Essay on Sharad Pawar in Marathi महाराष्ट्र राज्याचे स्वराज्यात आणि त्यानंतर सुराज्यात रूपांतर करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नंतर ज्यांचे नाव आदराने घेता येईल असे महान नेते म्हणजे शरद पवार होय.
शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. परंतु शेतकऱ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनेतेच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार साहेब होय.

शरद पवार यांच्यावर निबंध | Essay on Sharad Pawar in Marathi :
शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि त्यांच्या आईचे नाव शारदाबाई पवार आहे. प्रत्येक व्यक्तीला समजून, ऐकुन घेण्याची सवय, प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करणे, वेगवेगळ्या जाती, धर्म आणि प्रांताचे लोक सर्वांना समजून घेऊन काम करणारे नेते म्हणजे शरद पवार साहेब.
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची बायोग्राफी
प्रत्येक जाती धर्माच्या आत लपलेला माणूस ओळखण्याच्या या गुणांमुळेच शरद पवार आज सर्वांच्या मनातील साहेब आणि लाखो-करोडो युवकांचे प्रेरणास्थान झाले आहेत. यशवंतराव चव्हाणांनी बारामतीच्या खाणीतून शोधलेल्या या हिऱ्याला कोणी साहेब म्हणतं, कोणी विकासपुरुष, कोणी राजकारणातला चाणक्य तर कोणी ८० वर्षांचा पैलवान.
आपल्या असामान्य व्यक्तिमत्त्वाने भारतीय राजकारणामध्ये स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण करणारे शरद पवार साहेब हे भारतीय राजकारणातील स्व-विचारधारा असणारे महनीय नेते आहेत.
---- हे वाचलंत का ? ---- कमी पैशांत कोणता व्यवसाय करावा? आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात?
१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असून या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राचे सर्वात कमी वय असलेले मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवलेले शरद पवार हे सभ्य, सुसंस्कृत शालीनतेचा ऐब सांभाळत गेली अनेक वर्षे भारतीय भूमीतील लोकांच्या आणि समाजाच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत.
राजकारणाची नवीन परिभाषा लिहिणारे, केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी भाषण न देता, शिव्या न देता, मुद्देसूद आणि योग्य तेवढेच पण परिणामकारक बोलणारे आणि प्रचंड जनसंपर्क असणारे तसेच सर्वसामान्य माणसांसोबत थेट नाते सांगणारे शरद पवार साहेब वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा राजकारणाची दिशा बदलण्याची प्रचंड क्षमता ठेवतात.
महाराष्ट्राबरोबरच देशातील प्रत्येक भागाची इत्यंभूत माहिती असणारे हे अभ्यासू व व्यासंगी नेते आहेत. साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, खेळ यांसारख्या सर्वच क्षेत्रांमध्ये शरद पवारांचा शब्द आजही अंतिम मानला जातो. कारण या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली जवळीक ही होय.
ते अनेक वर्षे केंद्रामध्ये कृषी, संरक्षण या खात्यांचे मंत्री होते. केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आखल्या. शेतकऱ्यांना उत्पादनक्षम व सक्षम बनविण्यासाठी त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या.
क्रीडा क्षेत्रातही शरद पवार यांनी प्रचंड योगदान दिले. ते अनेक वर्षे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआय चे अध्यक्ष होते. जागतिक क्रिकेट बोर्डाचे ही ते काही काळ अध्यक्ष राहिले आहेत. तसेच कुस्ती आणि कबड्डी परिषदेचे देखील ते अध्यक्ष होऊन गेले आहेत.
खेळासोबतच ते साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखकांना तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधकांना ही पवार साहेब आपलेसे वाटतात.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नावाजलेले नेते, आमदार, खासदार पक्षाच्या पडत्या काळात पक्ष सोडून गेल्यानंतर ही वयाच्या ऐंशीव्या वर्षी सगळा महाराष्ट्र पिंजून काढत महाराष्ट्रात सत्ताबदल केला.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामागे शरद पवारांची भूमिका अत्यंत मोलाची आणि निर्णायक ठरली होती.
संपूर्ण भारतामध्ये एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यामध्ये शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याची भूमिका महत्वाची मानली जाते.
आपला मतदारसंघ म्हणजेच बारामती मध्ये त्यांनी केलेली अभूतपूर्व विकासकामे ही बारामती पॅटर्न म्हणून ओळखली जातात. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सुद्धा बारामती विकास पॅटर्नला भेट देऊन शरद पवार यांच्या दूरदर्शी योजनांचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक भागात, खेडोपाड्यात सिंचनाच्या सोयी सुविधा, आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान यांचा विकास तसेच गाव तिथे रस्ता आणि शेती तिथे वीज कनेक्शन हे त्यांचे सूत्र महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे ठरले आहे.
शरद पवार हे भारतीय राजकारणामध्ये दिग्गज व्यक्तिमत्व असून देशातल्या जवळजवळ सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी त्यांची खास मैत्री आहे. संपूर्ण भारतामध्ये शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. याचे कारण त्यांचे शांत, संयमी, सभ्य व सुसंस्कृत व्यक्तिमत्व होय. स्व-विचारधारा असलेल्या या नेत्याने महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणातही आपला कधीही न पुसला जाणारा ठसा उमटविला आहे.
शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे तसेच शरद पवार यांचे पुतणे अजितदादा पवार हे देखील शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोलाचे योगदान देत आहेत.
भारतीय राजकारणामध्ये एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार साहेबांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. बारामती पासून ते दिल्ली पर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पार पाडत आज वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील स्वतःच्या स्वास्थ्याला दुय्यम स्थान देत शरद पवार सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी झटत आहेत. धडपडत आहेत. त्यामुळे या वयातही ते तरुण वर्गाचे महानायक आणि आदर्श बनले आहेत.
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात शरद पवार हे एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आपल्या देशाच्या आणि देशातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या अश्या महान नेत्यास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
असा नेता झाला नाही, पुन्हा कधी न होणार..
शरद पवार हे नाव आसमंतात गरजत राहणार..
Tags : शरद पवार यांच्यावर निबंध, Essay on Sharad Pawar in Marathi, Sharad Pawar, शरद पवार