कोरोना वर मराठी निबंध Corona Virus Essay In Marathi

Corona Virus Essay In Marathi चीन मधून सुरुवात झालेला आणि नंतर संपूर्ण जगभर पसरलेला कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड – १९ हा एक संसर्गजन्य आजार आहे. या कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वप्रथम डिसेंबर २०१९ मध्ये चीन मधल्या वुहान या शहरात आढळून आला होता. या आजाराचा संसर्ग एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लवकर होत असतो.

कोरोनाची काही प्रमुख लक्षणे

Corona Virus Essay In Marathi image
कोरोना एक महामारी निबंध मराठी : Corona Virus Essay In Marathi

कोरोना वर मराठी निबंध Corona Virus Essay In Marathi

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO या संघटनेने कोरोना व्हायरस मुळे होणाऱ्या या रोगाच्या प्रादुर्भावाला जागतिक महामारी म्हणुन घोषित केले आहे. या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी याची लक्षणे दिसू लागतात. कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीला सर्दी, ताप येणे, श्वास घेण्यास अडथळा येणे तसेच घशात खवखव होणे अशी लक्षणे जाणवू लागतात.

l——-/

कोरोनाची जी दुसरी लाट आली आहे त्यातील संसर्गाची लक्षणे ही आधीच्या कोरोना लक्षणांपेक्षा अधिक वेगळी आहेत. जसे की पोटात दुखणे, थकवा जाणवणे, अतिसार, सतत डोके दुखणे तसेच उलट्या किंवा मळमळ होणे अशी काही लक्षणे कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमध्ये आढळून येतात.

कोरोनाला हटवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती अशी वाढवा

कोरोना व्हायरस हा वेगवेगळ्या लोकांवर त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्ती प्रमाणे वेगवेगळे परिणाम दाखवत असतो. गंभीर स्वरूपाच्या कोरोना संसर्गामुळे किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो. यामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो. आधीपासून आजारी असणारे लोक तसेच मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या आणि कमकुवत रोगप्रतकारकशक्ती असणाऱ्या लोकांना या कोरोनाचा अधिक धोका असतो.

कोरोना व्हायरस संक्रमणापासून वाचण्यासाठी आपणाला अनेक प्रकारे काळजी घेता येते. त्यामध्ये आपण सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे म्हणजेच सोशल डिस्टंसींग पाळणे, बाहेर जाताना नाका तोंडावर मास्क लावणे, हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुणे, बाहेर असताना सॅनिटायझरचा वापर करणे, आजारी व्यक्तींपासून अंतर राखून ठेवणे, आपल्या स्वास्थ्यावर लक्ष देणे, रोगप्रतिकरकशक्ती वाढवणे, कोरोना लस घेणे इत्यादी उपायांचा समावेश होतो.

कोरोना महामारीमुळे सततचे सगळं जग एक प्रकारे थांबल्यासारखे वाटत आहे. सगळे देश आपापल्या परीने कोरोनाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन लावणे, विविध प्रकारचे निर्बंध लावणे, लसीकरण मोहीम सुरू करणे, कोरोना चाचणी केंद्र उभारणे अशा अनेक उपाययोजना करत आहे.

वजन कमी करण्यासाठी फक्त ह्या ७ टिप्स वापरा

डॉक्टर, नर्सेस, पोलिस अधिकारी तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील मंडळी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी झटत आहेत त्यामुळे आपण देखील या परिस्थितीला न डगमगता हवी ती काळजी घेऊन आपला आत्मविश्र्वास वाढवला पाहिजे जेणेकरून आपणाला या परिस्थितीशी सामना करण्यासाठी स्फूर्ती मिळेल.

कोरोना ही आपली एक प्रकारची परीक्षा आहे ज्यामध्ये आपणाला कोणत्याही परिस्थितीत यश हे मिळवायचंच आहे. त्यासाठी आपणाला घरात राहून कोरोनाला आपल्या व आपल्या परिवारापासून दूर ठेवायचे आहे. सततच्या होणाऱ्या लॉकडाऊन मुळे गरीब जनतेचे हाल होतात त्यांना मदतीचा हात देऊन मानवता जपायची आहे. आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे !

कोरोनापासून बचाव कसा करावा? stay safe from covid/corona virus in marathi

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे व स्वतः देखील स्वच्छता राखणे फार महत्वाचे आहे. पुढील गोष्टी लक्षात ठेवा आणि संक्रमणा पासून स्वत:चे आणि स्वतःच्या परिवाराचे रक्षण करा.

१. मास्क वापरणे. - Wearing a mask.
२. कोरोना संक्रमित भागात जाणे टाळणे. - Stay away from covid infected places.
३. सोशल डिस्टंसींग चे पालन करणे. - Maintain social distancing.
४. कोणत्याही अज्ञात वस्तूला स्पर्श न करणे. - Avoid touching unknown surfaces.
५. साबण किंवा हँडवॉश ने हात स्वच्छ ठेवणे. - Washing hands regularly with soap/handwash.
६. सॅनिटायझर चा वापर करणे. - Use hand sanitizer regularly.
७. शक्य होईल तेवढे घरीच राहणे फार महत्त्वाचे काम असल्यास बाहेर जाणे. - Stay at home.
८. बाहेरचे खाणे पिणे टाळणे. - Avoid food from outside
९. पौष्टिक आणि योग्य आहार घेणे. - Eat healthy food.
१०. घरातील किंवा इतर कोणत्याही आजारी व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवणे. - Maintain distance from ill and sick people.
११. खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा टिशू पेपर वापरणे. - Use handkerchief or tissue for coughing or sneezing

या सर्व गोष्टींची काळजी घेत कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळता येतो. या व्यतिरिक्त, जर आपणाला कोरोना व्हायरसची लक्षणे दिसली तर नक्कीच आपण तपासणी करुन घ्यावी आणि डॉक्टरांच्या सूचनेनुसार घरी खबरदारी घ्यावी.


10 lines on Corona Virus Essay In Marathi
10 lines on Corona Virus Essay In Marathi

कोरोना वर १० ओळीत निबंध 10 lines on coronavirus in marathi

१. कोरोना व्हायरस ज्याला कोविड – १९ देखील म्हटले जाते हा एक संसर्गजन्य रोग आहे.

२. कोरोना विषाणू जरी आकाराने लहान असला तरी त्याचे मानवी शरीरावरील दुष्परिणाम खूप मोठे आहेत.

३. कोरोना सर्वात आधी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये चीन देशातील वुहान या शहरात आढळून आला.

४. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास अडथळा येणे ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत.

५. मार्च २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने WHO कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले.

६. कोरोना विषाणूंच्या संक्रमणाची गती खूप जास्त असून अत्यंत वेगाने हा व्हायरस पसरतो.

७. आपण मास्क घालून, सोशल डिस्टंसींग पाळून तसेच वारंवार हात धुवून कोरोनाचा धोका कमी करू शकतो.

८. कोविड-१९ चा अर्थ : को म्हणजे कोरोना, वि म्हणजे व्हायरस आणि ड म्हणजे डिसिझ आणि १९ म्हणजे २०१९ असा आहे.

९. आपले सरकार, आरोग्य कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी यांचे आपण आभार मानले पाहिजे जे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपणाला वाचवण्यासाठी काम करत आहेत.

१०. कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीत आपली सकारात्मक मानसिकता असणे अत्यंत आवश्यक आहे.


Tags : corona virus essay in marathi,10 lines on coronavirus in marathi,कोरोना वर मराठी निबंध,कोरोना वर १० ओळीत निबंध, कोविड-१९, कोरोना व्हायरस, कोरोना वायरस पर निबंध

5 thoughts on “कोरोना वर मराठी निबंध Corona Virus Essay In Marathi”

Leave a Comment