कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics In Marathi Bhajan

Kanada raja pandharicha lyrics in marathi या भारतभूमी मध्ये भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतले आहेत. त्यातलाच एक अवतार आहे जो की खूप लोकप्रिय आहे तो म्हणजे विठ्ठल.

एकदा देवी रुक्मिणी भगवान विष्णूंवर काही कारणास्तव नाराज होऊन द्वारकेतून निघून गेली. तेव्हा भगवान विष्णू देवी रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून बाहेर पडले. पहिल्यांदा तर ते देवीला शोधत शोधत मथुरेत पोहचले. त्यानंतर गोकुळ आणि त्यानंतर दिंडीरवनला पोहचले तेथे देवी रुक्मिणी भेटली. देवीचा राग शांत करून भगवान विष्णू थोडे दिवस तिथेच राहिले.

रावण रचित शिव तांडव स्तोत्र

तिथे वास्तव्यास असताना तिथून जवळच असलेल्या एका आश्रमात पुंडलिक नावाचा एक हरिभक्त राहत होता. पुंडलिक आपल्या आईवडिलांचा परम सेवक होता. पुंडलिकाची भक्ती आणि आपल्या मातापित्याच्या सेवेची असणारी ओढ पाहून खुश होऊन भगवान विष्णू देवी रुक्मिणी सोबत भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी आश्रमात गेले.

पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता. तेव्हाच भगवान विष्णू देवी रुक्मिणी सोबत पुंडलिकाच्या दारात प्रकट झाले. त्यांनी पुंडलिकाला आवाज दिला की, “भक्त पुंडलिका आम्ही तुझ्या भेटीला आलोय.”

पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात इतका मग्न होता की त्याने शेजारची एक वीट भगवान विष्णूंकडे फेकली आणि त्यावर उभे राहून वाट पाहण्यास सांगितले. त्यावेळी पुंडलिकाची आपल्या आईवडिलांविषयी असलेली सेवेची तळमळ पाहून प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्या विटेवर उभे राहून पुंडलिकाची प्रतीक्षा करू लागले.

शिव शिवलिंगाष्टकम् – Shiv Lingashtakam Lyrics

जेव्हा पुंडलिकाची सेवा संपली तेव्हा त्याने येऊन भगवान विष्णूंची क्षमा मागितली. तेव्हा भक्त पुंडलिकाची नम्र प्रार्थना ऐकून अत्यंत खुश झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा वर म्हणून भक्त पुंडलिकाने भगवान विष्णूंना तेथेच राहण्याची विनंती केली.

आपल्या परम भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्याच विटेवर उभे राहून कंबरेवर हात ठेवून प्रसन्न मुद्रेत अवतार घेतला. तेव्हापासून आजतागायत देव आजपर्यंत त्याच विटेवर उभे आहेत असे मानले जाते. त्याच विटेवर उभे राहून ते आपल्या भक्तांना दर्शन देतात. त्या ठिकाणाला आज पंढरपूर किंवा पंढरी म्हणून ओळखले जाते.

कानडा राजा पंढरीचा - Kanada Raja Pandharicha Lyrics In Marathi god vitthal wallpaper hd vithu mauli
कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics In Marathi
गीतग. दि. माडगूळकर
संगीतसुधीर फडके
स्वरपं. वसंतराव देशपांडे, सुधीर फडके
चित्रपटझाला महार पंढरीनाथ

कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics In Marathi

कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा

वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा ।।
निराकार तो निर्गुण ईश्वर
जसा प्रकटला असा विटेवर

निराकार तो निर्गुण ईश्वर
असा प्रकटला असा विटेवर

उभय ठेविले हात कटीवर
उभय ठेविले हात कटीवर

पुतळा चैतन्याचा

कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा  ।।
परब्रम्ह हे भक्तांसाठी
परब्रम्ह हे भक्तांसाठी

मुके ठाकले भीमेकाठी
मुके ठाकले भीमेकाठी

उभा राहिला भाव सावयव
जणु कि पुंडलिकाचा

कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा  ।।
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो

पुरंदराचा हा परमात्मा
पुरंदराचा हा परमात्मा

वाली दामाजीचा

कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा  ।।
Vitthal wallpaper hd vithu mauli
कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics In English

कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics In English

Kanada raja pandharicha
Kanada raja pandharicha

Wedannahi nahi kalala antapaar yaacha

Kanada raja pandharicha
Kanada raja pandharicha
Nirakar to nirgun ishwar
Asa prakatala asa Vitewar
Nirakar to nirgun ishwar Asa prakatala asa Vitewar
Ubhay thevile haat kativar Ubhay thevile haat kativar
Putala chaitanyacha
Kanada raja pandharicha Kanada raja pandharicha
Parabramh he bhaktasathi
Parabramh he bhaktasathi
Muke thhakale bhimekathi Muke thhakale bhimekathi
Ubha rahila bhav savayav Janu ki pundalikacha
Kanada raja pandharicha Kanada raja pandharicha Kanada raja pandharicha
Ha namyachi khir chakhato
Chokhobachi gure rakhato
Ha namyachi khir chakhato Chokhobachi gure rakhato
Purndaracha ha paramatma Purndaracha ha paramatma
Wali damajicha
Kanada raja pandharicha Kanada raja pandharicha Kanada raja pandharicha Kanada raja pandharicha

Kanada Raja Pandharicha Lyrics PDF Download

Kanada Raja Pandharicha Lyrics PDF Download

Leave a Comment