आरोग्य विम्याचा दावा कसा करावा ? Health Insurance Claim process in India Marathi

Health Insurance Claim process in India Marathi जर आपण आपल्या किंवा आपल्या घरातील व्यक्तींच्या नावे आरोग्य विमा (Aogya Vima) हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी (Health Insurance Policy) घेतली असेल तर आपणाला या इन्शुरन्स क्लेम (Insurance Claim) प्रक्रियेबद्दल माहिती असणे आवश्यक असते. कारण जर आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल आणि आपण आजारी पडतो तर आपणाला या इन्शुरन्स च्या क्लेम चे काम सर्वप्रथम करावे लागते. arogya vima information in marathi.

आरोग्य विम्याच्या दाव्यांची प्रक्रिया (Health Insurance Claim process in India Marathi) :

आरोग्य विमा कंपन्या म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कंपन्या ह्या दोन प्रकारचे सेटलमेंट क्लेम करत असतात.

Health Insurance Claim process in India Marathi
Arogya vima information in marathi | Health Insurance Claim process in India Marathi

या दोन प्रकारच्या सेटलमेंट पैकी पहिला आहे कॅशलेस उपचार म्हणजेच रोख पैसे न देता केलेले उपचार करणे आणि दुसरा प्रकार म्हणजे उपचारा दरम्यान आलेल्या खर्चाचा परतावा देणे.

पहिला प्रकार म्हणजेच कॅशलेस उपचार पद्धतीमध्येे हॉस्पिटल हे रुग्णांकडून उपचाराचे शुल्क न आकारता तो खर्च ते विमा कंपन्यांकडून घेत असतात.

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची आगळीवेगळी लक्षणे

दुसऱ्या प्रकारामध्ये जे रुग्ण असतात त्यांना आपल्या उपचारा दरम्यानचा सर्व खर्च करावा लागतो आणि उपचार झाल्या नंतर काही कागदपत्रे सादर करून त्या खर्चाचा परतावा विमा कंपन्यांकडून घेता येतो.

• कॅशलेस दावा कसा करावा? (Cashless claim process in marathi) :

कॅशलेस क्लेम करण्यासाठी आधी आपणाला विमा कंपनीला याबाबत माहिती देणे गरजेचे असते. त्यानंतर आपण आपल्या विमा कंपनी स्वीकृत रुग्णालय यादी मधील एखाद्या रुग्णालयात भरती व्हावे लागते.

Health Insurance image
आरोग्य विम्याचा दावा कसा करावा ? | Health Insurance Claim process in India Marathi

हॉस्पिटल मध्ये भरती होण्या आधी आणि भरती झाल्यानंतर आपणाला विमा कंपनीशी निगडित एक फॉर्म भरावा लागतो. उपचारानंतर सर्व प्रकारची वैद्यकीय बिले विमा कंपनीद्वारे थेट रुग्णालयात भरली जातात.

इन्शुरन्स कंपन्या अनेक रुग्णालयांना ही सेवा पुरविण्याची परवानगी देत असते जेणेकरून या इन्शुरन्स कंपन्यांना आपले ग्राहक म्हणजेच रुग्णांना या सेवांचा फायदा घेता येईल.

आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी च्या कागदपत्रांमधे या सर्व रुग्णालयांची यादी दिलेली असते. आपण आधीच ती यादी वाचून आपल्या जवळच्या रुग्णालयांची माहिती करून घेणे गरजेचे ठरते.

• परतफेडीचा दावा कसा करावा? (Reimbursement claim process in marathi)

उपचारा दरम्यान आलेल्या खर्चाचा परतावा मिळविण्यासाठी आपणाला एक फॉर्म भरून इन्शुरन्स कंपनीला याबाबत सूचना द्यावी लागते.

Health Insurance Claim form
आरोग्य विम्याचा दावा कसा करावा | Arogya vima information in marathi | Img by Marco Verch

इन्शुरन्स पॉलिसी कंपनीकडून परतावा मिळविण्यासाठी आपणाला उपचारा दरम्यान आलेल्या प्रत्येक प्रकारच्या खर्चाच्या तपशिलाची नोंद करणे महत्त्वाचे असते.

The Best Life Insurance Companies in Australia

यामध्ये आपणाला सगळे महत्त्वाचे कागदपत्रे जसे की डॉक्टरांनी सांगितलेली औषधांची यादी, केल्या गेलेल्या चाचण्यांचे रिपोर्ट, अपघात झाला असेल तर पोलिस एफ. आय. आर. संबंधीचे कागदपत्रं, रुग्णालयाचे बिल आणि हॉस्पिटलचे डिस्चार्ज सर्टिफिकेट अशी विविध कागदपत्रे फॉर्मला जोडावी लागतात.

या सर्व कागदपत्रांसह जोडलेल्या फॉर्मला इन्शुरन्स कंपनीकडे पाठवावे लागते. ज्याचा पत्ता इन्शुरन्स पॉलिसी कागदपत्रांमध्ये दिलेला असतो.

त्यानंतर कंपनी पॉलिसी कव्हर अंतर्गत केल्या गेलेल्या या दाव्याचे मूल्यांकन करते आणि नंतर विमाधारकास पैसे देत असते.

अशाप्रकारे जर आपल्याकडे हेल्थ किंवा मेडिकल इन्शुरन्स / मेडिक्लेम (arogya vima) असेल तर आपण इन्शुरन्स क्लेम प्रक्रिया करू शकतो.

Tags : arogya vima yojana, आरोग्य विम्याचा दावा कसा करावा,arogya vima information in marathi,

Leave a Comment