डीआरडीओ म्हणजे काय? – DRDO Meaning in Marathi – DRDO Information in Marathi

डीआरडीओ म्हणजे काय? – DRDO Meaning in Marathi – DRDO Information in Marathi कोणत्याही देशाचे सामर्थ्य आणि त्या देशाची मजबुती याचे आकलन त्या देशाचे सैन्य आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती यावरून होत असते.

जेव्हा देशाची सैन्य शक्ती आणि देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची क्षमता ही परस्पर सहयोगी आधारावर निर्माण होत असतील तर त्या देशाची ताकद ही अधिक वाढत असते. भारत देशातील डीआरडीओ DRDO याच आधाराला अधिक सक्षम करण्यासाठी अग्रेसर असते.

NDMA म्हणजे नेमकं काय ?

डीआरडीओ चा अर्थ DRDO Full Form in marathi

DRDO या शब्दाचा पूर्ण अर्थ full form of DRDO हा Defence Research and Development Organization असा आहे. डीआरडीओ DRDO ला हिंदीमध्ये रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन या नावाने तर मराठी मध्ये DRDO ला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या नावाने ओळखले जाते.

DRDO meaning in marathi
DRDO meaning in marathi / DRDO information in marathi

१० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत.

डीआरडीओ म्हणजे काय? DRDO meaning in marathi

DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था Diffence Research and Development Organization. ही एक भारतीय संघटना आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करणे आणि संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि त्याच्या विकासात डीआरडीओ DRDO चे मोठे योगदान असते.

डीआरडीओ DRDO हे देशाच्या संरक्षणासंबंधी विविध प्रकारचे संशोधन करत असते. तसेच देशाच्या संरक्षणासंबंधीच्या तंत्रज्ञानाला अधिक मजबूत करत असते. डीआरडीओ DRDO ही संघटना म्हणजे विश्वस्तरावरील हत्त्यारे तसेच विविध उपकरणांचे उत्पादन आपल्या देशात करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या भारताचा चेहरा आहे.

डीआरडीओ ची स्थापना When was DRDO established

डीआरडीओ DRDO ही खूप जुनी संघटना आहे. डीआरडीओ ची स्थापना drdo established at ही १९५८ साली देशाच्या सैन्य शक्तीला अधिक बळकट बनविण्यासाठी केली गेली होती. ही संस्था देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करत असते.

डीआरडीओ DRDO ची स्थापना ही सुरवातीला प्रयोगशाळांच्या लहान लहान संघटनांनी मिळून झाली होती. परंतु आज वर्तमानात या संघटनेच्या एकूण ५१ प्रयोगशाळा सुरू आहेत. ज्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे, देशाच्या सुरक्षेसंबंधीची उपकरणे बनविणे इत्यादी क्षेत्रांत कार्यरत आहेत.

DRDO office delhi
डीआरडीओ म्हणजे काय? DRDO Headquarters

डीआरडीओ चे मुख्यालय main office of DRDO दिल्लीतील राष्ट्रपती भवनाजवळ, सेना भवना समोरच्या डीआरडीओ भवनमध्ये आहे. ईशान्य दिल्लीतील महात्मा गांधी मार्गावर डीआरडीओ ची एक प्रयोगशाळा आहे.

भारत सरकारच्या रक्षा मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ चे सचिव असतात. त्यांच्याद्वारे या संघटनेचे नेतृत्व केले जाते. सध्याचे डीआरडीओ चे सचिव drdo chairman डॉ. सतिश रेड्डी हे आहेत.

डीआरडीओ चा उद्देश Motto of DRDO

डीआरडीओ चा उद्देश motto of DRDO बलस्य मूलम् विज्ञानम् असा आहे. हे संस्कृत भाषेत लिहले गेले आहे. ज्याचा मराठी मध्ये अर्थ होतो की शक्ति किंवा बळाचा स्त्रोत हे स्वतः विज्ञान आहे. अर्थातच कोणत्याही देशाच्या ताकदीचा अंदाज हा त्या देशाच्या विज्ञानातील प्रगतीवरून लावला जात असतो. आणि DRDO हे देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेषतः सुरक्षा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करून देशाला नव्या दिशेने घेऊन जाण्यास अग्रेसर आहे.

डीआरडीओ DRDO चा मुख्य उद्देश हा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला जागतिक दर्जाचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार प्रदान करणे तसेच भारताला संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक सक्षम करणे हा आहे.

  • देशाच्या सुरक्षा सेवांसाठी अत्याधुनिक सेन्सर्स, शस्त्र प्रणाली, प्लॅटफॉर्म आणि संबंधित उपकरणांचे उत्पादन, डिझाइन, विकास आणि नेतृत्व करणे.
  • लढाऊ परिणामकारकता ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि सैनिकांच्या कल्याणास प्रोत्साहन देण्यासाठी सेवांना तांत्रिक उपाय प्रदान करणे.
  • पायाभूत सुविधा आणि वचनबद्ध दर्जेदार मनुष्यबळ विकसित करणे आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा पाया मजबूत करणे.

सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स

पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या drdo scientist मार्गदर्शनाखाली ही संस्था देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणार्‍या अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, तसेच इतर संस्थांच्या मदतीने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या सहकार्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करणे हा DRDO चा उद्देश आहे.

डीआरडीओ चे कार्य Functions of DRDO

डीआरडीओ हे भारताच्या सुरक्षा प्रणालीचा आराखडा आखणे तसेच तिचा विकास करण्यासाठी दिवसरात्र कार्य करत असते. डीआरडीओ DRDO हे देशाच्या जल, स्थळ आणि वायुसेनेला जागतिक पातळीवरील शस्त्र प्रणाली उपलब्ध करून देत असते. तसेच लष्करी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचे काम करत असते.

डीआरडीओ म्हणजे काय? DRDO information in marathi

सन १९६० मध्ये डीआरडीओ ने भारताच्या अग्नि, पृथ्वी, आकाश, त्रिशूळ आणि नाग यांसारखी अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली जेणेकरून आपल्या देशाची सुरक्षा शक्ती अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे. याचबरोबर लढाऊ विमान, रॉकेट, आखूड पल्ल्याच्या बंदुकी, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्त्रे, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे डीआरडीओ ने विकसित केली आहेत.

डीआरडीओ समोरील आव्हाने Challenges For DRDO

  • 2016-17 या वर्षात, संरक्षणविषयक स्थायी समितीने DRDO च्या प्रकल्पांसाठी अपुऱ्या अर्थसंकल्पीय सहाय्याबद्दल चिंता व्यक्त केली.
  • DRDO साठी सरकारच्या सुस्त महसूल वचनबद्धतेमुळे अनेक मोठे तंत्रज्ञान प्रकल्प रखडले आहेत.
  • गंभीर भागात अपुऱ्या मनुष्यबळामुळे सशस्त्र दलांशी योग्य समन्वयाचा अभाव देखील DRDO ला सहन करावा लागतो.
  • खर्चात वाढ आणि प्रकल्पाच्या कामांना होणारा विलंब यामुळे DRDO च्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे.
  • डीआरडीओ DRDO अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याऐवजी दुसऱ्या महायुद्धातील उपकरणे दुरुस्त करत आहे.

डीआरडीओ भरतीची प्रक्रिया आणि पात्रता Qualification and process for DRDO recruitment

डीआरडीओ मध्ये भरती होण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून किंवा विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी किंवा 3 वर्षांचा अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. DRDO मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीला सीईटी CET, सीईपीटीएएम DRDO CEPTAM तसेच सेट SET ची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते.

DRDO मध्ये भरती होण्यासाठी DRDO recruitment अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ ते २८ च्या दरम्यान असणे अनिवार्य आहेे.

Read More: Best Cloud CRM Solutions For Small Business


Tags : डीआरडीओ म्हणजे काय,DRDO meaning in marathi,DRDO Full Form in marathi,When was DRDO established,Motto of DRDO,Functions of DRDO,Qualification and process for DRDO recruitment, DRDO Information in Marathi

Leave a Comment