Corona Vaccine Registration Online फक्त महाराष्ट्र नव्हे तर सगळा भारत देश कोरोनाच्या भयंकर संकटातून जात आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना आता कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू होत आहे.
आतापर्यंत ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना लस घेण्यास परवानगी होती. परंतु आता १८ वर्षा पुढील सर्वांना ही कोरोना लस घेता येणार आहे. त्यासाठीची अधिकृत नोंदणी येत्या २८ एप्रिल पासून सुरू होत आहे आणि प्रत्यक्ष लसीकरण हे १ मे पासून सर्वत्र सुरू करण्यात येणार आहे.
या लसीकरणासाठीची नावनोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आपणाला कोविड १९ लसीकरणासाठी आवश्यक असणारी नावनोंदणी करण्यासाठी २ पर्याय आहेत. एकतर आपण CoWIN.gov.in या सरकारी पोर्टल वर जाऊन लसी साठी नाव नोंदवू शकतो किंवा आपल्या फोन मध्ये आरोग्य सेतू हे ॲप डाउनलोड करून त्यावरून देखील आपण नाव नोंदवू शकतो.
कोरोनाला हटवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती अशी वाढवा.
वजन कमी करण्यासाठी ७ फायद्याच्या टिप्स
कोरोना लस नोंदणी कशी कराल? Covid-19 Corona Vaccine Registration Online
कोरोना लस नोंदणी करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या दोन्ही पर्यायांचा वापर कसा करावा याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. कोविड 19 लस ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया स्टेप बाय स्टेप खाली दिलेली आहे. त्या प्रमाणे आपण आपली अपॉईंटमेंट ठरवून घेऊ शकतो.
कोविन पोर्टलवरून नोंदणी CoWIN Portal Registration
१. सर्वप्रथम गूगल मध्ये जाऊन Cowin.gov.in या सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे.
२. त्या नंतर आपला मोबाईल नंबर टाकून संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करणे.
३. मोबाइल नंबर देऊन स्वतःचे नाव नोंदवत असताना एक ओ.टी.पी. दिला जाईल तो ओ.टी.पी वापरून नाव रजिस्टर करणे.
४. ओ.टी.पी सत्यापित verify करून झाल्यावर गरजेचा सर्व तपशील भरावा. तपशील भरत असताना आपणाला आपला फोटो असलेले एक अधिकृत ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे.
५. जेव्हा पूर्ण तपशील भरून होईल तेव्हा खाली दिलेल्या “रजिस्टर” या बटणावर क्लिक करावे.
६. यानंतर पुढील पानावर आपणाला अपल्या परिसराचा पिन कोड नंबर द्यावा लागेल. पिन कोड टाकल्यावर त्या परिसरातील जेवढे कोविड लसीकरण केंद्र उपलब्ध असतील सर्वांचा तपशील आपल्या समोर येईल. त्यापैकी आपण सोईनुसर आपल्या जवळचे लसीकरण केंद्र निवडून लसीकरणाची तारीख आणि वेळ ठरवून घ्यावी.
जर आपण ठरवलेल्या तारखेला किंवा वेळेला तिथे उपस्थित नाही राहू शकलो तर आपण त्या तारीख किंवा वेळेत येथून बदल करू शकतो.
७. “Add More” या दिलेल्या बटणावर क्लिक करून एक नागरिक या मोबाइल नंबर सोबत आणखी तीन लोकांना जोडू शकेल. त्यामुळे घरातील प्रत्येकासाठी वैयक्तिक नोंदणी करण्याची गरज नाही.
८. सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपणाला “Book” या बटणावर क्लिक करावे लागेल.
९. बुक केल्यानंतर आपणाला येथे रजिस्टर केलेल्या फोन नंबरवर एक एस.एम.एस येईल जो आपणाला कोरोना लसीकरण केंद्रावर दाखवून लस घेता येऊ शकेल.
अशा पद्धतीने आपण सरकारच्या CoWIN.gov.in या कोविड लसीकरण पोर्टल वर जाऊन लसीकरणासाठी आपली नावनोंदणी करू शकतो.
आरोग्य सेतू ॲप मधून कशी नोंदणी करावी? Arogya Setu app Covid Vaccine
१. प्रथम आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या आरोग्य सेतू ॲप मध्ये जाऊन त्यातील CoWIN या पर्यायाच्या चिन्हावर क्लिक करावे.
२. CoWIN या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तिथे खाली Vaccination Information, Vaccination Login/Register, Vaccination Certificate आणि Vaccination Dashboard असे चार पर्याय दिसतील.
३. यांपैकी Vaccination Login/Register या पर्यायावर क्लिक करून Registar Now या पर्यायावर क्लिक करावे.
४. आपला मोबाईल नंबर देऊन आलेला ओ.टी.पी देऊन Proceed to Verify या पर्यायावर क्लिक करावे.
५. फोन नंबर सत्यापित Verify झाल्यानंतर आपला फोटो असणारे आपले अधिकृत ओळखपत्र अपलोड करावे. उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र इत्यादी.
६. त्यानंतर खाली दिलेला तपशील भरून घ्यावा उदा. वय, लिंग, जन्म दिनांक इत्यादी.
७. यामध्ये देखील आपण एका फोन क्रमांकावर ४ सदस्यांची कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करू शकतो.
आपण राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या कोरोनाई लसीकरण साईट्स देखील तपासून पाहू शकतो.
८. यानंतर आपणाला तारीख आणि उपलब्धता दाखविली जाईल त्यानंतर आपण “Book” या पर्यायावर क्लिक करून आपली नोंदणी यशस्वी करू शकतो.
९. यशस्वी नोंदणी झाल्यानंतर आपणाला नोंदणी केलेल्या फोनवर एक एस.एम.एस. येईल जो आपण कोविड लसीकरण केंद्रावर दाखवून लस घेऊ शकतो.
अशाप्रकारे आपण आरोग्य सेतू या सरकारच्या ॲप द्वारे कोविड वॅक्सीन नोंदणी करू शकतो.
Corona Vaccine Registration Online लसीकरण नोंदणी ही २८ एप्रिल २०२१ पासून तर लसीकरण मोहीम ही १ मे २०२१ पासून सुरू होत आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या घरातील सदस्यांसाठी नावनोंदणी करून घेऊन कोविड १९ लस टोचून घेणे ही आपली जबाबदारी आहे.
कोरोना पासून भारताला मुक्त करून पुन्हा एकदा आधीचा हसताखेळता भारत The Better India बनवूया.
Tags : कोविड १९ लस,कोविड वॅक्सीन नोंदणी,आरोग्य सेतू, कोरोना लस, कोविड लसीकरण, कोवीन पोर्टल,कोरोना लस नोंदणी कशी कराल,cowin.gov.in registration in marathi,covid vaccine registration in marathi,Corona Vaccine Registration Online,Arogya Setu app Covid Vaccine