जेव्हापासून जगाला बिटकॉईन किंवा एथेरियम यांसारख्या दिग्गज क्रिप्टोकरन्सींसोबत ओळख झाली आहे तेव्हापासून जगभरात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. चला तर पाहूया नेमकं क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? ( Cryptocurrency Meaning In Marathi ). बिटकॉईनची सुरुवात कोणी केली? कशासाठी केली?
सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स
टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) चे मालक एलोन मस्क (Elon Musk), अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा (Jack Ma), मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स (Bill Gates) तसेच आपल्या आरबीआय चे गव्हर्नर रघुराम राजन यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तींनी क्रिप्टोकरन्सीला भविष्यातील चलन म्हणून संबोधले आहे.
अगदी कमी गुंतवणुकीत सुरू होणारे काही व्यवसाय
याचाच अर्थ की भविष्यामध्ये कदाचित जगभरातील नोटा आणि नाण्यांचे बाजारातील स्थान संपून त्याजागी नवीन उदयास आलेल्या क्रिप्टोकरन्सीला मान्यता प्राप्त होईल.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency Meaning In Marathi
आज ज्याला पहावं तो या क्रिप्टोकरन्सीच्या पाठीमागे धावत आहे. अगदी कमी काळात या क्रिप्टोकरन्सीने आर्थिक बाजारात आपली जागा बनवली आहे.
क्रिप्टोकरन्सीला आभासी चलन ( Virtual Money ) किंवा डिजिटल चलन ( Digital Money ) देखील म्हटले जाते. कारण ही क्रिप्टोकरन्सी फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे. म्हणजेच या क्रिप्टोकरन्सीचा आपण दुसऱ्या चालना प्रमाणे म्हणजेच भारताच्या रुपयाप्रमाणे, अमेरिकेच्या डॉलरप्रमाणे तसेच युरोपच्या युरो सारखे व्यवहारासाठी शारीरिकदृष्ट्या वापर नाही करू शकत.
क्रिप्टोकरन्सी ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे जिचा वापर आपण इंटरनेटच्या माध्यमातून नेहमीच्या साधारण चलनाऐवजी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करू शकतो.
सोप्या शब्दात मांडायचे झाले तर क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल मालमत्ता आहे. ज्याच्यावर सेंट्रल बँक किंवा कोणत्याही इतर आर्थिक संस्थांचे कोणतेच नियंत्रण नसते.
---- हे वाचलंत का ? ---- अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ?
ज्याप्रमाणे की भारतीय चलनाला आरबीआय द्वारे नियंत्रित केले जाते अमेरिकन डॉलरला यूएस सेंट्रल बँकेद्वारे नियंत्रित केले जाते त्याप्रमाणे ह्या क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याच आर्थिक संस्थेला नियुक्त केले गेले नाही.
क्रिप्टोकरन्सीचे प्रकार Types of Cryptocurrency In Marathi
क्रिप्टोकरन्सी हे अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये बिटकॉईन, एथेरियम, लाईटकॉइन, रिप्पल, टिथर, डॉगकॉइन असे आणि यांसारखे दोन हजारांहून ही अधिक क्रिप्टोकरन्सी जगभरात उपलब्ध आहेत. परंतु या सर्व क्रिप्टोकरन्सीमध्ये सर्वात लोकप्रिय झालेली करन्सी म्हणजे बिटकॉईन.
बिटकॉईन म्हणजे काय? Bitcoin Meaning In Marathi
बिटकॉईनचा शोध सतोशी नाकामोटो ( Satoshi Nakamoto ) यांनी २००९ मध्ये लावला. परंतु आजच्या वेळी बिटकॉईनच्या या शोधकर्त्या बद्दल कोणालाही ठावूक नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडून तेच सतोशी नाकामोटो असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. परंतु आजपर्यंत या बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी च्या खऱ्या प्रोग्रामरचा पत्ता लागू शकलेला नाही.
आजच्या काळात अनेक प्रोग्रामर या बिटकॉईन ला अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिटकॉईनची सुरुवात करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे चलन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही तृतीय पक्षाच्या किंवा केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय पाठवणे हा होता. आणि जगभरात यासाठी लागणारे सॉफ्टवेअर्सही तयार करण्यात आले आहेत.
बिटकॉईन ही जगातील सगळ्यात जुनी क्रिप्टोकरन्सी आहे. या बिटकॉईनला जास्तीत जास्त लोकांकडून खरेदी करण्यात येत असल्यामुळे याची किंमत सतत वाढत चालली आहे.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर २०१६ मध्ये एका बिटकॉईनची किंमत ३०,००० च्या आसपास होती परंतु आज २०२१ मध्ये याच बिटकॉईनची किंमत ४० लाखांहूनही अधिक आहे. आणि यामुळेच याची किंमत याच्या मागणीनुसार सतत बदलत असते.
क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे का? Is Cryptocurrency Legal In Marathi
क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे आपण याचा वापर कोणत्या देशात करत आहोत त्यावर अवलंबून असते. म्हणजेच अनेक देशांत याला कायदेशीर परवानगी मिळालेली आहे. तर अनेक देशांत यावर बंदी घालण्यात आली आहे.
जपान, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स इत्यादी यांसारख्या अनेक मोठ्या देशांमध्ये बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी ला सरकारी मान्यता देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे नेपाळ, अल्जेरिया, बांगलादेश, बोलिव्हिया इत्यादी देशांत याला अजून कायदेशीर शासन मान्यता प्राप्त झालेली नाही.
भारतामध्येही २०१८ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यात आली होती. परंतु मार्च २०२० पर्यंत ही बंदी उठवण्यात आली. त्यामुळे आता भारतामध्ये कोणतीही व्यक्ती या क्रिप्टोकरन्सी ची खरेदी विक्री करू शकते.
बिटकॉइनच्या गुंतवणूकीवरील परतावा ROI On Bitcoin in Marathi
जर आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर आपणाला २ ते ३% चा व्याजदर मिळतो. एफडी मध्ये आपणाला ६ ते ८% तर म्युच्युअल फंड मध्ये आपणाला १४ ते १५% इतका व्याजदर मिळतो. परंतु जर आपण बिटकॉइनमध्ये किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली तर यामध्ये आपणाला ६५% हून ही अधिक व्याजदर मिळू शकतो. यावरून आपण क्रिप्टोकरन्सी च्या वाढत्या आलेखाचा अंदाज लावू शकतो.
आपण रातोरात करोडपती होण्याच्या उद्देशाने यात डोळे झाकून गुंतवणुक केली तर यातून आपल्याला नुकसान होऊ शकते. परंतु जर आपणाला यातून खरंच पैसे कमवायचे असतील तर यामध्ये आपण हुशारीने गुंतवणुक करायला हवी.
बिटकॉइन आणि क्रिप्टोकर्न्सीमध्ये गुंतवणूक कशी करावी ? How to Invest in Bitcoin and Cryptocurrencies In Marathi
भारतामध्ये ह्या क्रिप्टोकरन्सीला खरेदी विक्री करण्यासाठी कायदेशीररीत्या परवानगी देण्यात आली असल्यामुळे भारतातही बरेच लोक यामध्ये गुंतवणुक करत असतात. बिटकॉईन मध्ये किंवा अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करावी असा प्रश्न बऱ्याच जणांसमोर असतो.
यामध्ये गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. त्यासाठी अनेक मंच उपलब्ध आहेत. परंतु यासाठी कॉइनस्विच ( CoinSwitch ) हे वापरण्यासाठी सर्वात सोईस्कर आणि सर्वात उत्तम ऍप आहे. हे ऍप अँड्रॉइड आणि आयओएस अश्या दोन्ही प्रकारच्या फोनसाठी उपलब्ध आहे.
यामध्ये आपण १०० हून अधिक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये थेट गुंतवणूक करू शकतो. त्यासाठी आपण अगदी १०० रुपयांपासून देखील सुरुवात करू शकतो.
जेव्हा आपण या ऍप वर साईन अप करतो तेव्हा आपणाला ५० रुपयांचे बिटकॉईन मोफत मिळून जातात. तसेच आपण या ऍप ला आपल्या मित्रांसोबत शेअर केल्यावर आपणाला आणखी ५० रूपयांचे बिटकॉईन मोफत मिळतात.
Check out this website for financial information and investment-related queries SagaCrush.com.
Tags : क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency Meaning, क्रिप्टोकरन्सीचे प्रकार Types of Cryptocurrency In Marathi, बिटकॉईन म्हणजे काय? Bitcoin Meaning In Marathi, what is cryptocurrency in marathi,
informative tips, bring more tips and advices for us.????????
Basic qustion is that why we want to double money without any efforts. this thinking is totally wrong.
Nice information about cryptocurrency. Ready for future
Very good article plz visit my website: http://www.themarathibana.com