आयपीएल विषयी थोडी माहिती IPL Information in Marathi

Live Cricket Score Board

आयपीएल विषयी थोडी माहिती IPL Information in Marathi इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही एक अशी टी २० क्रिकेट स्पर्धा आहे जी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात खूप लोकप्रिय झालेली आहे. आपल्या भारत देशात तर हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. याशिवाय आयपीएल ने वेळोवेळी अनेक प्रतिभावान खेळाडूंना त्यांचा टॅलेंट जगासमोर दाखवण्याची संधी दिली आहे.

आयपीएल विषयी थोडी माहिती IPL Information in Marathi :

आयपीएल विषयी थोडी माहिती IPL Information in Marathi ipl marathi status
आयपीएल विषयी थोडी माहिती IPL Information in Marathi

आयपीएल संबंधी असे काही विलक्षण आणि मनोरंजक तथ्य आहेत की जी अजुनही बऱ्याच लोकांना माहिती नाहीत. आज आपण अशीच काही तथ्ये पाहूया जी कदाचित याआधी तुम्हाला माहिती नसतील.

पहिली ऑरेंज आणि पर्पल कॅप first orange and purple cap in ipl :

जर आपण आयपीएल चे फॅन असाल तर आपणाला ही गोष्ट माहिती असेल की आयपीएल च्या पूर्ण हंगामात सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूस आयपीएलच्या शेवटी ऑरेंज कॅप आणि आयपीएलच्या एका सीझन मध्ये सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या खेळाडूस पर्पल कॅप दिली जाते. परंतु आपणाला माहिती आहे का की या दोन्ही कॅप्स सगळ्यात आधी कोणत्या खेळाडूंनी जिंकल्या होत्या ?

सगळ्यात पहिल्यांदा ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शॉन मार्श होता. ज्याने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात किंग्ज एलेवेन पंजाब या संघाकडून पूर्ण सीझन मध्ये तब्बल ६१६ धावा काढल्या होत्या.

सर्वप्रथम पर्पल कॅप जिंकणारा खेळाडू होता पाकिस्तानचा गोलंदाज सोहेल तन्वीर. ज्याने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळून त्या पूर्ण सीझन मध्ये एकूण २२ विकेट्स घेतल्या होत्या.

स्टार स्पोर्ट्स आणि बीसीसीआय मधील व्यवहार star sports bcci deal :

जर आपण आयपीएल मोबाईल किंवा टीव्ही वर पहात असाल तर आपणाला ठावूक असेल की आपणाला गेले काही वर्षे आयपीएलचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स या चॅनलवर पाहायला मिळते. परंतु आपणाला हे माहिती आहे का की आयपीएल सामन्यांना स्टार स्पोर्ट्स star sports चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपित करण्यासाठी या चॅनल ने किती पैसे मोजले असतील ?

स्टार स्पोर्ट्स या चॅनलने २०२२ पर्यंत आपल्या चॅनेलवर आयपीएल लाईव्ह प्रक्षेपित करण्यासाठी बीसीसीआई BCCI सोबत १६,३४६ करोड रुपयांचा व्यवहार केला आहे. त्यामुळे आता २०२२ पर्यंत आयपीएल चे सर्व डिजिटल हक्क स्टार स्पोर्ट्स या वाहिनी कडे असणार आहेत.

आयपीएल पंचांचे वेतन ipl umpire salary :

आंतररष्ट्रीय सामने असो किंवा टी २० सामने प्रत्येक सामन्यामध्ये ताळमेळ राखण्याचे काम हे त्या सामन्याचे पंच म्हणजेच अंपायर करत असतात. पण आपणाला माहिती आहे का की आयपीएल सामन्या दरम्यान उपस्थित असणारे फील्ड अंपायरचे मानधन IPL umpire salery किती असते ?

ipl umpire salary
ipl umpire salary : आयपीएल विषयी थोडी माहिती IPL Information in Marathi

वेगवेगळ्या दर्जाच्या पंचांचे वेगवेगळे मानधन असते. आणि आयपीएल मध्ये एकूण तीन प्रकारचे अंपायर उपस्थित असतात. त्यांपैकी पहिल्या दर्जाच्या अंपयारला एका सामन्याचे २ ते ३ लाख रुपये मिळतात. दुसऱ्या दर्जाच्या अंपायारला एका सामन्याचे सुमारे दीड ते दोन लाख रुपये मिळत असतात. तर तिसऱ्या दर्जाच्या अंपायरला एका मॅचचे जवळजवळ एक लाख रुपये मिळत असतात.

पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये का खेळत नाहीत? why pakistani cricketers banned in ipl :

जर आपण आयपीएल सुरुवातीपासून पाहत असाल तर आपण एक गोष्ट नक्कीच पहिली असेल की आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूंनी सुद्धा सहभाग घेतला होता. परंतु त्या नंतर कोणत्याच हंगामात पाकिस्तानी खेळाडूंनी भाग घेतला नाही. पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीत why pakistani cricketers banned in ipl याचे काय कारण असेल ?

आयपीएल संघ मालक पैसा कसा मिळवतात ?

याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडत चाललेले संबंध. या दोन्ही देशांतील संबंध कायमचं तणावपूर्ण असतात. याशिवाय त्यांचे आयपीएल न खेळण्यामागचे अजून एक कारण म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच PCB द्वारा पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएल खेळण्यासाठी लावण्यात आलेला निर्बंध देखील आहे. एवढेच नाही तर भारत सरकारने देखील पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएल मध्ये खेळण्यासाठी निर्बंध घातले आहेत.

आयपीएल ट्रॉफी वरील शब्द words on IPL trophy :

आयपीएल सामन्यांमध्ये एकूण आठ संघ विजयी होण्यासाठी आणि ती चमकदार आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी खेळत असतात. परंतु आपणाला माहिती आहे का की आयपीएल ट्रॉफीवर काही असे संस्कृत भाषेत शब्द लिहलेले आहेत जे दुसऱ्या कोणत्याच प्रकारच्या क्रिकेट ट्रॉफीवर लिहलेले नाहीत.

यत्र प्रतिभा अवसरं प्राप्नोति:

या संस्कृत वाक्याचा अर्थ असा आहे की जेथे प्रतिभा अवसर म्हणजेच संधी प्राप्त करते. आणि या ओळीप्रमाणे खरंच आयपीएलने आतापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली आहे.

आरसीबी संघ हिरव्या रंगाची जर्सी का घालतो? why rcb wear green jersey :

आयपीएल मध्ये प्रत्येक संघाच्या जर्सीचा एक वेगळा रंग असतो. जसे की चेन्नई सुपर किंग्जच्या Chennai super kings CSK जर्सीचा रंग पिवळा आहे तर मुंबई इंडियन्स Mumbai indians mI संघाच्या जर्सीचा रंग निळा आहे. परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा संघ प्रयेक हंगामात एका सामन्यासाठी आपल्या लाल रंगाची जर्सी सोडून हिरव्या रंगाची जर्सी why rcb wear green jersey परिधान करत असते.

rcb in green jersey virat kohli yajuvendra chahal image
why rcb wear green jersey : आयपीएल विषयी थोडी माहिती IPL Information in Marathi

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal challengers banglore RCB हा संघ हिरव्या रंगाची जर्सी पर्यावरण संरक्षणाचे प्रतीक म्हणून परिधान करत असतो. तसेच ज्या दिवस ते हिरवी जर्सी घालतात तेव्हा त्यांच्या जर्सीवर मागच्या बाजूला त्यांच्या नावाऐवजी त्यांच्या ट्विटर हँडल्स चे नाव लिहलेले असते.

आयपीएल ट्रॉफी Ipl trophy :

हे तर आपणा सर्वांना माहिती आहे की आयपीएल फायनल मध्ये जिंकणाऱ्या संघाला आयपीएल ट्रॉफी मिळते. परंतु आपणाला माहिती आहे का की फायनलच्या दिवशी ओरिजनल ट्रॉफी सोबतच एक नकली ट्रॉफी मैदानात ठेवलेली असते.

अफिलिएट मार्केटींग करून घरबसल्या कमवा हजारो रुपये

जेव्हा कोणता आयपीएल संघ फायनल जिंकतो तेव्हा त्या संघाचा कॅप्टन जी ट्रॉफी बीसीसीआय च्या चैरमन कडून स्वीकारण्यासाठी जातो ती ट्रॉफी एकदम खरी असते परंतु ज्या ट्रॉफीला विजेत्या संघाचे खेळाडू हातात घेऊन सेलिब्रेट करत असतात ती ट्रॉफी नकली असते. ओरिजनल ट्रॉफी ipl trophy वर कोणत्याही प्रकारचा स्क्रॅच येऊ नये म्हणून असे केले जाते.

आयपीएल मधील पहिला विकेट First wicket in IPL :

काय आपणाला माहिती अहेका की आयपीएल सामन्यांतील सगळ्यात पहिला विकेट first wicket in ipl कोणत्या खेळाडूने घेतला होता ?

आयपीएल समन्यांमधील सगळ्यात पहिला विकेट जहीर खानने घेतला होता. आणि हा विकेट होता तो म्हणजे हल्ली My11Circle या ऍप च्या प्रत्येक जाहिरातीत झळकणारे दादा म्हणजेच आपले सौरव गांगुली यांचा.

आयपीएल ट्रॉफीची किंमत IPL trophy price :

दरवर्षी एकच नशीबवान संघ आयपीएल फायनलमध्ये विजयी होत असतो आणि ती शानदार आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे करत असतो. परंतु आपणाला माहिती आहेका की या आयपीएल ट्रॉफीची किंमत ipl trophy price किती असते ?

ipl trophy image
IPL trophy price : आयपीएल विषयी थोडी माहिती IPL Information in Marathi

या आयपीएल ट्रॉफीची किंमत बीसीसीआय ने कधी उघडपणे जाहीर केली नसली तरी काही तज्ज्ञांच्या मते या ट्रॉफीची किंमत साडेचार ते साडेपाच करोड इतकी असते.

आयपीएल लाईव्ह प्रक्षेपण एडिटिंग IPL live match editing :

जेव्हा आपण आयपीएलचे सामने टीव्हीवर लाईव्ह पाहत असतो तेव्हा आपल्या मनात एकदातरी हा प्रश्न येतो की आयपीएलच्या लाईव्ह सामन्यादरम्यान लगेचच एवढी चांगली व्हिडिओ एडिटिंग कशी केली जाते.

खरं पहायला गेलं की जे आयपीएल सामने आपल्याला लाईव्ह दाखवले जातात ते पूर्णपणे लाईव्ह नसतात. जे सामने आपणाला टीव्हीवर लाईव्ह दाखवले जातात ते काही मिनिटे मागे असतात आणि याच काही मिनिटांत एडिटिंग टीम आयपीएल मॅच एवढ्या उत्तम प्रकारे एडिट करत असतात.

त्यांच्या एडिटिंग टीममध्ये एक दोघे नाही तर अनेक एडिटिंग प्रोफेशनल आणि पूर्ण प्रशिक्षित एडिटर्स असतात. शिवाय त्यांच्याकडे अत्यंत महागडे आणि आधुनिक दर्जाजे एडिटिंग सॉफ्टवेअर्स आणि उपकरणे ऊपलब्ध असतात.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत व्हॉट्सॲप किंवा फेसबुक वर नक्की शेअर करा..


Tags : ipl umpire salary, IPL trophy price,first wicket in IPL,,ipl trophy,why rcb wear green jersey,why pakistani cricketers banned in ipl,star sports bcci deal,first orange cap and purple cap, live cricket score board

1 thought on “आयपीएल विषयी थोडी माहिती IPL Information in Marathi”

Leave a Comment