Vardhaman Mahavir Swami Jayanti Essay In Marathi आपल्या भारत देशातील अनेक राज्यांत महावीर जयंती ही दरवर्षी मोठ्या थाटात साजरी केली जात असते. एवढेच नव्हे तर या दिवशी अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येत असतात ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने लोक सहभाग घेत असतात.
जैन धर्मातील jain dharm सर्वात मोठा सण म्हणजेच वर्धमान महावीर Vardhaman mahavira jayanti जयंती खूप उत्साहात साजरा केला जात असतो. या महावीर जयंतीचा उत्सव स्वामी वर्धमान महावीर यांच्या जन्मदिवशी चैत्र शुक्ल त्रयोदशी मध्ये साजरा केला जातो.
महावीर जयंती बद्दल थोडक्यात Vardhaman Mahavir Swami Jayanti Essay In Marathi :
जैन धर्मीयांच्या Jainism मान्यतेनुसार स्वामी महावीर mahavir swami यांचा जन्म ई.स.पूर्व सहाव्या शतकात तत्कालीन मगध देशातील वैशाली नगरचेच एक उपनगर असलेल्या कुंडग्राम किंवा कौंडिण्यपुर या ठिकाणी झाला. त्याच उपनगराचे प्रमुख त्यांचे वडील सिद्धार्थ Siddarth होते तर त्यांची आई त्रिशला Trishala एका राजाची राजकन्या होत्या.
स्वामी महावीर mahavira swami यांना जैन धर्मातील Jainism/Jaina चोविसावे तीर्थकार मानले जाते. त्यामुळेच त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशीचे हे पर्व साजरे केले जाते. भगवान महावीर यांना लहानपणी वर्धमान या नावाने ओळखले जात होते. हेच वर्धमान महावीर अवघ्या ३० व्या दीक्षा मिळवण्यासाठी आपल्या घरादाराचा त्याग करून निघून गेले होते. दीक्षा घेतल्यानंतर महावीर स्वामी यांनी सुमारे १२ वर्षे कठोर तपश्चर्या केली.
अफिलीएट मार्केटिंग मधून कसे लोक लाखो रुपये कमवत आहेत?
आश्विन वद्य अमावस्येच्या मध्यरात्री भगवान वर्धमान महावीरांना राजगृहाजवळील पावा वा पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले. हा दिवस जैन लोक jain dharm दिवाळी म्हणून साजरा करत असतात. त्यांच्या निर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वीर संवताला सुरुवात झाली.
असे म्हटले जाते की भगवान महावीर यांच्या दर्शनासाठी भक्तांना त्यांच्या सिद्धांताचे पालन करणे गरजेचे होते. महावीर स्वामींचा सर्वात मोठा सिद्धांत अहिंसा होता. एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक भक्ताला अहिंसेसोबतच सत्य, ब्रम्हचर्य, अस्तेय आणि अपरिग्रह या पाच तत्वांचे पालन करणे आवश्यक असते. याच चार तत्वांवर त्यांनी आपला जैन धर्म Jain dharm उभा केला होता. त्यामुळेच त्याला चातुर्याम धर्म म्हटले गेले आहे.
भगवान महावीरांची शिकवण teachings of mahavira :
- अहिंसा – इतरांच्या जीवनाची किमंत ठेवावी.
- सत्य. – कायम खरे बोलावे.खरे वागावे.
- अस्तेय – चोरी करू नये.
- ब्रह्मचर्य – व्यभिचार न करने के लिए.
- अपरिग्रह – कोणत्याही गोष्टींचा संग्रह करू नये.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ही गोष्ट आपणाला माहिती आहे का?
अत्यंत कमी वयात घराचा त्याग करणारे भगवान वर्धमान महावीर आपल्या सिद्धांताचे खंदे पुरस्कर्ते होते. असे म्हटले जाते की स्वामी महावीर यांचा आपल्या सिद्धांतातील समर्पणाचा भाव सगळ्यात महत्त्वाचा होता.
भगवान महावीर यांचे असे म्हणणे होते की कोणाकडून मागून, प्रार्थना करून किंवा हात जोडून धर्म नाही मिळवता येत. धर्म ही कसली वस्तू नाहीये की जी मागितल्यावर मिळेल याला स्वतःच धारण करावे लागते. धर्म हा जिंकल्यावर मिळत असतो आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो संघर्ष असे त्यांचे मानने होते.
भगवान महावीर हे भक्तीमध्ये नाही तर ज्ञान आणि कर्म यावर विश्वास ठेवत असत. स्वामी महावीर यांचे अनुयायांचे followers of mahavir swami असे मानने होते की आत्म्यातील वाईट प्रवृत्तींना वेगळे केले गेले तर कोणालाच विजयी होण्यासाठी जास्त कठीण जाणार नाही. सर्वात प्रथम स्वतःला महान बनवावे त्यासाठी अंतःमनातील वाईट प्रवृत्तींपासून जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.
भारतातील अनेक राज्यांत जैन धर्माला Jainism/Jaina Dharm मानणारे लोक आहेत परंतु राजस्थान आणि गुजरात या राज्यांत ही संख्या सर्वाधिक पहावयास मिळते. त्यामुळेच या राज्यांत या जयंतीला एका मोठ्या उत्साहाप्रमाणे साजरे केले जाते.
या दिवशी जैन मंदिरांत महावीर यांच्या मूर्तींचे अभिषेक केले जातात व त्यानंतर मूर्तीला रथात बसवून शोभायात्रा काढली जाते. या शोभायात्रेत जैन धर्माचे अनेक अनुयायी हिस्सा घेत असतात. जागोजागी मंडप उभारण्यात येतात ज्यामार्फत गरीब व गरजू लोकांची मदत केली जाते. या दिवशी बहुसंख्य ठिकाणीं मांस आणि दारूची दुकाने बंद ठेवली जातात.
भगवान महावीरांची शिकवण teachings of mahavira :
अहिंसा हा सगळ्यात मोठा धर्म आहे त्यामुळे आपणाला जगा आणि जगू द्या या प्रवृत्तीने वागले पाहिजे.
Mahavir Swami
प्रत्येक आत्मा हा स्वतःमध्येच सर्वज्ञात आणि आनंदी आहे. आनंद बाहेरून मिळत नसतो.
शांतता आणि संयम राखणे हिच खऱ्या अर्थाने अहिंसा आहे.
प्रत्येक सजीवाबद्दल मनात दयेचा भाव ठेवणे हीच खरी अहिंसा आहे. घृणा बाळगणारा माणूस स्वतःचाच विनाश करत असतो.
मानव हा दुःखी फक्त स्वतः च्याच चुकांमुळे होऊ शकतो. आपल्या चुका सुधारून तो पुन्हा आनंदी होऊ शकतो.
स्वतःवर विजय मिळवणे हे लाखो शत्रूंवर विजय मिळविण्यापेक्षा कधीही चांगले आहे.
आपले खरे शत्रू हे बाहेर नसतात तर ते आपल्या आत राहत असतात. लोभ, द्वेष, राग, गर्व, अपेक्षा आणि तिरस्कार हेच आपले सर्वात मोठे शत्रू आहेत.
या आयुष्यात आत्मा ही एकटी येत असते, एकटी जात असते. आत्म्याला कोणीही साथीदार किंवा मित्र नसतात.
बाहेरच्या दुश्मनांशी काय लढायचं? लढायचंच असेल तर स्वतःशी लढा. कारण जो स्वतः वर विजय प्राप्त करेल तोच आनंदी राहील.
Tags : Jainism,Jaina,Jain Dharm, vardhman Mahavir swami,mahavir jayanti, Vardhaman Mahavir Swami Jayanti Essay In Marathi, महावीर जयंती, Mahavir jayanti information, teachings of mahavira,mahaveer swami