वजन कमी करण्याचे ६ उत्तम मार्ग 6 Best ways to lose weight gradually in marathi

आपण आपले वजन कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहात परंतु तरीही आपणाला या प्रयत्नांचा फारसा फायदा होताना दिसत नाहीये. आपले वजन आहे तेवढेच आहे किंवा एकदम थोड्या प्रमाणात कमी होत आहे.

वजन कमी करण्याचे ६ उत्तम मार्ग 6 Best ways to lose weight gradually in marathi

आपणाला वजन कमी करण्यास किती वेळ लागेल? how long does it take to lose weight किंवा लवकर बारीक कसे व्हावे? how to get skinny fast हे प्रश्न आपणाला पडत असतील तर आज आपण पाहूया अशा काही चुका ज्यामुळे सर्व प्रकारचे प्रयत्न चालू असताना देखील आपले वजन कमी होण्यास वेळ का लागत आहे? किंवा असे काही वजन कमी करण्याचे ६ उत्तम मार्ग ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास नक्की मदत होईल.

आरोग्य विम्याचा दावा कसा करावा ?

आपणाला घाबरून जाण्याची किंवा टेन्शन घेण्याची आवश्यकता आवश्यकता नाहीये. ही परिस्थिती अनुभवणारे आपण एकटेच नाही आहात जगात असे अनेक लोक आहेत ज्यांचं वजन खूप काही गोष्टी करून देखील कमी होत नाही.

काहीही केलं तरी आपलं वजन का कमी होत नाही? why weight loss not happening या निर्णयावर येण्याआधी आपण स्वतःला एक प्रश्न विचारून पहायला हवा. तो म्हणजे की आपण आपल्या दिवसाची सकाळची सुरूवात व्यवस्थित करत आहोत की नाही? पाहूया वजन कमी करण्याचे ६ उत्तम मार्ग 6 Best ways to lose weight gradually In marathi.

घरीच कोरोना प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी ?

Best ways to lose weight gradually in marathi image
वजन कमी करण्याचे मार्ग Best ways to lose weight gradually in marathi

वजन कमी करण्याचे उपाय morning habits for weight loss

आपण दिवसाची सुरुवात सकाळी उत्तम प्रकारे करत नसू तर आपण दिवसभर कितीही प्रयत्न केले मग ते व्यायामातील असो किंवा डाएट मधील तर ते व्यर्थ राहून जातात. पाहूया सकाळच्या काही अशा सवयी morning habits for weight loss की ज्यांमुळे आपले वजन कमी होण्यास नक्की मदत होईल.

सकाळी उठल्यावर पाणी पिणे drinking water in morning

वजन कमी करण्याचा किंवा वजन कमी करण्याच्या गतीला अधिक चालना देण्याचा सर्वात सोपा मार्ग असेल तर तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी पिणे.

drinking glass of a water in morning image
drinking water in morning : Best ways to lose weight gradually in marathi

पाणी आपल्या चयापचय क्रियेला metabolism चालना देत असते. तसेच पाण्यामुळे आपली पचन व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होत असते. तसेच पाणी जास्त पिल्याने शरीराला लागणाऱ्या भुकेचे प्रमाण देखील आवाक्यात राहते जेणेकरून दिवसभर घ्येण्यात येणाऱ्या कॅलरीज चे प्रमाण कमी होत असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर किमान एक ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

रोज सकाळी लवकर उठून एक ग्लास पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून पिण्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते ज्यामुळे हळू हळू आपले वजन gradually weight loss कमी होत जाते.

व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढणे consumption of vitamin D

हे ऐकुन आपणाला आश्चर्य होऊ शकतं की डी जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन डी Vitamin D च्या कमतरतेमुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असतो. हो हे खरं आहे. अनेक शास्त्रीय अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की सकाळचे जे सूर्याचे अतिनील ultraviolet rays किरणे असतात ते शरीरासाठी खूप आरोग्यदायी असतात.

consumption of vitamin d sun bath image
consumption of vitamin d : Best ways to lose weight gradually in marathi

शरीरात एक ऊर्जा देण्याचे काम ते करत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराची जी चयापचय क्रिया metabolism process असते तिला चालना मिळते. तसेच आपल्या शरीरामध्ये असणारी चरबी जाळण्याची क्षमता fat burning process वाढत असते.

नियमित व्यायाम करणे doing regular workout

अनेक शास्त्रीय अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की सकाळचा व्यायाम morning workout हा शरीरातील खूप सारी चरबी कमी करण्यासाठी fat burn मदत करत असतो जेणेकरून आपले वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होत असते.

सायंकाळच्या वेळी किंवा भरल्या पोटाने व्यायाम करण्यापेक्षा आपण सकाळी मोकळ्या पोटाने व्यायाम केला तर आपली चरबी कमी होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असते. त्यामूळे सकाळी उठल्यावर आपण व्यायाम करावा, आपल्या आवडीचा एखादा मैदानी खेळ खेळावा किंवा कमीतकमी ३०-४० मिनिटे चालावे.

सकाळचा नाष्टा करणे don’t skip breakfast

वजन कमी होत नसल्याच्या अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक लोक आपला सकाळचा नाष्टा घेत नाहीत. ते आपल्या नाष्ट्याला आपल्या आहारातून वगळतात. परंतु हे करणे अत्यंत चुकीचे आहे कारण नाष्टा हा आपल्या दिवसभराच्या आहारातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो.

don't skip breakfast healthy food breakfast images
don’t skip breakfast : Best ways to lose weight gradually in marathi

जेव्हा आपण रात्री झोपतो आणि जेव्हा सकाळी उठतो यामध्ये किमान ९-१० तासांचा कालावधी जात असतो ज्यामध्ये आपण काहीच खाल्लेलं नसतं. त्यामुळे आपल्या शरीरातील शर्करेचे प्रमाण glucose level in body हे बऱ्यापैकी नाष्ट्यावर आधारित असते कारण ९-१० तास आपल्या शरीरात अन्नाचा एक कण देखील गेलेला नसतो.

त्यामुळे आपण सकाळी पोषक नाष्टा घेणं गरजेचं असतं. परंतु आपण जर नाष्टा आपल्या आहारातून वगळत असू तर आपण आपल्या शरीराची चयापचय क्रिया आहे किंवा आपल्या शरीरात असणारी चरबी जाळण्याची जी क्षमता असते तिला कमी करत आहोत.

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची काही आगळीवेगळी लक्षणे

सकाळी नाष्टा न केल्यास दुपारच्या जेवणाच्या वेळेच्या आधीच भूक लागण्यास सुरुवात होते आणि तेव्हा मन इतर चरबी वाढवणाऱ्या पदार्थांकडे म्हणजेच मिसळ, वडापाव, बर्गर, पिझ्झा, पास्ता अशा गोष्टींकडे वळले जाते. त्यामुळे सकाळचा नाष्टा कधीही टाळू नये.

तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ न खाणे avoid oily and processed food

जर आपण नाष्ट्यामध्ये प्रक्रिया केलेले किंवा तळलेले पदार्थ खात असू तर आपले वजन कमी करण्यासाठी चाललेले बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ होत असतात. या तळलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे आपण आपला वेट लॉस प्लॅन weight loss plan पुर्णपणे संपवून टाकत आहोत.

puri image indian chapati image puri oily-food-indian-puri-oil-image-img
avoid oily and processed food : Best ways to lose weight gradually in marathi

जे प्रक्रिया केलेले पदार्थ असतात जसे की ज्यूस, कोल्ड्रिंक्स, बिस्कीट, यांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते ज्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे जे तळलेले पदार्थ जसे की पुरी, भजी, नूडल्स यांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे आपल्या वेट लॉस प्लॅनची पूर्णपणे वाट लागत असते.

आपण जेव्हा सकाळी नाष्टा करू तेव्हा त्यामध्ये शरीरासाठी पौष्टिक असणारे पदार्थ खायला हवेत. जसे की विविध प्रकारची फळे, सलाड, ओट्स किंवा असे पदार्थ जे आपणाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करतात.

नियमित झोप घेणे sleep is so important

जेव्हा आपण उशिरा उठतो तेव्हा आपण नाष्टादेखील उशिरा करत असतो. आणि नाष्टा उशिरा झाल्यामुळे त्याचा परिणाम दुपारच्या तसेच संध्याकाळच्या जेवणावर देखील थोडाफार पडत असतो. ज्यामुळे आपल्या शरीराची जी चयापचय क्रिया असते ती पूर्णपणे ढासळली जाते. शिवाय अधिकच्या झोपेमुळे दिवसभरासाठी शरीरात उत्साह राहत नाही.

झोप ही अशी गोष्ट आहे जी अती झाली तरी किंवा कमी प्रमाणात झाली तरी देखील शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे आपली झोप ही प्रमाणात असावी. किमान ७ -८ तास जास्तीत जास्त ९-१० तास झोप असणे शरीरासाठी चांगले असते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर अधिकची झोप घेऊ नये.

त्यामुळे आपण सकाळी लवकर उठून व्यायाम केला पाहिजे. आणि त्यानंतर ८-९ या वेळे मध्ये आपला हेल्दी नाष्टा घेतला पाहिजे. आपण आपल्या नाष्ट्याचा तसेच दिवसभरातील खाण्याच्या वेळा निश्चित करणे अत्यंत आवश्यक असते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत याचा खूप मोठा फायदा होत असतो.

चहा पिणे बंद करणे avoid tea for weight loss

चहा ही एक अशी गोष्ट आहे जी आपणाला रोज सकाळ संध्याकाळ लागत असते. काहींना तर रोज चहासोबत बिस्किटे खायला आवडतात. चहाची तलप ही प्रत्येकालाच होत असते परंतु जर आपण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असू तर मात्र हाच चहा आपल्या शरीराचा मोठा शत्रू ठरत असतो.

avoid tea for weight loss cup of tea image indian
avoid tea for weight loss : Best ways to lose weight gradually in marathi

चहा मध्ये साखरेचे प्रमाण तसेच दुधाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे चहा मध्ये अधिकाधिक कॅलरीज समाविष्ट असतात जेणेकरून एक कप चहा आपल्या सकाळच्या व्यामाला व्यर्थ ठरवू शकतो. चहा मध्ये असणारे दूध आणि साखर हे पदार्थ तर सर्वाधिक चरबी वाढवणारे घातक असतात.

चहा पिण्याची कितीही इच्छा असली तरीही चहा पिने टाळावे किंवा त्या ऐवजी आपण ग्रीन टी घेऊ शकतो जेणेकरून आपला वेट लॉस प्लॅन सुरळीत चालू राहील. आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी अधिक गती मिळेल.

हेच काही वजन कमी करण्याचे ६ उत्तम मार्ग आहेत जे आपल्या वेट लॉस प्लॅन मध्ये आपण जोडू शकतो शकतात. आपल्या वजन कमी करण्याच्या रूटीन सोबतच ही काही पथ्ये पाळणे अत्यावशक आहे जेणेकरून आपणाला आपल्या वेट लॉस मध्ये अधिकाधिक गती प्राप्त होईल आणि लवकरच आपले ध्येय गाठता येईल.

ही काही पथ्ये पाळून आपले एका दिवसात वजन कसे कमी होईल how to lose a pound a day किंवा एका आठवड्यात २ किलो कसे कमी होईल how to lose 2 pounds a week याची वाट पाहू नये त्यासाठी आपणाला या सर्व गोष्टींच्या सवयी लावून घ्यायला हव्यात तरच आपणाला पुढील काळामध्ये त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतील.

जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांसोबत फेसबुक किंवा व्हॉट्सॲप वर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचे वजन कमी करण्यासाठीचे चाललेले प्रयत्न लवकर परिणाम दाखवायला चालू करतील.

Tags : how to get skinny fast,how long does it take to lose weight,adele weight loss,how to lose a pound a day,lose a pound a day marathi,best way to lose weight in marathi,वजन कमी करण्याचे ६ उत्तम मार्ग, Best ways to lose weight gradually in marathi,how to lose weight in marathi

Leave a Comment