जागतिक आरोग्य दिवस २०२१ का साजरा केला जातो ? | World Health Day 2021 In Marathi | Jagatik Arogya Din 2021

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना ( World Health Organization ) वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन ची स्थापना ज्या दिवशी झाली त्या दिवशी म्हणजेच दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. ज्याला इंग्रजी भाषेत वर्ल्ड हेल्थ डे असे म्हटले जाते. चला तर पाहूया की हा जागतिक आरोग्य दिवस २०२१ का साजरा केला जातो? [ Why is World Health Day 2021 In Marathi (Jagatik Arogya Din 2021) celebrated ? ]

जागतिक आरोग्य संघटना ( वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन WHO ) ही संयुक्त राष्ट्रांचा एक अविभाज्य घटक आहे. जगभरातील स्वाथ्य विषयक समस्यांवर नजर ठेवणे आणि त्यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करणे हे या संघटनेचे मुख्य काम आहे.

Best Sellers in Sports, Fitness & Outdoors

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली होती. या संघटनेचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा या शहरात आहे. या संघटनेच्या स्थापनेच्या वेळी याच्या संविधानावर ६१ देशांनी हस्ताक्षर करून संस्थेला पाठिंबा दिला होता. या जागतिक आरोग्य संघटनेची पहिली बैठक २४ जुलै १९४८ मध्ये झाली होती.

जागतिक-आरोग्य-दिवस २०२१ का साजरा केला जातो  World-Health-Day 2021 In Marathi image
जागतिक आरोग्य दिवस २०२१ का साजरा केला जातो ? World Health Day 2021 In Marathi : Jagatik Arogya Sanghatna Logo

वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन च्या स्थापनेनंतर उद्भवलेल्या देवी ( Smallpox ) या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी या जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या ही संघटना एड्स, इबोला, टीबी आणि कोविड-१९ या विषाणूंमुळे होणाऱ्या कोरोना यांसारख्या घातक रोगांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहे.

हे वाचलंत का ? : जाणून घ्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची अजब लक्षणे

डब्ल्यूएचओ ( WHO ) ही संघटना जागतिक आरोग्य अहवालासाठी जबाबदार असते ज्यामध्ये संपूर्ण जगभरातील स्वास्थ्यसंबंधी समस्यांचा आढावा घेतला जातो.

२३ मे २०१७ रोजी डब्ल्यूएचओच्या सदस्य राष्ट्रांनी Dr. Tedros Adhanom Ghebreyesus यांना जागतिक आरोग्य संघटनेचे नवीन महासंचालक म्हणून निवडले. Dr. Tedros Adhanom Ghebreyesus यांना इथियोपिया सरकारने नामांकन दिले आणि १ जुलै २०१७ रोजी त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळास सुरवात केली.

Jagatik Arogya Din 2021 जागतिक आरोग्य दिवस २०२१
जागतिक आरोग्य दिवस २०२१ / Jagatik Arogya Din 2021 :

जागतिक आरोग्य दिवस २०२१ का साजरा केला जातो ? ( Why is World Health Day 2021 In Marathi Celebrated ? :

डब्ल्यूएचओने आपल्या स्थापनादिवशी म्हणजेच ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. स्वास्थ्य संबंधीचे मुद्दे आणि समस्यांसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली दरवर्षी जगभरात आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस 2021 म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे ( World Health Day ) साजरा करण्यासाठी एका खास विषयाची म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे 2021 थिम ( World Health Day 2021 Theme ) ची निवड केली जाते. उदाहरणार्थ, सन १९९५ मध्ये साजरा करण्यात आलेल्या जागतिक आरोग्य दिनाचा विषय होता वैश्विक पोलिओ निर्मूलन. तेव्हापासून ते आतापर्यंत बरेचसे देश ह्या घातक रोगापासून जवळपास मुक्त झाले आहेत तसेच इतर देशांत जागरूकतेची पातळी वाढली आहे.

जागतिक आरोग्य दिवस २०२१, World Health Day 2021 In Marathi, Jagatik Arogya Din 2021
जागतिक आरोग्य दिवस २०२१, World Health Day 2021 In Marathi, Jagatik Arogya Din 2021

या वर्षीच्या म्हणजेच २०२१ च्या जागतिक आरोग्य दिनाचा विषय असणार आहे, “Building a fairer, healthier world.” म्हणजेच एक सुसंस्कृत आणि निरोगी जग बनविण्याच्या दृष्टीने या वर्षीच्या आरोग्य दिनाचा विषय निवडण्यात आला आहे.

“World Health Day 2021 : Building a fairer, healthier world”

जागतिक आरोग्य दिवस कसा साजरा केला जातो ? ( Jagatik Arogya Din 2021 ) :

वर्ल्ड हेल्थ डे च्या पार्श्वभूमीवर अनेक स्वास्थ्य आणि आरोग्य संघटनांकडून तसेच सरकारी आणि गैरसरकारी संस्था आणि तसेच अनेक स्वयंसेवी संस्था आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात.

जागतिक आरोग्य दिवस २०२१, World Health Day 2021 In Marathi, Jagatik Arogya Din 2021
जागतिक आरोग्य दिवस २०२१, World Health Day 2021 In Marathi, Jagatik Arogya Din 2021

जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी विशेष आरोग्य शिबिर आयोजित केली जातात. याबरोबरच स्वास्थ्य विषयक जागरूकता वाढवण्यासाठी अनेक प्रदर्शने तसेच नाटकांचे प्रयोग करण्यात येत असतात. शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध लेखन स्पर्धा तसेच वादविवाद स्पर्धा भरवल्या जातात.

स्वतःला आजारांपासून दूर कसे ठेवावे ? How to keep yourself away from diseases in Marathi :

आजच्या धावपळीच्या जगात माणसाचे आयुष्य देखील धकाधकीचे झाले आहे. जगण्यामध्ये गुणवत्ता प्राप्त करत जाण्याचा अर्थ असा नाही की आपल्या आरोग्यासोबत तडजोड केली जावी.

जागतिक-आरोग्य-दिवस-२०२१-World-Health-Day-2021-In-Marathi-Jagatik-Arogya-Din-2021
विश्व स्वास्थ्य दिवस / Vishwa Swasthya Divas Image :

उदाहरणार्थ, आपण आपल्या आयुष्यात व्यस्त असतो. आपल्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चालू असतं. परंतु अचानक आयुष्याच्या गाडीला एक ब्रेक लागतो आणि मानवी जीवन हे औषध-गोळ्यांवर विसंबून राहते. त्यामुळे आयुष्यातील इतर ध्येपूर्तीसोबतच आपण विविध रोगांपासून दूर राहून कसे स्वस्थ आणि निरोगी राहू शकतो हे देखील आपले ध्येय असले पाहिजे.

आजच्या युगात घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांवर जास्त जोर दिला जाऊ लागला आहे. या गोष्टी आपणाला हवामाना अनुसार आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करत असतात. त्याच बरोबर निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर नियमित स्वरूपात योगा, व्यायाम करावा यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. याच बरोबर आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा तसेच विविध फळांचा समावेश करावा. जेणेकरून आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी हातभार लागेल.


Tags : जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा, जागतिक आरोग्य दिवस फोटो, vishwa swasthya divas image, world health day images.

Leave a Comment