Block-Chain म्हणजे काय ? What is Blockchain Meaning in Marathi

Blockchain meaning in marathi गेल्या काही वर्षांत आपण Blockchain हा शब्द कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ऐकत आहोत. काही लोकांना अजूनही ही Blockchain Technology नक्की काय आहे याबद्दल कल्पना नाही, परंतु जर आपण Bitcoin किंवा CryptoCurrency बद्दल थोडीफार माहिती असेल तर आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीचे रूपांतर digital स्वरुपात केले जाते आणि त्याचा data जतन करून ठेवला जातो.

Blockchain हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. पहिला म्हणजे ब्लॉक (block) आणि दुसरा चैन (chain) म्हणजेच साखळी. ब्लॉक म्हणजे Blockchain system मध्ये डेटा साठवण्यासाठी असणारे ब्लॉक्स. या ब्लॉक्स मध्ये cryptocurrency चा data या ब्लॉक्समध्ये साठवला जातो.

Blockchain Meaning in Marathi
Blockchain Meaning in Marathi

ब्लॉकचैन म्हणजे काय ? Blockchain Meaning in Marathi

आता Blockchain म्हणजे काय? हे नीट समजावून घेऊया. ब्लॉकचेन हा एक प्रकारचा database आहे. या डेटाबेसमध्ये information आणि data सारणीच्या स्वरूपात संग्रहित केला जातो.

हे तंत्रज्ञान सर्वात प्रथम 1991 मध्ये Stuart Haber आणि W. Scott Stornetta यांनी जगासमोर आणले. परंतु blockchain ला आपले पहिले application वर्ष 2009 मध्ये bitcoin च्या launch च्या वेळी मिळाले.

Proxy Server म्हणजे काय ?

याला blockchain यासाठी म्हटले जाते की हे तंत्रज्ञान data ला गटांमध्ये मध्ये गोळा करत असते आणि याच गटांना block असे म्हटले जाते. प्रत्येक ब्लॉक ची एक मर्यादित स्टोरेज क्षमता limited storage capacity असते.

जेव्हा एका ब्लॉक ची ही मर्यादित स्टोरेज क्षमता भरली जाते तेव्हा तो ब्लॉक पहिल्या block सोबत जोडला जातो. असे अनेक blocks मिळून data ची एक मोठी साखळी बनवतात ज्या साखळीला ब्लॉकचेन Blockchain म्हणतात.

ब्लॉकचैन कसे कार्य करते? How Blockchain Works in Marathi

Blockchain ही साखळी अशा blocks ची मिळून तयार होत असते ज्या ब्लॉक्स मध्ये data पुर्णपणे भरलेला असतो. प्रत्येक block मध्ये आपल्या मागील ब्लॉकची क्रिप्टोग्राफी हॅश Cryptography Hash असते. हा hash प्रत्येक transection वर generat होत असतो. जो की numbers आणि letters च्या strings चा मिळून बनलेले असतात.

जर blockchain मधील डाटा सोबत जर कोणी थोडी देखील छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पूर्ण data हा change होत असतो. ज्यामुळे record मध्ये झालेली हेराफेरी अगदी सहज लक्षात येऊ शकते. कदाचित यामुळेच या ब्लॉकचैन तंत्रज्ञान Blockchain Technology ला सर्वाधिक सुरक्षित मानले जाते.

प्रत्येक computer कडे blockchain ची एक copy असते. ज्याला nodes असे म्हटले जाते. transaction मध्ये काही बदल झाला आहे का हे शोधण्यासाठी हे nodes ब्लॉक्स मधील hash तपासत असतात.

जर transaction हे बहुतेक nodes द्वारे approved केले गेले असेल. तर ते block मध्ये लिहिले जाते. ही ब्लॉकचेन दर 10 मिनिटांनी स्वतः ला update करत राहते. यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक व्यवहाराची detail उपलब्ध असते.

Blockchain Meaning in Marathi
Blockchain Meaning in Marathi

ब्लॉकचेन आणि बिटकॉईन मधील संबंध How Does Blockchain Work with Bitcoin

Bitcoin साठी blockchain हा एक प्रकारचा database आहे जो की प्रत्येक Bitcoin transaction हे store करून ठेवले जाते. बिटकॉईन सारख्या cryptocurrency या थेट Blockchain मार्गात computer वर spread केल्या जातात. ज्यामुळे या currencies कोणत्याही authority शिवाय operate केल्या जातात. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने व्यवहारातील बरीच फी कमी होत असते.

क्रिप्टोकरन्सी cryptocurrency व्यतिरिक्त, health center, banking industry आणि इतर अनेक ठिकाणी Blockchain technology वापरली जाते.

2 thoughts on “Block-Chain म्हणजे काय ? What is Blockchain Meaning in Marathi”

Leave a Comment