एसआयपी म्हणजे काय आणि एसआयपी चे फायदे | SIP Meaning In Marathi and advantages of SIP in Marathi

SIP meaning in marathi जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा आपणाला त्यात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग मिळतात. एक म्हणजे लंपसम गुंतवणूक म्हणजेच एक रकमी गुंतवणूक आणि दुसरा मार्ग म्हणजे एसआयपी द्वारे गुंतवणूक.

एसआयपी म्हणजे एखादी स्कीम आहे असा गैरसमज अनेक लोकांचा असतो. परंतु तसे अजिबात नहीं एसआयपी समजून घेणे एवढेही अवघड नाही जेवढे दिसत असते. एसआयपी म्हणजे काही कसले रॉकेट सायन्स नाही जे समजायला अवघड जाईल.

अफिलिएट मार्केटींग मधून हजारों रूपये कसे कमवावे?

SIP Meaning In Marathi and advantages of SIP
एसआयपी म्हणजे काय आणि एसआयपी चे फायदे SIP Meaning In Marathi and advantages of SIP in marathi

कमी पैशांत कोणता व्यवसाय करावा?

एसआयपी म्हणजे काय ? SIP meaning in marathi

एसआयपी ही कसलीही स्कीम नाही तर हे एक फक्त माध्यम आहे गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये एक ठराविक रक्कम एका ठराविक दिवशी आपल्या गुंतवणुकीत जोडली जात असते.

उदाहरणार्थ आपल्याकडे १२,००० रुपये आहेत. आपण हे सगळे पैसे एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये सरसकट गुंतवू शकतो आणि जर तेच १२,००० जर आपण महिन्याला १००० अशा पद्धतशीरपणे एक वर्षासाठी गुंतवत राहिलो तर ती होईल एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना.

एसआयपी म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन ( Systematic Investment Plan ) होय. एसआयपी ही गुंतवणुकीची अशी पद्धत आहे ज्याद्वारे गुंतवणुकदार सतत गुंतवणूक करू शकतो.

एसआयपी सुरू करताना त्या संबंधी पुढील तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली जाते.

एसआयपी ची रक्कम Amount of SIP

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा हा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदार कमीतकमी रक्कम सातत्याने गुंतवू शकतो. म्हणजेच यामध्ये ५०० रुपयांपासून देखील एस आय पी चालू करता येऊ शकते.

काही फंड मध्ये तर ही किमान रक्कम ५०० पेक्षा देखील कमी असलेली पहावयास मिळते. परंतु साधारणतः गुंतवणुकदार कमीत कमी ५०० आणि जास्तीत जास्त त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही रकमेची गुंतवणूक करू शकतो.

एसआयपी ची तारीख Date of SIP

एसआयपी मधील गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला एसआयपी ची वारंवारता काय असेल हे आधीच निश्चित करून घ्यावे लागते. म्हणजेच एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याची तारीख ठरवून घ्यावी लागते. मग यामध्ये गुंतवणूकदार स्वतःच्या इच्छेनुसार तारीख निवडू शकतो.

एसआयपी ची तारीख ही साप्ताहिक, मासिक, तिमाही किंवा वार्षिक देखील असू शकते. गुंतवणूकदाराला ठराविक तारखेला आपल्या एसआयपी रकमेचा भरणा भरावा लागतो.

एसआयपी चा कालावधी Maturity Period of SIP

एसआयपी चा कालावधी म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याची एसआयपी किती कालावधी पर्यंत चालू ठेवायची आहे तो काळ. म्हणजेच यामध्ये गुंतवणूकदाराला आपली एसआयपी एक वर्षासाठी, दोन वर्षासाठी, ५ किंवा १० वर्षांसाठी किंवा जोपर्यंत तो स्वतः एसआयपी बंद करत नाही तोपर्यंत एसआयपी चालू ठेवायची आहे हे ठरवावे लागते.

या तीन गोष्टी एसआयपी करताना प्रामुख्याने विचारात घेतल्या जातात. यामध्ये गुंतवणूकदाराला सुरवातीला रक्कम ठरवावी लागते त्यानंतर आपली एसआयपी हप्त्याची तारीख निवडणे आणि मग एसआयपी चा कालावधी ठरवावा लागतो.

एसआयपी म्हणजे काय एसआयपी चे फायदे SIP Meaning In Marathi advantages of SIP
एसआयपी म्हणजे काय एसआयपी चे फायदे SIP Meaning In Marathi advantages of SIP in marathi information in marathi

एसआयपी चे फायदे Advantages of SIP in marathi

एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजनेचे अनेक फायदे आहेत. त्यातले काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

किमान रकमेतील गुंतवणूक minimum investment in SIP

अगदी कमीत कमी रकमेत देखील आपण आपल्या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतो. विद्यार्थी असो, गृहिणी असो किंवा एखादा उद्योगपती असो जर कोणालाही चांगला व्याजदर मिळवून पैसे साठवायचे असतील तर ते म्युचुअल फंड च्या एसआयपी प्लॅन पासून सुरुवात करू शकतात. एसआयपी चा सर्वात चांगला फायदा आहे की आपण कमीतकमी रकमेत गुंतवणूक सुरू करू शकतो.

एसआयपी मधील तरलता Liquidity in SIP

लिक्वीडिटी म्हणजेच यामधील तरलतेबद्दल बोलायचं झालं तर एसआयपी या बाबतीत उत्तम आहे म्हणजेच गुंतवणूकदार आपले पैसे यातून हवे तेव्हा काढून घेऊ शकतो ते ही कोणत्याही प्रकारचे अधिकचे शुल्क न देता.

जर ठराविक कालावधी साठी कोणी एसआयपी करत असेल आणि अचानक त्याला त्या पैशांची गरज पडली तर ते पैसे काढता येऊ शकतात. परंतु ELSS सारख्या काही ठराविक फंड मध्ये ही सुविधा नसते.

अधिक परतावा Good return on investment

म्युच्युअल फंड च्या एसआयपी प्लॅन मध्ये काही काळानंतरच आपणाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येते. परंतु जर दीर्घ कालावधीसाठी एसआयपी केली गेली तर मात्र अधिक परतावा मिळालेला दिसून येतो.

अधिक प्रमाणात परतावा मिळवण्यासाठी एसआयपी ही दीर्घकालीन असावी. तज्ज्ञांच्या मते एसआयपी द्वारे आपल्या गुंतवणुकीवर अधिकाधिक प्रमाणात परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक ही किमान ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावी.

एसआयपी म्हणजे काय एसआयपी चे फायदे SIP Meaning In Marathi advantages of SIP
एसआयपी म्हणजे काय एसआयपी चे फायदे SIP Meaning In Marathi advantages of SIP

एसआयपी मधील लवचिकता Flexibility in SIP

एसआयपी चा हा एक फायदा आहे की एसआयपी आपल्याला प्रचंड लवचिकता प्रदान करते. म्हणजेच यामध्ये गुंतवणूकदार कधीही आपले पैसे काढून घेऊ शकतो. तसेच गुंतवणूकदार आपला एसआयपी प्लॅन हवा असेल तेव्हा थांबवू शकतो. एसआयपी मधील जुने पैसे काढून घेऊ शकतो किंवा अजून नवीन पैशांची गुंतवणूक करू शकतो.

एसआयपी मध्ये पूर्णपणे लवचिकता आणि पारदर्शकता देखील पाहायला मिळते. परंतु जर ELSS सारख्या फंड मध्ये एसआयपी चालू असेल तर त्यामध्ये प्रत्येक एसआयपी हप्त्याची रक्कम ही ३ वर्षासाठी लॉक इन केली जाते. तिथे गुंतवणूकदार मध्येच ती रक्कम काढू शकत नाही.

कमी प्रमाणातील जोखीम Low risk SIP

जर गुंतवणूकदार इक्विटी फंड मध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करत असेल तर तिथे एकाच बाजार भाव चक्रात गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जात नाहीत तर ज्यामुळे त्यातली थोडी जोखीम कमी होत असते.

दीर्घकालीन एसआयपी मध्ये वेगवेगळ्या किमतींवर युनिट्स खरेदी केले जात असल्याने आणि शेवटी बाजार भावाची सरासरी (market cost averaging) काढली जात असल्याने गुंतवणुकीवर जास्त नकारात्मक प्रभाव पडताना दिसून येत नाही.

एसआयपी मधील जोखीम अगदीच शून्य असते असेही नाही परंतु यामधील जोखमीचे व्यवस्थापन करता येते आणि ही जोखीम कमी देखील करता येते. परंतु जर गुंतवणूकदारांची गुंतवणूक ही दीर्घ कालावधी साठी असेल तर जोखमीचे प्रमाण नसल्याच्या बरोबर असते.

एसआयपी मध्ये गुंतवणुक कशी करावी? How to invest in SIP?

आजच्या काळात आपण कोणत्याही paper work शिवाय SIP मध्ये गुंतवणुक करू शकतो. आपण ET Money या ॲप मार्फत एसआयपी मध्ये अगदी सहज गुंतवणूक करू शकतो. ET Money शिवाय देखील आणखी बरेच ॲप्स आहेत ज्यांचा वापर करून आपण लगेच गुंतवणुकीला सुरूवात करु शकतो.

एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना आपणाला दोन प्रश्न विचारले जातात.

१. आपण किती काळापर्यंत एसआयपी मध्ये गुंतवणुक करू इच्छिता? यासाठी आपण short term, medium term किंवा long term यांपैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करु शकतो.

२. दुसरा प्रश्न हा विचारला जातो की आपण किती जोखीम घेऊ शकता? यासाठी आपली किती जोखीम घेण्याची तयारी आहे ह्याची आपणाला माहिती असावी.

एसआयपी SIP मध्ये गुंतवणुक करण्यासाठी आपण जवळच्या कोणत्याही Mutual Fund Broker Near Me ला भेट देऊ शकतो. तसेच आपण ऑनलाईन पद्धतीने देखील गुंतवणुकीला सुरूवात करु शकतो.

एसआयपी द्वारे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना आपणाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully before Investing.

म्हणजेच म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन असते, गुंतवणूकीपूर्वी सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचून, पडताळून, समजून घेऊनच यात गुंतवणूक करावी. यातच आपला फायदा आहे.

Tags : SIP meaning in marathi, advantages of SIP in marathi, एसआयपी म्हणजे काय, एसआयपी चे फायदे, sip information in marathi

3 thoughts on “एसआयपी म्हणजे काय आणि एसआयपी चे फायदे | SIP Meaning In Marathi and advantages of SIP in Marathi”

Leave a Comment