Social media influencer meaning in marathi हल्ली अनेक ठिकाणी Influencer हा शब्द आपणाला ऐकायला मिळत असतो, पण अनेकांना या इन्फ्ल्युएन्सर Influencer या शब्दाचा अर्थ माहिती नसतो. आपण Facebook, WhatsApp, Instagram, TikTok यांसारख्या अनेक social media प्लॅटफॉर्मवर मुख्यतः Influencer या शब्दाचा वापर पाहत असतो. पण आज आपण या शब्दाबद्दल संपूर्ण माहिती तपशीलवार जाणून घेऊया.
जर आपणाला इन्फ्लुएंसर म्हणजे काय? influencer meaning in marathi किंवा इन्फ्ल्युएन्सर कोणाला म्हटले जाते who is called influencer याची संपूर्ण माहिती हवी असेल तर ती माहिती या लेखात पुर्णपणे दिली गेली आहे.

इन्फ्लुएंसर म्हणजे काय? Influencer Meaning in Marathi
इन्फ्ल्युएन्स Influence या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ “प्रभाव” असा होतो. इंग्रजीमधील Influencer हा शब्द फ्रेंच शब्द Influence पासून बनला आहे. फ्रेंच भाषेत influence शब्दाचा अर्थ देखील “प्रभाव” असा होतो. त्याचप्रमाणे Influencer या शब्दाचा अर्थ “प्रभावशाली व्यक्ती” किंवा “इतरांवर प्रभाव पाडणारी व्यक्ती” असा होतो.
बोलायचं झालं तर Influence किंवा Influencer हा फ्रेंच भाषेतील शब्द आहेत, पण इंग्रजीतही ते Influence किंवा Influencer असेच लिहले गेले आहेत. आणि या फ्रेंच आणि इंग्रजी शब्दांचा अर्थ देखील समानच आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे काय? Social Media Influencer Meaning in Marathi
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे social media जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर इत्यादी आणि इतर कोणत्याही online किंवा offline माध्यमाद्वारे इतर व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव टाकणारी व्यक्ती, त्याला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर social media influencer म्हटले जाते.
एक प्रभावशाली व्यक्ती ज्याचे social media वर अधिक फॉलोअर्स अर्थात लाखो किंवा हजारो फॉलोअर्स असतील, आणि तो फक्त सोशल मीडिया म्हणजेच Facebook, Instagram, Blogs, YouTube, Twitter इत्यादीद्वारे आपल्या प्रेक्षकांना एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी प्रभावित करणे, जाहिरात करणे, समीक्षण करणे इत्यादी गोष्टी करत असेल तर त्याला social media influencer, किंवा internet celebrity असे म्हणतात.

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर कसे बनावे? How to Become Social Media Influencer in India
Social media influencer प्रमाणेच इन्फ्ल्युएन्सर चे इतर प्रकार देखील असतात, जसे की Blog Influencer, Micro Influencer, Celebrity Influencer इत्यादी. कमीत कमी खर्चात Social Media Influencer बनता येते, फक्त त्यासाठी consistency म्हणजेच सातत्य आणि ज्या विषयातील Influencer बनायचं आहे त्या संबंधित विषयाचा अभ्यास असेल तर जास्त फायदा करून घेता येतो.
Social media influencer बनण्यासाठी आपणाला खालील काही गोष्टींचं पालन करणे गरजेचे आहे.
१. सर्वात आधी आपणाला सर्व सोशल मीडिया पैकी एखादा असा प्लॅटफॉर्म निवडावा जो की आपल्या विषयाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम ठरू शकेल. हल्लीच्या काळात तरुण पिढीकडून Instagram चा वापर प्रचंड प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे आपण Instagram ची देखील निवड करू शकतो. २. दुसरे म्हणजे आपला विषय niche निवडणे. म्हणजेच याची पुष्टी करणे की आपण कोणत्या विषयाशी संबंधित content आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ठेवणार आहोत. ३. तिसरे म्हणजे, आपल्या सोशल मीडिया हँडलवर, उच्च दर्जाचा content ठेवावा, म्हणजेच आपला कंटेंट हा आपला स्वतःचाच असावा, तो आपण कुठुन कॉपी केलेला नसावा. ४. आपण आपल्या सोशल मीडिया हँडलवर उच्च दर्जाच्या पोस्ट्स टाकण्यामध्ये सातत्य consistency कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण किती दिवसात पोस्ट टाकणार किंवा एका दिवसात किती पोस्ट्स टाकणार ही गोष्ट निश्चित केली पाहिजे.
जर आपले Social media account लवकरात लवकर grow करायचे असेल तर त्यासाठी आपणाला दररोज किमान चार ते पाच उच्च दर्जाच्या पोस्ट्स आपल्या अकाउंट वर पोस्ट करायला हव्या. जर आपण वर दिलेल्या मुद्द्यांचे योग्य प्रकारे पालन केले तर आपण भविष्यात नक्कीच एक चांगले social media influencer होऊ शकतो.
- Full Form of ISRO in Marathi
- Full Form of DRDO in Marathi
- Full Form of NDMA in Marathi
- १० कायदेशीर अधिकार जे सर्वांना माहिती असावेत.
Tags : influence meaning in marathi, influencer meaning in marathi, social media influencer meaning in marathi, how to become social media Influencer in marathi, Social media manager meaning in marathi, influencer information in marathi, who is called influencer, influence in marathi