Proxy server meaning in marathi सर्व्हर एक असा कॉम्प्युटर असतो ज्यावर इंटरनेट वर उपलब्ध असणारी सर्व प्रकारची माहिती साठवून ठेवली जाते. आपण वेब ब्राउजर वर जी काही माहिती सर्च करत असतो ती सर्व माहिती अशाच एखाद्या सर्व्हर मार्फत आपल्यापर्यंत पोहचत असते. आज आपण अशाच एका सर्व्हर बद्दल माहिती घेणार आहोत जो की इतर सर्व्हर्स पेक्षा एकदम वेगळा आहे.
आपण अनेकवेळा पाहिले असेल की अनेक शाळा-कॉलेजात तसेच विविध प्रकारच्या ऑफिसेस मध्ये ठराविक प्रकारच्या वेबसाइट्स ब्लॉक केल्या जातात. काही वेबसाइट्स वर तर राष्ट्रीय पातळीवर देखील बंदी आणली जाते.
इंटरनेटची थोडी थोडकी माहिती असणाऱ्या अनेक लोकांना अशा बॅन केल्या गेलेल्या वेबसाइट्स ॲक्सेस करता येत नाहीत. पण असेही काही इंटरनेट वापरकर्ते असतात की ज्यांना माहिती असतं की बॅन केल्या गेलेल्या वेबसाइट्स ॲक्सेस कशा करतात?
Blockchain Technology म्हणजे नक्की आहे तरी काय ?
मुळात हा सर्व खेळ एका खास प्रकारच्या सर्व्हरचा असतो ज्याच्या मदतीने आपण कोणत्याही प्रकारच्या वेबसाइट्स कडून माहिती मिळवू शकतो. हे सर्व्हर म्हणजे प्रॉक्सी सर्व्हर proxy server meaning in marathi.
- प्रॉक्सी सर्व्हर म्हणजे काय? Proxy Server Meaning in Marathi
- प्रॉक्सी सर्व्हर कसे काम करते? how proxy server works?
- प्रॉक्सी सर्व्हर का वापरले जाते? why proxy server is used
- प्रॉक्सी सर्व्हर ब्लॉक्ड वेबसाईट कसे ओपन करते? how to open blocked websites by proxy
- प्रॉक्सी सर्व्हर चे फायदे advantages of proxy server
प्रॉक्सी सर्व्हर म्हणजे काय? Proxy Server Meaning in Marathi
प्रॉक्सी सर्व्हर हे आपल्या आणि इंटरनेटच्या मध्ये असणाऱ्या एका पुलाप्रमाने कार्य करते. जे की युजर ला इंटरनेटच्या जगाशी जोडण्याचे काम करते. प्रॉक्सी सर्व्हर एक असा कॉम्पुटर असतो जो की user आणि internet च्या मध्ये getway म्हणजेच मुख्य दरवाजा प्रमाणे कार्य करते.
प्रॉक्सी शब्दाचा अर्थ होतो की प्रतिनिधित्व करणे किंवा दुसऱ्याच्या वतीने कार्य करणे. प्रॉक्सी सर्व्हर हे user च्या वतीने internet ला रिक्वेस्ट पाठवते आणि युजर पर्यंत माहिती पोहचवते.
इंटरनेटवर प्रत्येक कॉम्प्युटरसाठी एक विशिष्ट Internet Protocol Adress म्हणजेच IP address आयपी ऍड्रेस उपलब्ध असतो. ज्याप्रमाणे आपले एखादे कुरिअर आपल्या घराच्या पत्त्याच्या आधारे आपल्या घरापर्यंत पोहचत असते त्याच प्रमाणे आपल्या कॉम्प्युटरच्या आयपी ऍड्रेस च्या आधारे इंटरनेट द्वारे माहिती आपल्या कॉम्प्युटर पर्यंत पोहचत असते.
या ip address वरून इंटरनेट मार्फत आपल्या computer device च्या location चा देखील पत्ता काढला जाऊ शकतो. त्यामुळे अनेक लोक या प्रॉक्सी सर्व्हर चा वापर आपला ip address लपविण्यासाठी करत असतात.
गूगल संबंधीची ही तथ्ये कदाचित तुम्हाला माहिती नसतील.
जेव्हा आपण इंटरनेट चा वापर करण्यासाठी आपल्या browser चा वापर करत असतो तेव्हा आपण त्या वेबसाईट सोबत थेट जोडले जातो. परंतु हे प्रॉक्सी सर्व्हर आपल्या वतीने इतर ip address चा वापर करून त्या त्या वेबसाइट्स सोबत संवाद करतात आणि आपल्यापर्यंत माहिती पोहचवतात जेणेकरून आपल्या device चा ip address लपला जातो.
याचा अर्थ असा होतो की आपण website ला आपल्या computer system वर किंवा इतर device वर बघू तर शकतो परंतू त्या वेबसाईटच्या सर्व्हर सोबत जोडली जाणारी सिस्टिम वेगळीच असते. त्या सिस्टिम ला प्रॉक्सी सर्व्हर proxy server म्हटले जाते. या सर्व्हर च्या मदतीने आपण कोणत्याही वेबसाईटला थेट आपल्या computer वरून थेट ॲक्सेस न करता proxy server द्वारा ॲक्सेस करू शकतो.
प्रॉक्सी सर्व्हर कसे काम करते? how proxy server works?
Proxy server हे युजर आणि वेबसाईट च्या मध्ये एक माध्यम म्हणून काम करते.
जेव्हा user ला एखादी माहिती हवी असते तर तो वेब ब्राउजर वर कोणत्याही web page किंवा website ला search करतो.
user ची ही रिक्वेस्ट proxy server द्वारा वेबसाईट च्या सर्व्हर पर्यंत पोहचली जाते.
आणि त्यांनतर website server हे proxy server कडून आलेल्या रिक्वेस्ट च्या आधारावर हव्या त्या content किंवा files प्रॉक्सी सर्व्हर कडे पाठवते.
त्यांनतर प्रॉक्सी सर्व्हर मार्फत ती माहिती यूजरच्या डिव्हाईस पर्यंत पाठवली जाते.
म्हणजेच युजर जेव्हा कधी रिक्वेस्ट पाठवत असतो तेव्हा ती रिक्वेस्ट थेट वेबसाईट च्या सर्व्हर वर जात नाही उलट त्या आधी ती proxy server वर जाते आणि मग तिथून ती रिक्वेस्ट proxy server मार्फत main website server पर्यंत जाते. अशाप्रकारे वेब सर्व्हर पण थेट युजरला माहिती पाठवण्याऐवजी पहिल्यांदा प्रॉक्सी सर्व्हर ला पाठवते.अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर युजरला इंटरनेट वरून अप्रत्यक्षरीत्या माहिती मिळत असते.
प्रॉक्सी सर्व्हर का वापरले जाते? why proxy server is used
प्रामुख्याने proxy server चा उपयोग हा ब्लॉक केल्या गेलेल्या वेबसाइट्स ॲक्सेस करण्यासाठी केला जातो. सोबतच हे proxy servers युजरला सुरक्षे संबंधीच्या काही सुविधाही उपलब्ध करून देत असतात. सामान्यपणे proxy server चे काम युजरची ओळख गुप्त ठेवून त्याने मागितलेली माहिती त्याला उपलब्ध करून देणे हे आहे.
प्रत्येक इंटरनेटसोबत जोडल्या गेलेल्या कॉम्प्युटरचा आपला एक unique IP address असतो. ज्या मार्फत इंटरनेट ला प्रत्येक कॉम्प्युटरचे लोकेशन समजत असते जेणेकरून योग्य डेटा हा त्या त्या कॉम्प्युटर पर्यंत पोहचवला जाऊ शकतो.
अफिलीएट मार्केटिंग मधून घरबसल्या पैसे कसे कमवावे?
proxy server देखील एक प्रकारचा कॉम्प्युटरच असतो. ज्याचा स्वतःचा देखील एक unique IP address असतो. तर जेव्हा युजरला इंटरनेट वरून कोणती माहिती हवी असते तर तेव्हा युजर चा कॉम्पुटर सर्वप्रथम proxy server ला विनंती पाठवतो. त्यानंतर proxy server युजरच्या विनंतीला त्या वेबसाईट कडे पाठवतो जिथे युजरला हवी असणारी माहिती स्टोअर असते.
युजर चा कॉम्प्युटर आणि वेबसाईट सर्व्हर यांच्यामध्ये सामान्यपणे कोणत्याही प्रकारचा संवाद होत नाही त्यामुळे त्या server ला युजरच्या IP address चा पत्ता नाही लागत. यामुळे युजरच्या सिस्टिमची ओळख लपली जाते. अशाप्रकारे प्रॉक्सी सर्व्हर proxy server सिक्युरिटी सुविधा प्रदान करत असते.
प्रॉक्सी सर्व्हर ब्लॉक्ड वेबसाईट कसे ओपन करते? how to open blocked websites by proxy
काही देशांत किंवा काही सरकारी संस्थांमध्ये काही प्रकारच्या वेबसाइट्स ह्या ब्लॉक केल्या जातात. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण आपल्या सिस्टिम मध्ये त्या वेबसाइट्स ओपन करून नाही पाहू शकत. परंतु जर आपण proxy server चा वापर करून त्या ब्लॉक्ड वेबसाईट्स ओपन करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या वेबसाइट्स वरील कंटेंट सहजरीत्या पाहू शकतो.
जेव्हा आपण कोणत्याही ब्लॉक्ड वेबसाईट ला एखाद्या proxy server च्या मदतीने ॲक्सेस करत असतो तेव्हा इंटरनेटवर आपला IP address लपविला जातो आणि त्याच्या जागी एक असा आयपी ऍड्रेस दर्शिवला जातो ज्यावर ती वेबसाईट ब्लॉक नसेल. अशाप्रकारे आपण आपल्या डिव्हाईस वरून ब्लॉक्ड वेबसाईट्स ॲक्सेस करू शकतो.
जर आपल्याला एखादी ब्लॉक्ड वेबसाईट ॲक्सेस करायची असेल तर आपणाला आपल्या कॉम्प्युटर ब्राउजर मध्ये जाऊन free proxy servers list असे टाईप करावे लागेल. त्यानंतर आपणाला अशा हजारो वेबसाइट्स मिळतील जिथून आपणाला अनेक free proxy servers ची लिस्ट मिळेल. त्यापैकी एखादे proxy server सिलेक्ट करून त्याला ओपन करून त्याच्या search box मध्ये blocked website चे url टाईप करुन enter वर क्लिक करताच आपण search केलेली वेबसाईट ओपन होईल.
प्रॉक्सी सर्व्हर चे फायदे advantages of proxy server
proxy server चा वापर करत असताना आपणाला त्याचे अनेक फायदे पाहायला मिळतात.
वेबसाईटचा लोड टाईम कमी होतो improve site speed by caching files
proxy server चा caching साठी उपयोग केला जातो. म्हणजेच जर एखादा युजर एखादी माहिती proxy server मार्फत इंटरनेट वरून मिळवत असतो. तर proxy server त्या माहितीला जतन करून ठेवत असते. जेणेकरून जर एखादा दुसरा युजर जर त्याच माहितीला ॲक्सेस करत असेल तर सर्व्हर आपल्या जतन केलेल्या महितीतूनच त्या दुसऱ्या युजरला ती माहिती देत असते. यामुळे एक फायदा होतो तो म्हणजे माहिती ॲक्सेस करण्याचा स्पीड वाढला जातो.
इंटरनेटवर आपली ओळख लपविते Hide user’s identity on internet
proxy server हे IP address ला इंटरनेट पासून लपवत असते. यामुळे युजरची ओळख देखील इंटरनेटवरून लपवली जाते. जर आपण एखाद्या website ला थेट आपल्या कॉम्प्यूटरवरून ॲक्सेस केले तर आपला IP address आणि आणखी काही नेटवर्क संबंधीची माहिती वेब सर्व्हर पर्यंत पोहचत असते.
परंतु प्रॉक्सी सर्व्हर च्या मदतीने इंटरनेटवर जी काही माहिती जाते ती proxy server ची असते ज्यामुळे युजरची ID आणि network दोन्हीही सुरक्षीत राहतात. यामुळे आपल्या माहितीची चोरी करणाऱ्या हॅकर्स ची देखील भीती राहत नाही.
बंदी घालण्यात आलेल्या वेबसाइट्स ॲक्सेस करता येतात Access Geo-Blocked or Restricted websites
proxy server च्या मदतीने कोणत्याही ब्लॉक वेबसाईट ला ॲक्सेस केले जाऊ शकते. तसेच कोणत्याही वेबसाईट ला ब्लॉक देखील केले जाऊ शकते. जर युजर कोणत्या वेबसाईटचा वापर करू इच्छित नसेल तर तो त्या वेबसाईट ला प्रॉक्सी सर्व्हर द्वारा ब्लॉक करू शकतो.
सुरक्षा प्रदान केली जाते Improve security
कोणत्याही संस्थेला आपले सर्व्हर हॅक होण्याचा तसेच data चोरी होण्याचा कायम धोका असतो. अशावेळी प्रॉक्सी सर्व्हर बऱ्याच प्रमाणात सुरक्षा प्रदान करण्याचे काम करत असते. कोणतीही संस्था proxy server च्या मदतीने त्यांच्या client आणि server च्या मध्ये होणाऱ्या संवादाला encrypt करू शकते. जेणेकरून कोणीही third party त्या माहितीला ॲक्सेस करू शकणार नाही.
हॅकर्स आपल्या प्रॉक्सी सर्व्हर्स पर्यंत तर पोहचू शकतात परंतु आपल्या मूळ सर्व्हर जिथे आपला सर्व data स्टोअर असतो तिथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांना खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे proxy servers आपल्याला हॅकर्स पासून देखील सुरक्षित ठेवण्याचे काम करते.
Tags : Proxy Server Meaning in Marathi, प्रॉक्सी सर्व्हर म्हणजे काय, proxy server lists, advantages of proxy server