डिजिटल वन इंडिया DigitalOneIndia Fake or Real in Marathi

डिजिटल वन इंडिया DigitalOneIndia ही एक अशी ऑनलाईन डेटा एंट्री जॉब online data entry jobs वेबसाइट आहे जी कोणत्याही पात्रतेशिवाय १००% अस्सल जॉब प्रदान करण्याचा दावा करते.

ही वेबसाईट भारत सरकारशी संबंधित आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे भारत सरकारच्या डिजिटल इंडिया Digital India या वेबसाईटचा इंटरफेस आहे अगदी त्याचप्रमाणे रंग आणि संज्ञा या वेबसाईट मध्ये वापरण्यात आल्या आहेत. परंतु डिजिटल वन इंडिया या वेबसाईटचा भारत सरकारशी कसलाही संबंध नाही.

गूगल संबंधीची ही तथ्ये आपणाला माहिती नसतील

डिजिटल वन इंडिया DigitalOneIndia Fake or Real in Marathi
Digital OneIndia Portal Review in Marathi

डिजिटल वन इंडिया DigitalOneIndia Fake or Real

एकंदरीत या डिजिटल वन इंडिया Digital OneIndia वेबसाइटची रचना ही अत्यंत मूलभूत स्वरूपाची असून त्यातील सर्व गोष्टी भारत सरकारच्या डिजिटल इंडिया DigitalIndia हुबेहूब नक्कल केल्यासारख्या बनविल्या आहेत. परंतु या वेबसाईट लक्षपूर्वक पाहिल्यास त्यातील लिखित स्वरूपाच्या सामग्रीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे आपणाला आढळून येते.

DigitalOneIndia Portal is real or fake
डिजिटल वन इंडिया Digital OneIndia Fake or Real in Marathi

या वेबसाईटच्या डोमेन नेम ची जर माहिती पाहिली तर त्यातून असे लक्षात येते की या डोमेन नेम ची नोंदणी १४ मार्च २०१९ रोजी करण्यात आली आहे. डोमेन ज्याच्या नावाने नोंदणीकृत आहे त्याचे नाव अज्ञात आहे. वेबसाईटच्या गोपनीयतेसाठी ते कदाचित लपवले गेले असावे. २०१९ मध्ये डोमेनची नोंदणी झाली असली तरी कंपनीने दावा केला आहे की कंपनी चार वर्षाहून अधिक काळापासून कार्यरत आहे. यावरून कंपनी स्पष्टपणे खोटं बोलत आहे असे दिसून येते.

या १० टिप्स फॉलो करा आणि शेअर मार्केटमधून भरपूर पैसे कमवा

वेबसाईट व्यवस्थापनाशी संपर्क करण्यासाठी साईटवर कोणताही पर्याय उपलब्ध असलेला दिसून येत नाही. या वेबसाईटने कोणत्याही प्रकारची संपर्क माहिती प्रदान केलेली नाही. याशिवाय कोणत्याही प्रकारचे पेमेंट देण्याचा उल्लेख देखील वेबसाईटच्या पॉलिसी पेज मध्ये केला गेलेला नाही. परंतु, अनेक लोकांनी राजेंद्र नावाच्या व्यक्तीला वेबसाईटमध्ये उपलब्ध असणारे पॅकेजेस खरेदी करण्यासाठी पैसे दिले असून त्यानंतर घोटाळा scam झाल्याची तक्रार केली आहे.

हे सरळसरळ उघड आहे की डिजिटल वन इंडिया digital oneindia हा एक स्कॅम आहे. डिजिटल वन इंडिया यामध्ये एखादा प्लॅन खरेदीसाठी रक्ककं मागितली जाते आणि रक्कम मिळाल्यानंतर त्या ग्राहकाशी असलेला संपर्क बंद केला जातो.

digital OneIndia Portal Review
डिजिटल वन इंडिया DigitalOneIndia Fake or Real in Marathi

वेबसाइट स्वत: ला सरकारी-संबंधी पोर्टल म्हणून चित्रित करण्याचा खोटा प्रयत्न करत आहे. वेबसाईटवर कोणतेही संपर्क तपशील प्रदान केलेले नाहीत. त्याचप्रमाणे साईटवर विविध पॅकेजसाठी रक्कम आकारली जाते हे कोठेही नमूद केले गेलेले नाही. वेबसाईट पूर्णपणे खोटे बोलत आहे की ते ४ वर्षापासून कार्यरत आहे म्हणून कारण त्यांच्या वेबसाईटची नोंदणी ही २०१९ मध्येच झाली आहे. या सर्व गोष्टींना सामान्य माणूस बळी पडत आहे.

अफिलीएट मार्केटिंग मधून हजारों रूपये कसे कमवावे

डिजिटल वन इंडिया DigitalOneIndia साईटवर एम्प्लॉइ आयडी प्रदान केली जाते परंतु ती देखील बनावट असल्याचे लगेच दिसून येते. या वेबसाइटबद्दलचे रिव्ह्यूज हे स्पष्ट करतात की डिजिटल वन इंडिया Digital OneIndia reviews हा एक घोटाळा असून त्याशिवाय काहीच नाही.

लक्षात ठेवा, कोणतीही नोकरी करताना जर काम सुरू करण्यापूर्वी आपल्याकडून एक रक्कम घेतली जात असेल तर तो एक घोटाळा असू शकतो. खऱ्या आणि विश्वासार्ह कंपन्या कधीच कोणत्याही कारणास्तव पैसे मागत नाहीत.


Tags : डिजिटल वन इंडिया, DigitalOneIndia,Digital OneIndia,DigitalIndia,online data entry jobs from home part time, Digital One india portal, data entry jobs work from home, onlinedataentryjob, one india jobs

Leave a Comment