म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडाचे प्रकार | Mutual Fund meaning in marathi and types of Mutual Funds in Marathi

म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडाचे प्रकार | Mutual Fund meaning in marathi and types of Mutual Funds in Marathi : म्युच्युअल फंड सही है ! हे वाक्य आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे कधी ना कधी ऐकलेले आहे. म्युच्युअल फंड च्या संबंधीच्या अनेक जाहिराती, व्हिडिओज आणि फोटोज् आपण टीव्ही किंवा इंटरनेटवर पाहत असतो. परंतु आपल्याला नक्की हे म्युच्युअल फंड म्हणजे काय ? आणि म्युच्युअल फंड कसे काम करते ? हे कोणीच नाही सांगत.

चला पाहूया नेमकं हे म्युच्युअल फंड म्हणजे काय ? (mutual Fund meaning in marathi) आणि म्युच्युअल फंडाचे प्रकार किती असतात? (types of Mutual Funds in Marathi) आणि ह्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत ?

सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स

म्युच्युअल फंड म्हणजे काय ? Mutual Fund meaning in marathi

Mutual Fund meaning in marathi and types of Mutual Funds in Marathi
म्युच्युअल फंड म्हणजे काय ? | Mutual Fund meaning in marathi and types of Mutual Funds in Marathi

म्युच्युअल फंड ही संज्ञा दोन शब्दांपासून बनली आहे. म्युच्युअल आणि फंड. यामध्ये म्युच्युअल चा अर्थ होतो की एखादी गोष्ट समान असणे आणि फंड म्हणजे निधी किंवा पैसे. अशाप्रकारे म्युच्युअल फंड चा अर्थ झाला की सामाईक फंड (mutual fund meaning in marathi).

म्युच्युअल फंड म्हणजे एक असा फंड ज्यामध्ये खूप साऱ्या लोकांचे पैसे जमा करून ठेवले जातात. या गोळा केलेल्या फंड ला एयूएम AUM (Assets Under Management) असे म्हटले जाते.

लोकांकडून त्यांच्या गोळा केलेल्या या फंड ची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. कारण त्याबदल्यात जास्तीत जास्त परतावा मिळेल.

प्रत्येक म्युच्युअल फंडचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रोफेशनल असतात. ज्यांना फंड मॅनेजर असे म्हटले जाते. म्युच्युअल फंडमध्ये गोळा केलेला फंड कुठे आणि किती गुंतवणूक करायचा आहे याचा सर्वस्वी निर्णय हा फंड मॅनेजर मार्फत घेतला जातो.

म्युच्युअल फंडाचे प्रकार | types of Mutual Funds in Marathi

म्युच्युअल फंडची विभागणी मूलतः २ प्रकारात केली जाऊ शकते. पहिले म्हणजे मालमत्तेच्या (assets) आधारावर आणि दुसरे म्हणजे संरचनेच्या (structure) आधारावर.

म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडाचे प्रकार | Mutual Fund meaning in marathi and types of Mutual Funds in Marathi
म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडाचे प्रकार | Mutual Fund meaning in marathi and types of Mutual Funds in Marathi
थोडक्यात :

मालमत्तेच्या आधारावरील म्युच्युअल फंड mutual funds based on assets

mutual-funds-meaning-in-marathi
Mutual Fund meaning in marathi and types of Mutual Funds in Marathi | म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडाचे प्रकार

इक्विटी म्युच्युअल फंड equity mutual funds meaning in marathi

इक्विटी म्युच्युअल फंड हे असे फंड असतात जे प्रामुख्याने भाग बाजारात गुंतवणूक करत असतात. जर आपणाला वाटत असेल की आपल्या पैशांची चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक व्हावी तर आपण या इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो.हे इक्विटी म्युच्युअल फंड ४ प्रकारचे असतात.

लार्ज कॅप फंड Large cap funds in marathi :

कॅप म्हणजे कॅपिटल. म्हणजेच एखाद्या कंपनीचे मार्केट कॅपीटलाइजेशन म्हणजेच त्या कंपनीचा मार्केट मधील मूल्य किंवा आकार. हे लार्ज कॅप फंड अशाच मोठ्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणुक करून परतावा मिळवत असतात.

Mutual Fund Meaning in Marathi

कमी पैशांत कोणता व्यवसाय करावा?

ह्या लार्ज कॅप कंपन्या परतावा कमी प्रमाणात देत असतात परंतु त्यांच्यामध्ये सातत्य असते. त्यामुळे यामध्ये जोखीम देखील कमी प्रमाणात असते.

मिड कॅप फंड Mid cap funds in marathi :

मध्यम स्वरूपाचे बाजार मूल्य असणाऱ्या कंपन्यांमध्ये जे म्युच्युअल फंड गुंतवणुक करतात त्यांना मिड कॅप फंड असे म्हटले जाते. यामध्ये लार्ज कॅप फंड पेक्षा थोड्या अधिक प्रमाणात परतावा मिळतो. यामध्ये जोखमीचे प्रमाण देखील मध्यम स्वरुपाचे असते.

स्मॉल कॅप फंड Small cap funds in marathi :

ज्या स्मॉल कॅप कंपन्या नुकत्याच बाजारात नवीन स्थिरावण्याचा प्रयत्न करत असतात. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात त्या फंड ला स्मॉल कॅप फंड असे म्हटले जाते. या स्मॉल कॅप फंडस् मध्ये सर्वाधिक परतावा मिळवून देण्याची क्षमता असते परंतु त्याच बरोबर सर्वाधिक जोखीम देखील या फंडस् मध्ये असते.

मल्टी कॅप फंड Multi cap funds in marathi :

नावाप्रमाणेच या फंड चे कार्य असते. ह्या प्रकारचे फंड स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि त्याचबरोबर मिड कॅप अशा प्रत्येक प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक करत असतात. मल्टी कॅप फंड मध्ये मध्यम जोखमीवर अधिक परतावा मिळण्याचे प्रमाण अधिक असते. अनेक लोक इतर फंड पेक्षा याला जास्त पसंती दर्शवत असतात.

फ्लेक्सी कॅप फंड Flexi cap funds in marathi :

म्युच्युअल फंड चा हा नवीन प्रकार मल्टी कॅप फंडच्या आधारावरच काढला गेला आहे. यामध्ये नावाप्रमाणेच या स्किम ला आपल्याला हवे ते फंड निवडण्याचे स्वातंत्र्य असते. फ्लेक्सी कॅप फंड मध्ये ६५% इतका हिस्सा इक्विटी आणि इक्विटी ओरिएंटेड फंड मध्ये ठेवला जातो.

ELLS म्युच्युअल फंड ELLS mutual funds in marathi :

ELLS चा अर्थ असा होतो की इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम. म्हणजेच ही ELLS प्रकारातील फंड हे इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असतात. या ELLS मध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारांना आयकर विभागाचे कलम ८० अनुसार १.५० पर्यंतची सूट मिळत असते.

Mutual Fund Meaning in Marathi

डेब्ट म्युच्युअल फंड Debt mutual funds meaning in marathi

या प्रकारातले म्युच्युअल फंड हे प्रामुख्याने सरकारी हमीपत्र म्हणजेच (Government Securities) आणि बंधपत्रे आणि कर्जरोखे ( Bonds and Debentures) यामध्ये गुंतवणूक करत असतात.

अफिलिएट मार्केटींग मधून हजारों रूपये कसे कमवावे?

ज्या गुंतवणूकदारांना आपले पैसे भाग बाजार म्हणजेच शेअर मार्केट ऐवजी सरकारी हमीपत्र आणि बंधपत्र आणि कर्जरोखे यांमध्ये गुंतवणूक करायचे असतात ते डेब्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात. डेब्ट म्युच्युअल फंडात जोखीम आणि परतावा दोन्हीही एक्विटी म्युच्युअल फंडपेक्षा कमी असते.

लिक्वीड फंड Liquid funds meaning in marathi

नावाप्रमाणेच या फंड मध्ये लिक्विडिटी असते. म्हणजेच गुंतवणुकदार या फंड मधून हवं तेव्हा आपली गुंतवणूक काढू शकतो. गुंतवणूक काढण्याच्या प्रक्रियेची पूर्तता केल्या नंतर जास्तीतजास्त २४ तासांच्या आत गुंतवणूकदाराचे पैसे त्याच्या बँक खात्यात जमा होतात.

डेब्ट फंडचाच एक प्रकार असलेल्या ह्या लिक्वीड फंड मध्ये गुंतवणूकदार कमीतकमी ३ दिवसांसाठी देखील गुंतवणूक करू शकतात. हे फंड ज्या सेक्युरीटीज मध्ये गुंतवणूक करतात त्यांचा परिपक्वतेचा कालावधी हा किमान ९१ दिवसांचा असतो.

हे लिक्वीड फंड डेब्ट फंड पेक्षा कमी परतावा मिळवून देतात परंतु हे त्यापेक्षा कमी जोखमीचे देखील असतात. बँक एफडी आणि सेव्हिंग अकाउंट यांसाठी पर्याय म्हणून लिक्वीड फंड्स कडे पाहता येईल.

हायब्रीड म्युच्युअल फंड Hybrid mutual funds meaning in marathi

इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेब्ट म्युच्युअल फंड हे दोन्ही फंड जिथे जिथे गुंतवणूक करतात त्या दोन्ही ठिकाणी हे हायब्रीड म्युच्युअल फंड गुंतवणूक करत असतात.

जर एखाद्याला वाटत असेल की आपले काही पैसे स्टॉक मार्केटमध्ये आणि काही पैसे सरकारी बंधपत्रांमध्ये (government bonds) गुंतवणूक करायचे असतील तर ती व्यक्ती ह्या हायब्रीड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते.

हायब्रीड म्युच्युअल फंड मध्ये जोखीम आणि परताव्याचे प्रमाण हे इक्विटी म्युच्युअल फंड पेक्षा कमी परंतु डेब्ट म्युच्युअल फंडाच्या तुलनेत जास्त असते. हायब्रीड म्युच्युअल फंडांमध्ये ५ प्रकारचे हायब्रीड फंड असतात.

इक्विटी ओरिएंटेड हायब्रीड फंड Equity oriented hybrid funds in marathi

इक्विटी ओरिएंटेड हायब्रीड फंड मधील विभागणी ही ६५% इक्विटी मार्केट मध्ये आणि बाकी डेब्ट फंड मध्ये अशी केलेली असते.

डेब्ट ओरिएंटेड हायब्रीड फंड Debt oriented hybrid funds in marathi
डेब्ट ओरिएंटेड हायब्रीड फंड मध्ये फंड विभागणीतील ६०% हे डेब्ट आणि इक्विटी मध्ये ठेवले जाते.
बॅलेंस म्युच्युअल फंड Balance mutual funds meaning in marathi

बॅलेंस म्युच्युअल फंड मध्ये विविध प्रकारच्या मालमत्तेवर आधारित गोष्टींमध्ये गुंतवणूक केली जाते. ज्यामध्ये इक्विटी, बॉण्ड्स म्हणजेच बंधपत्रे, डेब्ट्स आणि विविध प्रकारची हमीपत्रे येतात.

मंथली इन्कम प्लॅन Monthly income plan in marathi

या प्रकारच्या फंड मध्ये जवळजवळ ९०% रक्कम ही डेब्ट्स मध्ये गुंतवली जाते आणि अगदी काही प्रमाणात ती इक्विटीमध्येही गुंतवली जाते. डेब्ट म्युच्युअल फंड पेक्षा यामध्ये जोखीम कमी असून परतावा मिळण्याचे प्रमाण अधिक असते.

आर्बिट्राज म्युच्युअल फंड Arbitrage mutual funds in marathi

आर्बिट्राज म्युच्युअल फंड मध्ये एका बाजारातून कमी किमतीत स्टॉक खरेदी करून दुसऱ्या बाजारात जास्त किंमतीत विकला जातो. जसे की कॅश मार्केट मधून खरेदी करून डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट मध्ये विकून हे फंड आपला नफा मिळवत असतात.

हे होते मालमत्तेच्या आधारावरील (mutual funds based on assets) काही म्युच्युअल फंडांचे प्रकार.

Mutual Fund Meaning in Marathi


संरचनेच्या आधारावरील म्युच्युअल फंड mutual funds based on structure

Mutual Fund meaning in marathi and types of Mutual Funds in Marathi

ओपन इंडेड म्युच्युअल फंड Open ended mutual funds meaning in marathi

ओपन इंडेड म्युच्युअल फंड हे म्युच्युअल फंड आपल्या नावाप्रमाणे ओपन असतात. ज्यामध्ये गुंतवणुकदार कधीही पैसे गुंतवू शकतो आणि वाटेल तेव्हा पैसे काढू शकतो.

गुंतवणुकदार यामधून लवकर बाहेर पडू नये यासाठी काही ठराविक मुदतीच्या ( उदा. एक वर्ष ) आधीच गुंतवणुकीतून बाहेर पडल्यास Exit Load च्या रुपात काही शुल्क आकारले जाते. हे शुल्क साधारणतः १% इतके असू शकते. बाजारात उपलब्ध असणारे बहुतेक फंडस् हे ओपन इंडेड फंड असतात.

क्लोज इंडेड म्युच्युअल फंड Close ended mutual funds meaning in marathi

क्लोज इंडेड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदार फक्त सुरुवातीच्या काळातच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये ओपन इंडेड फंड सारखे वाटेल तेव्हा एन्ट्री आणि वाटेल तेव्हा एक्झीट घेता येत नाही.

गुंतवणुकदार हा त्याच्या गुंतवणुकीचा अवधी संपल्यानंतरच यातून बाहेर पडू शकतो. तोपर्यंत तो यातून आपले पैसे काढूही शकत नाही आणि यात आणखी गुंतवणूक करूही शकत नाही.

इंटरवल म्युच्युअल फंड Interval mutual funds in marathi

इंटरवल म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार एका विशिष्ट वेळी गुंतवणूक आणि विक्री करू शकतो. आणि ही विशिष्ट वेळ हे फंड स्वतः ठरवत असतात.

यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे ठराविक काळासाठी लॉक केले जातात. उदाहरणार्थ, वार्षिक इंटरवल फंड जवळजवळ ३६५ दिवस लॉक असतो. ३६५ दिवसांच्या ह्या इंटरवल नंतर हा फंड खरेदी-विक्री साठी पुन्हा खुला केला जातो. हा २ दिवस खुला केला जातो.

इंडेक्स फंड Index fund meaning in marathi

इंडेक्स फंड हे आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशांची थेट स्टॉक मार्केटच्या इंडेक्स मध्ये गुंतवणूक करत असतात. जसे की BSE चे सेन्सेक्स, NSE चे निफ्टी, बँक निफ्टी अशा प्रकारच्या इंडेक्स मध्ये गुंतवणूक केली जाते.

यासाठी फंड मॅनेजरला जास्त काही मोठी योजना आखावी लागत नाही त्यामुळे ह्या फंड चा खर्चाचा रेशो खूप कमी असतो. इंडेक्स जेव्हा कमी किमतीत ट्रेड करत असतात तेव्हा यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.

सेक्टर फंड Sector fund meaning in marathi

हे सेक्टर फंड देखील अगदी इंडेक्स फंड सारखे काम करते. परंतु यामध्ये इंडेक्स मध्ये गुंतवणूक न करता एखाद्या विशिष्ट किंवा चांगली कामगिरी दाखविणाऱ्या आणि जास्त परतावा देणाऱ्या क्षेत्रात गुंतवणुक केली जाते. जसे की बँकिंग क्षेत्र, आयटी क्षेत्र, पॉवर सेक्टर, फार्मा सेक्टर इत्यादी.

हे होते संरचनेच्या आधारावरील (mutual funds based on structure) काही म्युच्युअल फंडांचे प्रकार.

Mutual Fund Meaning in Marathi


म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे अनेक आहेत परंतु तरीदेखील आपणाला यामध्ये कोणत्याही अभ्यासाशिवाय किंवा कसलाही पुढचा मागचा विचार न करता गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे यामध्ये एकदम काळजीपूर्वक सर्व माहिती घेऊनच गुंतवणुक केली पाहिजे. आपली जोखीम घेण्याची तयारी किती आहे हे ठरवूनच आपणाला हवा तो म्युच्युअल फंड आपण गुंतवणूक करण्यासाठी निवडू शकतो.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना आपणाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully before Investing.

म्हणजेच म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन असते, गुंतवणूकीपूर्वी सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचून, पडताळून, समजून घेऊनच यात गुंतवणूक करावी. यातच आपला फायदा आहे.


Tags : mutual fund meaning in marathi, types of mutual funds in marathi, म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंडाचे प्रकार, mutual fund information in marathi

4 thoughts on “म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडाचे प्रकार | Mutual Fund meaning in marathi and types of Mutual Funds in Marathi”

Leave a Comment