श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shree Swami Samarth Tarak Mantra – Lyrics, Aarti, Photo, Ringtone, PDF

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shree Swami Samarth Tarak Mantra – Lyrics, Aarti, Photo, Ringtone, PDF – श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामीकृपाच! दुसरं काहीही नको ही एकच भावना अंत:करणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दु:खदायकही असतं.

यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचीती येत असते आणि मग सुख-दु:खासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत. कारण स्वामी माउली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती! दाय म्हणजे देणारा-सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो! फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माउलीवर!

या Page वरती आपणाला श्री स्वामी समर्थ मंत्र आणि त्यांची शिकवण देणाऱ्या काही चारोळ्या मिळतील. तसेच आपल्या WhatsApp Status, Facebook Status आणि Sharechat तसेच Instagram Caption वर post करण्यासाठी आपणाला Shree Swami Samarth Tarak Mantra in Marathi, तसेच Shree Swami Samarth Mantra in Marathi हे देखील मिळेल.

shree swami samarth images
श्री स्वामी समर्थ मंत्र – swami samarth tarak mantra

स्वामी समर्थ तारक मंत्र Shree Swami Samarth Tarak Mantra

निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भिती तयाला ।।२।।
उगाची भितोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।
Shree Swami Samarth Quotes in Marathi
स्वामी समर्थ तारक मंत्र Shree Swami Samarth Tarak Mantra
खरा होई जागा तू श्रद्धेसहित
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ
स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

जर आपली देखील स्वामींवर श्रद्धा असेल आणि आपणाला Shree Swami Samarth Tarak Mantra in Marathi आणि श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आवडला असेल तर खाली नक्की कमेंट करून कळवा.

श्री स्वामी समर्थ मंत्र

Shree Swami Samarth image photos
श्री स्वामी समर्थ विचार – Shree Swani Samarth Thoughts

श्री स्वामी समर्थ विचार – Shree Swani Samarth Thoughts in Marathi

सुख, समाधान, शांती आणि आनंद हे ऐश्वर्य.

नीती, न्याय आणिकृपा हा धर्म.

सर्वत्र, सर्वकाळ कार्याची सिद्धी हे यश.

निरांतराची ऐहिक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव.

निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान.

हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निरलस राहणे हे वैराग्य.

अशक्य ही शक्य करतील स्वामी

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

100+ श्री स्वामी समर्थ स्टेटस

श्री स्वामी समर्थ आरती – Shree Swani Samarth Aarti

श्री स्वामी समर्थ आरती – Shree Swani Samarth Aarti

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा
!! जयदेव जयदेव..!!
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,
जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी
!! जयदेव जयदेव !!
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,
याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार
!! जयदेव जयदेव !!
देवाधिदेव तू स्वामीराया,
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,
शरणागता तारी तू स्वामीराया
!! जयदेव जयदेव !!
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे
!! जयदेव जयदेव !!
Shree Swami Samarth Quotes in Marathi
स्वामी समर्थ तारक मंत्र – Swami Samarth Ringtone Download Free

स्वामी समर्थ मंत्र – Swami Samarth Ringtone Download Free

Shree Swami Samarth Quotes in Marathi
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shree Swami Samarth Tarak Mantra

Tags : स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ आरती, श्री स्वामी समर्थ विचार, स्वामी समर्थ मंत्र, Swami Samarth Ringtone Download Free, Shree Swani Samarth Aarti, Shree Swani Samarth Thoughts in Marathi, Shree Swami Samarth Tarak Mantra, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shree Swami Samarth Tarak Mantra – Lyrics, Aarti, Photo, Ringtone, PDF

2 thoughts on “श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shree Swami Samarth Tarak Mantra – Lyrics, Aarti, Photo, Ringtone, PDF”

Leave a Comment