Derivatives market meaning in marathi काय आपणाला माहिती का की जगभरात सर्वात जास्त ट्रेडिंग ही डेरिव्हेटिव्ह derivatives trading मार्केटमध्ये केली जाते. काय आपणाला माहिती आहे का जगभरातले उत्तम ट्रेडर्स हे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड करत असतात. तर मुळात हे डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय? derivatives market meaning in marathi याचे किती प्रकार आहेत? आणि या डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये ट्रेडिंग करणे बरोबर आहे का? पाहूया या सर्व प्रश्नांची उत्तरे.
सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स

स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणुकीतला फरक
डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? Derivatives Market meaning in marathi
डेरिव्हेटिव्ह म्हणजे अशी गोष्ट जी दुसऱ्या एखाद्या स्त्रोतावर आधारित असते. हे डेरिव्हेटिव्ह ज्या गोष्टीवर आधारित असते त्याला त्या डेरिव्हेटिव्हची मूळ मालमत्ता म्हणजेच Underlying Asset असे म्हटले जाते.derivatives market meaning in marathi.
प्रत्येक डेरिव्हेटिव्हची किंमत ही त्याच्या मूळ मालमत्तेवर म्हणजेच Underlying Asset वर अवलंबून असते. म्हणजेच जर मूळ मालमत्तेची किंवा गोष्टीची किंमत वाढते तेव्हा त्याच्याशी निगडित डेरिव्हेटिव्हची किंमत देखील वाढत असते. आणि जर मूळ गोष्टीची किंमत कमी झाली तर त्याच्याशी निगडीत डेरिव्हेटिव्हची किंमत देखील कमी होत असते.
अफिलीएट मार्केटीग काय आहे? यातून पैसा कसा कमवायचा?
उदाहरणार्थ, आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्याला साखर ही ऊसापासून मिळत असते. तर इथे साखर हे उसाचे डेरिव्हेटिव्ह आहे आणि ऊस हा त्या साखरेची मूळ मालमत्ता किंवा Underlying Asset आहे असे म्हणता येईल. जर उसाची किंमत वाढते तेव्हा बाजारात साखरेची असणारी किंमत देखील वाढत असते त्याच प्रमाणे उसाची किंमत घसरल्यावर साखरेची किंमत देखील कमी होत असते.
याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये stock market आर्थिक डेरिव्हेटिव्ह्ज financial derivatives असतात. ज्यांची मूळ मालमत्ता Underlying Assets हे स्टॉक्स, इंडेक्स, करन्सी तसेच कमोडिटी हे असतात. आणि ज्याप्रमाणे या सर्व underlying assets च्या किंमतीत बदल होतात त्याचप्रकारे यांच्यावर आधारित असलेल्या डेरिव्हेटिव्ह्ज ची किंमत देखील बदलत असते.

डेरिव्हेटिव्ह चे प्रकार Types of Derivatives market in india
डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात. ज्यामध्ये फॉरवर्ड डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग forward derivatives trading, फ्युचर ट्रेडिंग future trading, ऑप्शन ट्रेडिंग option trading आणि स्वॅप डेरिव्हेटिव्ह्ज swap derivatives ह्या गोष्टी येतात.
फॉरवर्ड डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग forward derivatives trading
फॉरवर्ड डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग forward derivatives trading ही दोन किंवा अधिक लोकांमध्ये केली जाणारी अशी ट्रेडिंग पद्धत आहे ज्यामध्ये कमोडिटी commodity विक्रेता आणि खरेदीदार भविष्यातील एखाद्या तारखेला सामानाची डिलिव्हरी आणि देय असलेली रक्कम देण्याचा करार करत असतात.
परंतु कमोडिटी कोणत्या किमतीत खरेदी केली जाईल यावरील सहमती ही करारच्या दिवशीच केली जाते.
फ्युचर ट्रेडिंग future trading in marathi
फ्युचर ट्रेडिंग हा डेरिव्हेटिव्ह मार्केट ट्रेडिंगचा एक प्रकार आहे. फ्युचर ट्रेडिंग FutureTrading किंवा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट Future Contract चा अर्थ असा होतो की कोणत्याही स्टॉक ला त्याच्या एक्सपायरी डेट च्या आधी निर्धारित मूल्यावर खरेदी किंवा विक्री करण्याचा केलेला करार होय. यामध्ये आधीच निर्धारित केलेल्या तारखेला एक्सपायरी डेेट expiry date म्हटले जाते.
भविष्यातील कामगिरीला आधार मानून एखाद्या स्टॉक चा किंवा कमोडिटीचा एखाद्या विशिष्ट तारखेला भविष्यातील एखाद्या तारखेसाठी केला जाणारा इलेक्ट्रॉनिक करारच फ्युचर ट्रेडिंग future trading ला लोकांमध्ये लोकप्रिय बनवत आहे.
ऑप्शन ट्रेडिंग option trading in marathi
ऑप्शन ट्रेडिंग option trading एक प्रकारचे फ्यूचर सारखे महिन्याभरासाठी किंवा आठवड्याभरासाठी विकत घेता किंवा विकता येणारे कॉन्ट्रॅक्ट असतात. स्टॉक मध्ये आपणाला महिन्याभराचे कॉन्ट्रॅक्ट असतात, तर ऑप्शन मध्ये आपण एक महिना किंवा आठवड्याचे कॉन्ट्रॅक्ट विकत घेऊ शकतो किंवा विकू शकतो.
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये दोन प्रकार येतात, कॉल ऑप्शन call option आणि पूट ऑप्शन put option.
कॉल ऑप्शन Call option in marathi
कॉल ऑप्शन call option जर आपण खरेदी केले आणि स्टॉक जर वर गेला तर आपणाला प्रॉफिट होतो आणि जर स्टॉक जास्त वाढला नाही किंवा पडला, आणि महिन्याअखेरीस जर आपण तो काढला नसेल तर आपणाला नुकसान होण्याची शक्यता असते.
कॉल ऑप्शन जर आपण विकला आणि जर स्टॉक खाली गेला किंवा विशेष नाही वाढला तर आपणाला प्रॉफिट होऊ शकतो. पण जर तो उलट फिरला आणि तो चांगलाच वर गेला तर आपणाला खूप नुकसान होऊ शकते, त्यामुळे ऑप्शन विकणाऱ्यांनी शक्यतो स्टॉप लॉस stop loss लावून ठेवावा, जेणेकरून जर एखाद्या बातमीच्या परिणामामुळे उलट फिरलाच तर होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
पूट ऑप्शन Put option in marathi
पूट ऑप्शन put option जर आपण खरेदी केले आणि स्टॉक जर पडला तर आपणाला प्रॉफिट होतो आणि जर स्टॉक जास्त पडला नाही किंवा वाढला, आणि महिन्याअखेरीस जर आपण तो काढला नसेल तर आपणाला नुकसान होण्याची शक्यता असते.
पूट ऑप्शन जर आपण विकला आणि जर स्टॉक वर गेला किंवा विशेष नाही पडला तर आपणाला प्रॉफिट होऊ शकतो. पण जर तो उलट फिरला आणि तो चांगलाच खाली गेला तर आपणाला खूप नुकसान होऊ शकते, त्यामुळे पूट ऑप्शन विकणाऱ्यांनी सुद्धा शक्यतो स्टॉप लॉस stop loss लावून ठेवावा.
स्वॅप डेरिव्हेटिव्ह्ज swap derivatives
स्वॅप ट्रेडिंग swap trading in marathi हा एक डेरिव्हेटिव्ह करार आहे ज्याद्वारे दोन पक्ष दोन भिन्न आर्थिक साधनांमधून पैशांच्या प्रवाहाची cash flow किंवा देयतांची liabilities देवाणघेवाण करतात. स्वॅपचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे व्याज दर स्वॅप interest rate swap.
स्वॅप डेरिव्हेटिव्ह्ज swap derivatives चा व्यापार एक्सचेंजवर चालत नाही आणि किरकोळ गुंतवणूकदारांना सामान्यतः स्वॅप मध्ये सहभाग घेता येत नाही.
डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेडिंग करावी का ? Should we trade in Derivatives
जर एखाद्या कंपनीचा स्टॉक खरेदी किंवा विक्री केला जातो तेव्हा त्याला स्टॉक ट्रेडिंग stock trading म्हटले जाते. पण जर आपण एखाद्या कंपनीचा स्टॉक खरेदी न करता त्याच स्टॉकवर आधारित एखाद्या डेरिव्हेटिव्ह ची खरेदी करू तर त्याला डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग derivatives trading म्हटले जाते.
अधिकतर गुंतवणुकदार जे लाँग टर्म मध्ये अधिक पैसे कमाण्यासाठी प्रयत्न करतात ते अशाप्रकारे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करणे शक्यतो टाळतात किंवा अतिशय कमी प्रमाणात करत असतात. पण ज्या ट्रेडर्स चा कमी कालावधीत मोठा नफा कमविण्याचा उद्देश असतो त्यांच्यासाठी डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग खूप महत्वाची असते.
असेही अनेक ट्रेडर्स असतात जे की फक्त आणि फक्त डेरिव्हेटिव्ह मध्येच ट्रेडिंग करत असतात. तर डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेडिंग करणे बरोबर आहे का हे सर्वस्वी आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. आपले ध्येय काय आहे? आपली कुशलता कशात आहे हे जाणून घेऊन आपण आपल्यासाठी योग्य मार्ग निवडला पाहिजे.
ऑपशन ट्रेडिंग वर लेख लिहा.😊
लवकरच..