डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi महामानव डॉ. भीमराव आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशच्या महू या छोट्याश्या गावी झाला. यांना बाबासाहेब या नावानेही ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ होते. त्यांचे वडील हे ब्रिटिश भारतीय सेनेत एक सुभेदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई सकपाळ होते.

त्या काळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतील असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला. हे असताना देखील बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होते. ते एक प्रतिभावान विद्यार्थी होते. त्यांनी पुढे कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.

भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. देशातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. दलित आणि मागास प्रवर्गातील लोकांच्या मानवी हक्कांसाठी ते सतत लढत राहिले. त्यांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर निबंध माहिती | Dr Babasaheb Ambedkar Information in Marathihi
डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती | Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखले जाणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे आधुनिक भारताचे आणि भारताच्या संविधानाचे संस्थापक मानले जातात. ते प्रत्येक भारतीय व्यक्ती साठी एक आदर्श आहेत. अनेक सामाजिक आणि आर्थिक अडचणींना तोंड देत आणि त्यांच्यावर मात करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर मूर्ती Amazon वरून अताच खरेदी करा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर मूर्ती Amazon वरून अताच खरेदी करा..

निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर

आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना जातीय भेदभाव अशा अनेक गोष्टींना सहन करावे लागले. परंतु नंतरच्या काळात त्यांनी आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी जोरदार संघर्ष केला आणि अशाच अनेक जातीवाद आणि भेदभावाचा शिकार झालेल्या लोकांचा ते आवाज बनले. त्या काळी कमी लेखल्या जाणाऱ्या आणि समाजापासून वंचित असलेल्या लोकांसाठी संघर्ष केला. त्यांनी महिलांसाठी देखील आवाज उठवला.

का शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते ?

बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य आणि कमी समजल्या जाणाऱ्या जातीच्या लोकांचे नेते होते. ते शोषित लोकांचे कैवारी होते. ते जाती आणि धार्मिक मर्यादांच्या बंधनातून समानतेच्या मुक्तीसाठी सतत प्रयत्न करत राहिले. ते स्वतःला आधुनिक भारताचे नागरिक मानत असत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. ते शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजात जे मागास लोक आहेत त्यांना सुधरविण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी समाजातील मागास आणि अस्पृश्य जातिजमातीतील लोकांना स्वतः शिक्षण घेण्यासाठी आणि समाजात घडत असलेल्या वाईट चालिरीतींचा, गोष्टींचा विरोध करण्यासाठी प्रोत्साहित केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एक न्यायवादी, राजनीतीज्ञ, अर्थशास्त्री, मानवतावादी, लेखक होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्ती आणि आपल्या देशाचे खरे नायक होते.

मनाला शांती देणारे भगवान गौतम बुद्धांचे महान विचार

६ डिसेंबर १९५६ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. त्या नंतर १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती | Information About Dr Babasaheb Ambedkar In Marathi
डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती | Information About Dr Babasaheb Ambedkar In Marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर १० ओळी निबंध 10 Lines on Dr BR Ambedkar in Marathi :

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील महान नेत्यांपैकी एक होते.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर हे होते.
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा मध्यप्रदेश राज्यातील महू या ठिकाणी झाला.
 • बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक, कायदेपंडित, अर्थशास्त्री आणि राजनीतीज्ञ होते.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते.
 • त्यांना भारतीय संविधानाचे जनक मानले जाते.
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ६ डिसेंबर १९५६ या दिवशी या जगाचा निरोप घेतला.
 • डॉ.आंबेडकर यांचे राजगृह हे जगातील सर्वात मोठ्या खासगी ग्रंथालयांपैकी एक आहे. ज्यामध्ये सुमारे ५० हजारांहून ही अधिक पुस्तके उपलब्ध आहेत.
 • मृत्युनंतर त्यांना भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • त्यांचा जन्मदिवस हा भारतात १४ एप्रिल आंबेडकर जयंती म्हणून तर त्यांचा मृत्यू दिवस हा ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.
 • भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेले योगदान भारतीय जनता कायम लक्षात ठेवील.

Tags : Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi, डॉ. बाबासाहेब, 14 April bhimjayanti speech, essay on dr Babasaheb Ambedkar in marathi

हिंदी निबंध – विश्व शिक्षक दिवस

Leave a Comment