वर्षाचे मूल्य किंवा स्थिर किंमतीवर केली जाते तेव्हा ज्या जीडीपी चे मूल्य प्राप्त होते त्या जीडीपी ला रिअल जीडीपी Real GDP असे म्हटले जाते.
स्टॉक ट्रेडिंग की स्टॉक गुंतवणुक? काय आहे तुमच्यासाठी योग्य?
सध्या भारताच्या Real GDP चे आधार वर्ष हे सन २०११-१२ हे आहे. Real GDP मध्ये एकूण उत्पादनाचे मूल्य कमी दर्शविले जाते कारण त्यातून चलनवाढ वजा करण्यात येत असते.
रिअल जीडीपी चे सूत्र = उत्पादनांची संख्या × बाजार मूल्य
रिअल जीडीपी चे आकडे विश्वसनीय मानले जातात, कारण ते अर्थव्यवस्थेची खरी स्थिती दर्शवितात.
वरील विश्लेषणावरून हे स्पष्ट होते की नॉमिनल जीडीपी nominal GDP च्या तुलनेत रिअल जीडीपी real GDP डेटा अधिक विश्वासार्ह आहे कारण तो अर्थव्यवस्थेचे योग्य चित्र दर्शवित असतो. हेच कारण आहे की अनेक अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधकांमध्ये वास्तविक जीडीपी म्हणजेच Real GDP पद्धत अधिक पसंत केली जाते.
जीडीपी आणि जीएनपी GDP vs GNP in marathi
जेव्हा जीडीपी GDP चा विषय चालू असतो तेव्हा त्याचबरोबर आपणाला जीएनपी GNP हा शब्द देखील बऱ्याच वेळा ऐकायला मिळत असतो. या जीडीपी आणि जीएनपी gdp and gnp difference in marathi मध्ये अनेक लोक गोंधळून जातात.
जीडीपी GDP हे सकल देशांतर्गत उत्पादन असते तर जीएनपी GNP हे सकल राष्ट्रीय उत्पादन असते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जीडीपीला कोण उत्पादन करीत आहे याचे काही घेणेदेणे नसते कारण जीडीपी केवळ हे पाहत असते की उत्पादन देशाच्या सीमेत होत आहे की नाही. परंतू जीएनपी हे सुनिश्चित करते की हे उत्पादन देशातील नागरिकांकडून केले जावे.
Tags : जीडीपी म्हणजे काय, what is GDP meaning in marathi, gdp vs gnp in marathi, Nominal gdp vs real gdp difference in marathi, how gdp is calculated in marathi, gdp calculation formula
खूप छान माहिती दिली
Super knowledgea data
धन्यवाद
खूप छान मुद्देसूद माहिती.
????????????????☺️
धन्यवाद.. मला आनंद आहे की तुम्हाला माहिती आवडली.. तुमचा दिवस आनंदी जावो..
Nice
Thank You
खुप छान माहीती दिली सविस्तर जिडीपी आणि जिएनपी👌👌👌