कोरोना प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी? Corona care at home in marathi कोरोना महामारीचा कहर दिवसेंदिवस अधिक गतीने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढत असते की त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांतील साधने आणि सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
अशा परिसथितीमध्ये आपण आपली आणि आपल्या जवळच्या लोकांची काळजी घेणे आणि सतर्क राहणे जास्त अधिक गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही मुलभूत गोष्टी तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत जसे की..
- वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात धुणे.
- सॅनीटायझरचा वेळोवेळी वापर करणे.
- गर्दीत जाणे टाळणे तसेच सोशल डिस्टंसिंग पाळणे.
- मास्क चा वापर करणे.
आरोग्य विम्याचा दावा कसा करतात?
ह्या काही मूलभूत गोष्टी आपण सुरुवातीपासूनच ऐकत आलो आणि यांचे पालन देखील करत आलो आहोत. परंतु अशा आणखी काही सध्यासोप्या गोष्टी आहेत ज्या पाळून आपण कोरोना विषाणू पासून होणारा संसर्ग म्हणजेच कोविड 19 च्या धोक्याला टाळू शकतो.
कोरोना प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी? Corona care at home in marathi
पुढे दिलेले काही सोपे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय हे कोविड 19 उपचार म्हणून देखील वापरण्यात येतात. चला पाहूया कोरोना प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी ?
- कोरोना प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी? Corona care at home in marathi
- व्हिटॅमिन सी चा आहारात समावेश include vitamin c in diet
- व्हिटॅमिन ई चा आहारात समावेश include vitamin e in diet
- सुर्य स्नान घेणे benefits of taking a sunbath
- जेवणात अंड्यांचा समावेश करणे include eggs in diet
- उबदार आहार घेणे take a warm food
- किमान ७-८ तास झोप घेणे get 7-8 hours of sleep
- रोज १.५ लिटर कोमट पाणी पिणे drink 1.5 liters of lukewarm water daily
- सॅनीटायझर व मास्कचा वापर करणे using sanitizer and mask
- सोशल डिस्टंसिंग पाळणे keep social distancing
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची काही आगळीवेगळी लक्षणे
व्हिटॅमिन सी चा आहारात समावेश include vitamin c in diet
शरीराच्या रोग प्रतिकारशक्ती मध्ये वाढ करण्यासाठी हे व्हिटॅमिन सी उपयुक्त असते. जे की सर्दी खोकला आणि इतर संसर्गापासून आपल्या शरीराला होणारा धोका कमी करण्याचे काम करते. पुरुषांच्या शरीराला साधारणतः दिवसाला ९० मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते तर महिलांसाठी हे प्रमाण ७५ ग्रॅम असते आणि गर्भावस्थेत हे प्रमाण १२० ग्रॅम पर्यंत वाढत असते.
जवळच्या कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये या व्हिटॅमिन सी च्या टॅबलेट्स सहज उपलब्ध असतात. नैसर्गिकरीत्या शरीरातील व्हिटॅमिन सी चे प्रमाण वाढविण्यासाठी आपल्या आहारात आंबट फळे जसेकी लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा इत्यादी फळांचा समावेश करावा.
व्हिटॅमिन ई चा आहारात समावेश include vitamin e in diet
जे लोक सर्वसाधारण पोषक आहार घेत असतात त्यांना साधारणतः या व्हिटॅमिन ई ची गरज नाही भासत. व्हिटॅमिन ई आपल्या शरीराच्या पेशी नुकसानीपासून वाचविण्यात महत्त्वपूर्ण आहे. हे अँटीऑक्सिडंट म्हणून ओळखले जाते.
व्हिटॅमिन ई चा डोस आपल्या वैद्यकीय स्थितीवर आणि उपचारांना मिळालेल्या प्रतिसादावर अवलंबून असतो. गरजेपेक्षा आपल्या डोस मध्ये वाढ करू नये किंवा गरजेपेक्षा जास्त वेळा देखील घेऊ नये. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई घेतल्यास आपल्या दुष्परिणामांची जोखीम वाढू शकते.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी
दुष्परिणाम टाळण्यासाठी हे व्हिटॅमिन ई आपल्या आहारातून घेतलेले अधिक उत्तम राहील. त्यासाठी आपणाला आहारात सुका मेवा, विविध प्रकारच्या बिया तसेच हिरव्या पालेभाज्या इत्यादींमध्ये व्हिटॅमिन ई असते.
सुर्य स्नान घेणे benefits of taking a sunbath
जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा त्याच्या कोवळ्या उन्हात रोज १०-१५ मिनिटे बसणे आरोग्यासाठी एक उत्तम औषध आहे. यालाच सूर्य स्नान असे देखील म्हणतात. सुर्य स्नानाने शरीराची हाडे सशक्त होतात.
सूर्यप्रकशामध्ये व्हिटॅमिन डी चे प्रमाण अधिक असते. हे व्हिटॅमिन डी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कार्य करते. तसेच शरीरातील नसा आणि स्नायूंचे समन्वय नियंत्रित करते. हे हाडे, स्नायू आणि अस्थिबंधन मजबूत करण्याचे काम करते.
जेवणात अंड्यांचा समावेश करणे include eggs in diet
अंडी कायमच पोषण आहारात समाविष्ट केली गेलेली असतात. शरीराचे वजन आटोक्यात आणण्यापासून ते आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंतचे काम अंडी करत असतात. त्यामुळे अंड्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
सर्दी किंवा फ्लू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी अंड्यांकडे एक विश्वासार्ह उपाय म्हणून पाहिले जाते. अंडी शरीरात नवीन ऊर्जा प्रदान करण्यात देखील मदत करतात. त्यात भरपूर बी-जीवनसत्त्वे असतात, जे शरीरातील अन्नाचे इंधनात रूपांतरण करण्यात मदत करतात आणि आपल्याला शरीराच्या पोषणासाठी दिवसभर ऊर्जा देत असतात.
उबदार आहार घेणे take a warm food
अन्न हे नेहमी गरम करून खावे. गरम आणि उबदार अन्न खाल्ल्याने कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करण्याचा धोका कमी होतो. शक्य असल्यास तिनही वेळचा आहार हा गरम करूनच घ्यावा.
किमान ७-८ तास झोप घेणे get 7-8 hours of sleep
आपण हे अनेक वेळा अनुभवत असतो की जेव्हापण आपण आजारी असतो तेव्हा आपल्या शरीराला नेहमीपेक्षा अधिक झोपेची गरज भासत असते. याचे मुख्य कारण असे की झोप ही रोगप्रतिकार प्रणालीवर तसेच कोणत्याही संक्रमणाला तोंड देण्याच्या शरीराच्या क्षमतेवर थेट परिणाम करत असते. ज्यामुळे कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका कमी होतो.
रोज १.५ लिटर कोमट पाणी पिणे drink 1.5 liters of lukewarm water daily
गरम पाणी पिण्याने शरीरातील पचन प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरातील मज्जातंतू यंत्रणा म्हणजेच आपल्या मेंदूचे कार्य स्थिर होण्यास मदत होते. दररोज कोमट पाणी पिण्याने शरीरातील वेदना कमी होण्यास तसेच मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
सॅनीटायझर व मास्कचा वापर करणे using sanitizer and mask
कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातून बाहेर जाणे शक्यतो टाळावे परंतू कामासाठी बाहेर जावे लागल्यावर नाकातोंडावर मास्क लावूनच बाहेर जावे. गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्यावरचा मास्क अजिबात काढू नये. मास्क ला सारखा सारखा हात लावू नये.
सोबत एक सॅनीटायझरची छोटी बॉटल ठेवावी. जेणेकरून कोणत्या वस्तूला किंवा आपल्या मास्क ला हात लावण्याची गरज पडल्यास सॅनीटायझरने हात स्वच्छ करावेत. तसेच बाहेरून घरात आल्यानंतर सॅनीटायझरने हात स्वच्छ करूनच मग बाथरुम मध्ये जाऊन साबणाने स्वच्छ हातपाय धुवावेत.
सोशल डिस्टंसिंग पाळणे keep social distancing
लोकांमधील शारिरीक अंतर राखून संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्याचा एक मार्ग म्हणजे सोशल डिस्टंसिंग होय. जर आपणाला कोरोनापासून स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा बचाव करायचा असेल तर आपण विनाकारण गर्दीत जाणे टाळायला हवे जेणेकरून कोरोना विषाणूच्या संपर्कात आपण येण्यापासून वाचले जाऊ. तसेच आपण एकमेकांमध्ये कमीतकमी २-३ मीटर एवढे अंतर राखले पाहिजे.
कोरोनापासून वाचण्यासाठी तसेच आपल्या शरीरातील रोप्रतिकारक शक्ती अधिक सक्षम करण्यासाठी आपण हे वरील उपाय करू शकतो.
कोरोना हे आपल्या देशावरच नाही तर पूर्ण मानवजातीवर आलेले मोठे संकट आहे या संकटाला आपण स्वतःची आणि घरच्यांची काळजी घेऊन तसेच मास्क आणि सॅनीटायझर वापरून तसेच सोशल डिस्टंसिंग पाळून तोंड देणे गरजेचे आहे.
माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित नका ठेवू. फेसबुक आणि व्हॉट्सॲप च्या माध्यमातून आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या परिवारासोबत अवश्य शेअर करा.
Tags : corona care at home in marathi, कोरोना वायरस,कोरोना प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी, vitamin c,vitamin e,sunbath, sanitizer and mask,social distancing,enough sleep, eggs in diet,warm food,drinking warm water