नवीन कोरोनाची लक्षणे | New Corona Strain Symptoms In Marathi 2021

कोरोनाची नवीन लाट आल्यानंतर आता कोरोना पीडित रुग्णांमध्ये या नवीन कोरोनाची लक्षणे ( New Corona Strain Symptoms In Marathi ) लक्षणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. फुफ्फुसे, घसा आणि डोके यानंतर याचा परिणाम रुग्णांच्या पोटावर देखील दिसू लागला आहे.Coronavirus update in marathi.

दिल्लीतल्या २ मोठ्या सरकारी रुग्णालयांत भरती असलेल्या ७०% कारोना रुग्णांमध्ये पोटात दुखणे, उलटी आणि तसेच डायरीयाची लक्षणे दिसून आली आहेत.

रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोरोना संक्रमणाच्या बदलत्या स्वरूपासोबतच याची लक्षणे देखील बदलू लागली आहेत किंवा त्यांच्यात वाढ होऊ लागली आहे.

सामान्य कोरोनाची लक्षणे Symptoms Of Corona In Marathi :

 • • ताप येणे,
 • • खोकला,
 • • श्वास घेण्यास त्रास होणे
 • • धाप लागणे.

दिल्ली मध्ये कोरोना रुग्णांची संख्या जवळजवळ साडे सहा लाखापर्यंत जाऊन पोहोचली आहे. यामधील बऱ्याच रुग्णांना ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, कोरडा खोकला अशी लक्षणे असल्याचे दिसून आले आहे. आणि यापैकी जवळजवळ ३०% रुग्णांमध्ये नाकाने वास घेता न येणे तसेच खाण्याच्या गोष्टींची चव न कळणे अशी देखील लक्षणे आढळून आली आहेत.

नवीन कोरोनाची लक्षणे | New Corona Strain Symptoms In Marathi
नवीन कोरोनाची लक्षणे
New Corona Strain Symptoms In Marathi :

याच दरम्यान राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या एका डॉक्टरांनी असे सांगितले आहे की मागच्या एका आठवड्यापासून हॉस्पिटल मध्ये जेवढे रुग्ण भरती झाले आहेत त्यांपैकी बहुतांश रुग्णांमध्ये उलटी, पोटदुखी आणि डायरियाची लक्षणे आढळून आली आहेत.

मागच्या एक वर्षातून म्हणजेच कोरोनाने भारतात आगमन केल्यापासून असे पहिल्यांदाच होत आहे की कोरोना रुग्णांना हा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त रुग्णांची हालत ही गंभीर स्वरूपाची असून ते इतर जुन्या आजारांनी पीडित आहेत.Coronavirus update in marathi.

डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की हे सर्व रुग्ण कोरोनाच्या नवीन स्ट्रेन म्हणजेच दक्षिण आफ्रिका तसेच यूके मधून आलेल्या कोरोना स्ट्रेन ने पीडित असावेत. ज्यामुळे या रुग्णांमध्ये ही नवीन लक्षणे दिसून आली असावीत. याच गोष्टीचा तपास करण्यासाठी या रुग्णांचे नमुने जिनोम तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नंतरच जे काही आहे ते सर्व स्पष्ट होऊ शकेल.

तसेच रुग्णालयांत भरती झालेल्या या रुग्णांनी कधीही मधुमेहाची तक्रार केली नव्हती परंतु आता रुग्णालयात भरती झाल्यानंतर त्यांची तपासणी केल्यावर या कोरोना संक्रमितांच्या शरीरात मधुमेहाचा स्तर ४०० पेक्षा जास्त असलेला आढळून आला आहे.

नवीन कोरोनाची लक्षणे New Corona Strain Symptoms In Marathi :

 • • थंडी व ताप ( Fever and chills )
 • • सतत खोकला येणे ( A new continuous cough )
 • • सततची डोकेदुखी ( Persistent headache )
 • • सर्दी किंवा नाक वाहणे ( Congestion or runny nose )
 • • धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ( Shortness of breath or difficulty breathing
 • • थकवा जाणवणे ( Fatigue )
 • • अतिसार ( Diarrhoea )
 • • उलट्या किंवा मळमळ होणे ( Nausea or vomiting )
 • • स्नायू आणि सांधे दुखी ( Muscle and joint pain )
 • • घसा खवखवणे ( Sore throat )
 • • वास किंवा चव ओळखण्याची भावना कमी होणे ( Loss of sense of smell or taste )
नवीन कोरोनाची लक्षणे | New Corona Strain Symptoms In Marathi image
नवीन कोरोनाची लक्षणे
New Corona Strain Symptoms In Marathi :

त्यामुळे जर आपणाला थकवा, चक्कर येणे, स्नायू दुखणे, अशक्तपणा, सुस्तपणा, अंग दुखी, अतिसार असे संकेत आणि लक्षणे जाणवण्यास सुरुवात झाली असेल तर हे कदाचित आपणाला कोव्हिड-१९ चाचणीची आवश्यकता असल्याचे संकेत असू शकतात.Coronavirus update in marathi.

अशाप्रकारे कोरोणाच्या नवीन कोरोनाची लक्षणे ( New Corona Strain Symptoms In Marathi ) ही जुन्या कोरोनाची लक्षणे होती त्यांच्यापेक्षा एकदम वेगळी असलेली आढळून आलेली आहेत.


आणखी वाचा :

Leave a Comment