KYC meaning in marathi KYC full form in marathi के वाय सी म्हणजे काय? हे आपणाला माहिती आहे काय? जेव्हा आपण बँक खाते उघडतो तेव्हा आपणाला त्या अकाउंट साठी केवायसी करणे आवश्यक असते, तर नक्की हे केवायसी म्हणजे आहे तरी काय ?
आपणाला बँकेत खाते उघडण्यासाठी, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करण्यासाठी खाते कसे उघडणे, बँक लॉकर्स, तसेच ऑनलाईन व्यवहार करणारे UPI ॲप्स जसे की GooglePay, PhonePe इत्यादींवर नोंदणी करण्यासाठी केवायसी करणे आवश्यक असते.
जर आपणाला या केवायसी बद्दल माहिती नसेल तर आज आपण त्याबद्दल अगदी सोप्या भाषेत माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपणाला त्याबद्दल अधिक चांगले आणि सहजरीत्या समजू शकेल.

के वाय सी चा लॉंग फॉर्म KYC Full Form In Marathi
KYC या शब्दाचा पूर्ण अर्थ full form of KYC हा Know Your Customer असा आहे. केवायसी KYC चा हिंदीमध्ये “आपके ग्राहक को जानें” तर मराठी मध्ये KYC ला आपल्या ग्राहकास जाणून घ्या (केवायसी) असा अर्थ होतो.
केवायसी म्हणजे काय? KYC Meaning In Marathi
KYC केवायसी ही एक अशी प्रक्रिया आहे कि जिच्यामुळे ग्राहक हा आपली खरी ओळख सांगतोय की नाही हे समजण्यास मदत होत असते. जेणेकरून जर एखाद्या ग्राहकाने लबाडी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे खोटे पकडणे सहज शक्य होते.
जेव्हा बँक किंवा कोणतीही कंपनी आपल्या ग्राहकाची ओळख खात्री करून घेण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे किंवा दस्तऐवज मागते, तर या दस्तऐवजांना केवायसी दस्तऐवज KYC Documents म्हटले जाते.

या व्यतिरिक्त जेव्हा आपण आपल्या फोनसाठी सिम कार्ड घेत असतो, तेव्हा देखील आपणाला आपली ओळख सिद्ध करण्यासाठी ओळखपत्र मागितले जाते. तेव्हा ओळखपत्र म्हणून आपल्या आधार कार्डची पडताळणी केली जाते, या प्रक्रियेला देखील केवायसी KYC असे म्हंटले जाते. जेव्हा आपले बँक खाते निष्क्रिय होत असते, तेव्हादेखील बँक आपले निष्क्रिय खाते पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याकडे KYC दस्तऐवजांची मागणी करते.
केवायसी करताना लागणारी कागदपत्रे Documents Required For KYC in Marathi
आपणाला हे KYC केवायसी म्हणजे काय तसेच केवायसी चा फुल फॉर्म काय हे समजले तर आता पाहूया की या KYC दस्तऐवजांमध्ये आपले कोणकोणते दस्तऐवज येतात. कोणत्याही ठिकाणी KYC करताना जी काही आवश्यक कागदपत्रे गरजेची असतात ती खालीलप्रमाणे आहेत.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- वाहन परवाना
- पासपोर्ट
वरील सर्व दस्तऐवजांचा वापर करून आपण KYC सोप्प्या पद्धतीने करू शकतो.
आता आपणाला समजले असेल की केवायसी म्हणजे काय? KYC meaning in marathi किंवा केवायसी चा लाँग फॉर्म KYC full form in marathi काय? केवायसी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती documents required for KYC in marathi.
म्हणून जेव्हा एखाद्या संस्थेमार्फत आपली ओळख पडताळून पहिली जाते तेव्हा त्या प्रक्रियेला KYC म्हटले जाते. बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये केवायसी खूप महत्वाचे आहे. कारण ही प्रक्रिया व्यक्तीची खरी ओळख सुनिश्चित करत असते. जर अर्जदाराची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली, तर त्या अर्जदाराकडून धोका किंवा फसवणुक होण्याची शक्यता कमी असते.
371295120073
Pagar hou nahi rahli maun kyc kart aahe
Sheti karne vala
Pagar nhi ho raha he
KYC kahi par bhi kar sakte hai kay ?
apko kis cheez ke liye kyc karana hai uspar depend hai.