सर्वनाम म्हणजे काय – Types of Sarvanam in Marathi – सर्वनामाचे प्रकार – सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतो.या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.
वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते.’तो’ हा शब्द रामा, वाडा, कळप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दाचा उपयोग सर्व (प्रकारच्या) नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम pronoun असे म्हणतात.
Page Contents
सर्वनामाची व्याख्या मराठी sarvanamachi vyakhya in marathi
नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात. इंग्रजीत याला pronoun असे म्हटले जाते.
सर्वनामांचे प्रकार sarvanamache prakar marathi
सर्वनामांचे एकंदर सहा प्रकार पडतात. types of pronoun in marathi
- पुरुषवाचक सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
- सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
पुरुषवाचक सर्वनाम purushvachak sarvanam in marathi
बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात.
- बोलणाऱ्यांचा
- ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा
- ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा.
व्याकरणात यांना पुरुष (यांत स्त्रियाही येतात.) असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.
- बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे .उदा ० मी, आम्ही, आपण, स्वतः
- ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे उदा० तू, तुम्ही, आपण, स्वतः
- ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीयपुरुषवाचक सर्वनामे उदा० तो, ती, ते, त्या
दर्शक सर्वनाम darshak sarvanam in marathi
जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम वापरले जातात त्यास ‘दर्शक सर्वनाम’ असे म्हणतात.उदा. हा, ही, हे, तो, ती, ते. उदा० ते घर दूर आहे.
संबंधी सर्वनाम sambandhi sarvanam in marathi
वाक्यात नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी (तो-ती-तें-ते-त्या) – जें, जे, ज्या. हिंदी-इंग्रजीत आधी ‘तो-ती-तें-ते-त्या’ येते आणि मग ‘जो – जी – जें, जे, ज्या’. मराठीत तसे होत नाही.
प्रश्नार्थक सर्वनाम prashnarthak sarvanam in marathi
ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना ‘प्रश्नार्थक सर्वनामे’ म्हणतात. उदा० कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी.
सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम samanya sarvanam/anishchit sarvanam
कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदा.
- कोणी कोणास हसू नये.
- त्या पेटीत काय आहे ते सांगा.
या सर्वनामांना ‘सामान्य सर्वनामे’ असे देखील म्हटले जाते.
आत्मवाचक सर्वनामे atma vachak sarvanam in Marathi
आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः’ असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच ‘स्वतःवाचक सर्वनाम’ असेही म्हणतात. उदा.
- मी स्वतः त्याला पाहिले.
- तू स्वतः मोटार हाकशील का?
- तो आपणहोऊन माझ्याकडे आला.
- तुम्ही स्वतःला काय समजता?
आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात. तेव्हा या दोहोंमध्ये फरक इतकाच की, पुरुषवाचक ‘आपण ‘ हे ‘तुम्ही’ या अर्थाने येते, तेव्हा ते पुरुषवाचक असते व ‘स्वतः’ या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते.
सर्वनामांचा लिंगविचार ling vichar sarvanam in marathi
मराठीत मूळ सर्वनामे नऊ आहेत.ती पुढीलप्रमाणेः मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः यांतील लिंगानुसार बदलणारी तीनच : १) तो, २) हा, ३) जो. जसे, तो-ती–ते, हा– ही–हे , जो–जी–जे. याशिवाय इतर सर्व सर्वनामांची तीनही लिंगातील रूपे सारखीच राहतात; ती बदलत नाहीत,
सर्वनामांचा वचनविचार vachan vichar sarvanam in marathi
मराठीतील मूळ नऊ सर्वनामांपैकी ‘मी ,तू, तो, हा ,जो’ ही पाच सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलतात.जसे मी – आम्ही,तू – तुम्ही; तो ,ती,ते – ते ,त्या ,ती ; हा,ही ,हे – हे ,ह्या, ही; जो,जी ,जे – जे ,ज्या, जी
- बाकीच्या सर्वनामांची (कोण,काय,आपण, स्वतः) रूपे दोन्ही वचनांत सारखीच राहतात.
- सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता आले असेल त्यावर अवलंबून असते.
Article From : WikiPedia.org
Tags : vachan vichar sarvanam in marathi, ling vichar sarvanam in marathi, atma vachak sarvanam in Marathi, samanya sarvanam/anishchit sarvanam, prashnarthak sarvanam in marathi , sambandhi sarvanam in marathi, darshak sarvanam in marathi, purushvachak sarvanam in marathi, sarvanamache prakar marathi, types of pronoun in marathi, sarvanamachi vyakhya in marathi, types of sarvanam in marathi, pronoun meaning in marathi, types of pronouns in marathi, सर्वनामांचा वचनविचार, सर्वनामांचा लिंगविचार, आत्मवाचक सर्वनामे, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, सर्वनामांचे प्रकार, सर्वनामाची व्याख्या मराठी, सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामाचे प्रकार मराठी